Friday, November 14, 2014

How to save links on Facebook? Facebook Save - Very useful feature

इंटरनेटच्या जगात रोज काही तरी नवीन येत असतो. तुमचा आमचा लाडका फेसबुक तर सारखा रंग बदलत असतो. म्हणजेच त्याचे नवनवीन फिचर्स येत असतात. आपल्या युजर्सना फेसबुक वापरताना कंफर्ट देण्यासाठी अनेक मोठे बदल फेसबुकने या वर्षभरात घडवून आणले. दैनिक प्रत्यक्षच्या सोशल मिडीयाच्या अंकात फेसबुकवर मी लिहले होते. त्यानंतर वर्षभर फेसबुक फारसे पाहणे झाले नाही. पाहण्यापेक्षा नीट पाहणे झाले नाही. आत्ताच मी पुन्हा फेसबुक जरा बारकाईने पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा अस लक्षात आले की फेसबुकने एक नवं फिचर दिले आहे.
सेव्ह Save. तर आपण पाहूया हे फिचर काय आहे ते.

फेसबुक ही एक असे संकेत स्थळ आहे की जिथे अगदी सेकंदाला नवीन काही तरी येत असते. जितके आपले फ्रेंडस, जितके पेजेस आपण लाईक केलेले असेल तितक्या लवकर आपले न्यूज फीड बदलत राहते. आणि यातून बर्‍याचशा गोष्टी पाहण्याचे राहून जाते. ज्यात अनेकदा महत्त्वाच्या बाबी देखील असतात. पण पुन्हा मात्र त्या गोष्टी शोधायच्या असतील तर खरोखरीचे प्रॉब्लेम्स होतात. यावर तोडगा म्हणून फेसबुकने "सेव्ह" "Save" नावाचे फिचर काढले आहे.

जर आपण आपल्या वेब ब्राऊझरमध्ये बुकमार्क्स वापरुन आपल्याला हवी ती लिंक सेव्ह करतो तसेच इथे आपल्याला हवी ती पोस्ट लिंक आपण सेव्ह करू शकतो.


यासाठी फेसबुकच्या उजवीकडील कोपर्‍यातील बटनावर क्लिक करून सेव्ह असे म्हणावे. ही पोस्ट आता सेव्ह झाली.

नंतर तुमच्या फेसबुकच्या होम पेजवरील डावीकडील कोपर्‍यात तुम्हाला सेव्ह असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे.

त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुम्ही सेव्ह केलेल्या फेसबुकवरील सर्व गोष्टी दिसतील. 

यामध्ये लिंक, फोटॊ, व्हीडीओ इत्यादी वर्गीकरण करून दिलेली आहे. त्यामुळे आपण सेव्ह केलेली पोस्ट सॉर्ट करण्याचे काम फेसबुकच करुन देतो.
शिवाय आपण सेव्ह केलेली लिंक आपण येथूनच पुन्हा शेअर करू शकतो.
  • सेव्ह केलेल्या लिंक केवळ आपल्याला दिसतील.  आपण सेटींग्समध्ये बदल करून इतरांबरोबरही आपण आपल्या सेव्ह लिंक शेअर करू शकतो.
  • फेसबुकवर अपलोड केलेल्या गोष्टी आपण सेव्ह करु शकत नाही. जसे की फोटो इ. पण फेसबुकवर कुणीही शेअर केलेली (Right now External) लिंक आपण सेव्ह करू शकतो.
सोशल नेटवर्किंग किंग असणार्‍या फेसबुकने सेव्ह या ऑप्शन्च्या मार्फत सोशल बुकमार्किंगमध्ये ही उडी घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. बहुतेक एवढच काय ते बाकी होते. कारण फेसबुक मॅप्स, फेसबुक ग्राफ सर्च याआधीच फेसबुकने सुरु केले आहे.

मात्र सर्वसामान्य युजर्सच्या उपयोगास पडेल असे हे "सेव्ह" फिचर निश्चितच यशस्वी ठरू शकते आणि याचा आपणही यशस्वी वापर केला पाहीजे.


- रेश्मावीरा  नारखेडे