Friday, September 3, 2010

शक्ती दे_ एका दहावीतल्या मुलाची सुंदर कविता

 माझ्या सहकारी प्रभावीरा खिलारी यांचा मुलगा निखिल खिलारी याने बापूंवर अत्यंत सुंदर कविता केली आहे.. तो नववीत असताना त्याने ही कविता केली होती...नक्की वाचा...


शक्ती दे


तूच आहेस मनःसामर्थ्यदाता
तूच आहेस शक्तीदाता
विनायका तू, गजानना तू
तूच आहेस बुद्धीदाता
कृपासिंधु तू बलदाता

तूच धावशी संकटाला
तूच येई मदतीला
इथवर आलो दोन्ही कर जोडूनी
तुझ्या चरणांशी ठेवूनी मस्तक माझे
म्हणता, म्हणता माझे जीवन सर्व झाले तुझे

नकोसा झाला हा लाचार जन्म
ह्या जन्माला तू कुठेतरी वळण दे
दे मज शक्ती तू बलशाली
प्रतिकार करावया त्या शत्रूशी

पेटून उठू दे अंगात त्यागाच संचार
नसानसांत सळसळून उठू दे रक्ताचा अंगार
पुन्हा नव्याने जगण्याची, उसळण्याची तू शक्ती दे

निलेश सुरेश खिलारी
इयत्ता दहावी