Monday, January 7, 2013

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी

हरि ॐ 
जुन्या वर्षाची समाप्ती आणि नव्या वर्षाचा आरंभ एका अमानुष घटनेच्या प्रभावाखालीच झाला. दिल्ली गॅंगरेप प्रकरण त्याची हादरवणारी सत्य कथा पाहून विचार सुन्न झाले. आजच्या काळात एका स्त्रीला सुरक्षितता नावाला देखिल उरलेली नसल्याचे दिसून येते. दिल्ली गॅंगरेप प्रकरणाबरोबरच अशा अनेक बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. अगदी हा विषय इतका तापलेला असताना देखिल बलात्कार होतच आहे. काय समजायचे यास? वासनेपुढे विचारशक्तीच गोठल्याचे हे चांगलेच उदाहरण आहे. कसलीस भिती न उरलेल्या नराधमांकडून दुसरी अपेक्षा तरी काय....कितीही मोठा आणि कठोर कायदा आला तरी शोषिताचे दुःख शेवटी शोषिताचेच असते. ह्या अशा शोषणाला सामोर्‍या गेलेल्या शोषिताची जी हानी होते ती कश्यानेच भरुन येणारी नसते. दिल्ली गॅंगरेप घटनेतील पिडीत मुलीला आज बहादूर असे संबोधले जाते. ती मृत्यूशी कडवी झुंज कशी देत होती हे आपण सारे पाहत होतो. पण एक गोष्ट आपण विसरतो..."त्याशिवाय तिला काही पर्यायच उरत नव्हता..." आणि हे विदारक सत्य आहे. प्रत्येक पिडीत त्याच्यावर झालेल्या शोषणाच्या विरोधात लढू पाहतो...पण त्याची ती जखम कधीच भरुन येत नसावी. कारण दुःख शेवटी त्याला भोगायला लागले आहे. असे दुःख ज्यांनी भोगले नाही त्यांना बोलणे सोपे असते पण.....

या अशा अनेक घटनांनी समाजात वावरताना स्त्रीचा आत्मविश्वास पूर्णपणे तुटतो. ती सतत भितीच्या छायेत वावरत राहते. यावर उपाय होणे आवश्यक आहे. कठोर कायदा करुन गुन्हेगारांना शिक्षा दिलीच पाहीजे मात्र त्या आधीच गुन्हा होऊच शकणार नाही अशी यंत्रणा असणे आवश्यक आहे. कोण बनवेल अशी यंत्रणा...?

हा प्रश्न सगळ्यांच पडला. पण उत्तर मात्र एका ठिकाणाहूनच आले. परम पूज्य बापूंनी जाहीर केलेली पाच कलमे. अध्यात्माच्या माध्यमातून स्वसंरक्षणाची यंत्रणा बापूंनी दिली. बापूंच्या या पाच कलमांनी नुसता आत्मविश्वासच नाही तर निडरपणे समाजात वावरण्याची शक्ती देखील आली आणि स्वसंरक्षण हे खर्‍या अर्थाने स्वसंरक्षण कसे असू शकते ते कळले. पाच कलमे तर बापूंनी आता जाहिर केली. परंतु २००२ पासूनच स्त्रीयांना स्वसंरक्षण करता यावे साठी बापूंनी अहिल्या संघ सुरु केले आहे. या अहिल्या संघातून अनेक स्त्रीयांनी बलविद्या आणि प्राच्यविद्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

काहीही चूक नसताना शिळा झालेल्या अहिल्येसारखीच गत स्त्रीयांची आहे. "स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी". कोणत्याही स्त्रीला या अहिल्येसारखे शिळा होऊन रहावे लागू नये म्हणून बापूंची आणि नंदाईची धडपड स्त्रीला अधिकाधिक सक्षम, सामर्थ्यवान बनवेल ही शंकाच नाही.....कारण कुणी मदतीला येईल ही अपेक्षा ठेवून कलियुगात वावरल्यास हाती फक्त निराशाच येईल...त्यामुळे आपली मदत आपण स्वतःच करणे आवश्यक आहे......सदैव पाठीशी असणार्‍या भाऊ, पिता, मुलगा, मित्र, सद्‍गुरु अनिरुद्धांनी दिलेला आधार घेऊन....
हरि ॐ

आश्‍वासक बापू

ll हरि ॐ ll
 कालच्या श्रीहरिगुरुग्राम येथील आपल्या प्रवचनात, श्रीअनिरुद्धांनी भारतात नुकत्याच घडलेल्या काही घटनांवर भाष्य केलं; ज्या घटनांमुळे अख्खा भारत हादरून गेला, ढवळून निघाला. प्रत्येक सुज्ञ आणि संवेदनशील भारतीय नागरीक ह्या घटनांनी व्यथित झाला. बापूंनी त्यांच्या ह्या प्रवचनामध्ये त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना एक आश्वासक दिलासा दिला.