Wednesday, December 23, 2015

हॅशटॅग- जागतिक व्यासपीठ -1



एका सकाळी उठल्या उठल्या नविनच संकल्पनेची मला ओळख झाली. सकाळी फोन वरचे मॅसेज वाचत असतान एका मित्राच्या मॅसेजने फार सतावले. मेसेजचा प्रत्येक शब्द वाचण्याच्यामध्ये # असं काहीतरी होते. सुरवातीला मला कळेच ना!! ही कोड लॅंग्वेज आहे की एरर आहे. सारख आपल्या प्रत्येक शब्दाच्या मध्ये सो कॉल्ड हॅशटॅग. शेवटी मी त्या मित्राला फोन करुनच काय तो निरोप विचारला आणि थोडस अज्ञान दूर होत का याचा प्रयास केला..अर्थातच माझ अज्ञान...त्याने मोठ्या दिलदार वृत्तीने मला हॅशटॅगची ओळख करुन दिली.
खरच ती ओळख इथे मी मांडत नाही पण त्याने दिलेल्या ओळखी नंतर मला खरच हॅशटॅगचा अभ्यास करावासा वाटला आणि तोच मी इथे देत आहे. 

या इंटरनेटच्या दुनियेत आपल्याला जोडणारा फॅक्टर म्हणजे लिंक्स. आता लिंक्स म्हटल की आपल्या डोळ्यासमोर पटकन येते ती www. पासून सुरु होणारी लिंक. हॅशटॅगच्या वापराने देखील इंटरनेटवर लिंक्स तयार होतात पण त्याचा वापर..हेतु..आणि परिणाम हा वेगवेगळा असू शकतो
इंटरनेटने जग जवळ आणलेय तर हॅशटॅग्सने ते आणखीन घट्ट जोडले जातेय.
हॅश टॅगच्या बाबतीत जेव्हा मी विचार करते तेव्हा मला ते स्वतःहुन स्वतःसाठी केलेले जागतिक व्यासपीठच वाटते.
बघा विचार केला....एखाद जागतीक व्यासपीठ तुमच्यासाठी तेही तुम्हाला करता आले तर? आणि तेही केवळ # या एका चिन्हामुळे. आणि आज हा हॅशटॅगचा वापर असाच होतोय. पण अजूनही अनेकजण याच्या नेमक्या वापराबद्द्ल खूपच दूर आहेत.

हॅशटॅग म्हणजे काय?
हॅशटॅग म्हणजे सोशल मिडीया किंवा मायक्रोब्लॉगिंग सुविधेमध्ये वापरण्यात येणारा असा एक लेबल किंवा मेटाडाटा टॅग आहे ज्याचा वापर करुन आपण विशिष्ठ माहिती मिळवू अथवा पोहचवू शकतो. 
अधिक विस्ताराने पहायचे झाले तर, सोशल नेटवर्कींगमध्ये जेव्हा एखाद्या शब्दाच्या आधी आपण # हे चिन्ह लावतो तेव्हा त्याचा हॅश टॅग अर्थात त्या शब्दाची हायपरलिंक तयार होते. ज्यावर तुम्ही क्लिक करु शकता. असा शब्द जेव्हा जो जो कुणी त्यांच्या पोस्टमध्ये वापरतो तेव्हा त्या क्रीएट झालेल्या लिंकमध्ये त्या सर्व पोस्ट दिसू लागतात.
उदा. मी जर #HappyNewYear असा हॅशटॅग वापरुन एखादी पोस्ट पब्लिश केली तर त्याची एक लिंक तयार होईल आणि तसाच सेम टू सेम हॅश टॅग वापरणार्‍या कोणत्याही व्यक्तीची पोस्टही त्या नव्याने तयार झालेल्या लिंकवर दिसेल. म्हणजे मी मुंबईतून वरील हॅशटॅगवर पोस्ट टाकली आणि एखाद्याने दूर अमेरिकेतून सेम हॅशटॅग वापरुन पोस्ट टाकली. तर आमच्या दोघांच्याही पोस्ट #HappyNewYear या हॅशटॅगच्या लिंक्सवर "एकत्र" दिसू लागतील. त्यामुळे आम्ही दोघे क्षणार्धात एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतो. असा एखादा हॅशटॅग वारंवार किंवा सर्वाधिक वापरला गेला की तो त्या साईटवरिल अथवा सोशल मिडीयातील ट्रेंडींग हॅशटॅग बनतो. म्हणजेच सर्वाधिक चलतीचा हॅशटॅग.

हॅशटॅग कसा असतो?
१. हॅशटॅगमध्ये दोन शब्दांच्यामधील स्पेस म्हणजे जागा चालत नाही. जर दोन शब्दांचा हॅश टॅग बनवायचा असेल तर ते दोन्ही शब्द जोडून घ्यावे लागतात. पण आपण त्या दोन शब्दांमधील फरक पहिले अक्षर कॅपीटल करुन अथवा अंडरस्कोर (_) करुन देऊ शकतो.
उदा. #Happy New Year, # HappyNewYear - चूकीचा
#happynewyear , #HappyNewYear, #Happy_New_Year - बरोबर
परंतु शक्यतो अंडरस्कोर वापरला जात नाही.
येथे पहिल्या उदाहरणात केवळ Happy शब्दालाच # जोडून असल्याने केवळ त्या एका शब्दाचा हॅशटॅग तयार झाला. Y नंतर तो हॅशटॅग संपला. हे ध्यानात ठेवावे. त्या पुढच्या उदाहरणात # आणि H मध्ये स्पेस (अंतर) राहील्याने तिथे कोणताही हॅश टॅग तयारच  झालेला नाही.
म्हणजे हॅशटॅग देताना तो काळजीपूर्वक द्यावा. अन्यथा माझी सकाळ जशी चमत्कारीक झाली तसच इतरांचे तुमच्याबाबतीत होऊ शकेल. 
असो
२. हॅशटॅग देताना तो शब्दाला जोडला आहे की नाही आणि त्याची लिंक तयार झाली आहे की नाही हे पहावे आणि मगच पोस्ट पब्लीश करावी.
३. जेव्हा एखाद्या हॅशटॅगमध्ये तुम्ही अप्परकेस किंवा लोअरकेस कॉम्बिनेशन करता तेव्हा त्याचा रिझल्ट हा सेमच असतो. म्हणजे
#happynewyear , #HappyNewYear या दोन्ही हॅशटॅगचा रिझल्ट सेमच असेल.
४. या हॅशटॅगमध्ये नंबर चालतात. परंतु उदगार्वाचक चिन्ह(!), अल्पविराम(;), स्वल्पविराम(,), प्रश्नचिन्ह(?), इत्यादी इतर चिन्ह आणि स्पेशल कॅरेक्टर ($%*&) चालत नाहीत.

या हॅशटॅगची अशी लिस्ट वगैरे काही नसते तूम्ही तयार कराल तो हॅशटॅग. पण तो ट्रेंडींग करणे किंवा असणे महत्त्वाचचे .

हॅशटॅग कुठे कुठे चालतो?
ट्विटर, फेसबुक, इन्टाग्राम, पिंटरेस्ट, गुगल प्लस, टंब्लर, या मेजर सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर हॅशटॅग चालतो. ट्विटर या हॅशटॅगची जन्मदात्री आहे अस आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही.

आता हॅशटॅगची बेसिक माहिती आपण घेतली पुढच्या भागात हॅशटॅगचा वापर आणि इतर माहिती पाहूया.