Showing posts with label HASHTAG. Show all posts
Showing posts with label HASHTAG. Show all posts

Monday, January 4, 2016

हॅशटॅग ऑन ट्विटर (2)

मागच्या भागात आपण हॅशटॅगबद्दल बेसिक माहिती घेतली.
आत्ता आपण प्रत्येक सोशलमिडीया प्लॅटफॉर्मवर हॅशटॅगचा वापर कसा केला जातो ते पाहू.
खर हॅशटॅग वापरण्याचे सुत्र सर्वत्र समान आहे. पण विविध प्लॅटफॉर्मवर तो परिणाम वेगवेगळा साधतो.
सर्वप्रथम आपण पाहू

हॅशटॅग ऑन ट्विटर


हॅशटॅग सर्वात पहिला वापर ट्विटरने सुरु केला. ट्विटरवर १४० शब्दांची मर्यादा असते. त्या मर्यादेतच आपल्याला आपले म्हणणे मांडायचे असते.  संदर्भासहित स्पष्टीकरण देण्याची ट्विटर ही जागा नव्हे. जे काही आहे ते थोडक्यात आटपायचे. हा ट्विटरचा नेमकेपणा प्रसिद्ध आहे. सोशल मिडीया साईटसमधील ट्विटर हे या नेमकेपणासाठी अधिक लोकप्रिय आहे. आता नेमके बोलायचे पण संदर्भ तर लागला पाहिजे ना! मग अशावेळी हॅशटॅग आपल्याला कामी येतात. कारण त्या एका हॅशटॅगमध्ये सारा संदर्भ दडलेला असतो. 

उदा. #MakeInIndia हा भारत सरकारचा एक उत्तम उपक्रम आहे...त्याचाच हा हॅशटॅग. जेव्हा एखाद्याला या संदर्भात पोस्ट टाकायची असते किंवा आपले मत मांडायचे असते किंवा एखादी अपडेट द्यायची असते तेव्हा ती व्यक्ती या हॅशटॅगचा वापर करते. मग या संदर्भातील विविध ठिकाणच्या बातम्या आपल्या या एका ठिकाणी पहायला मिळतात. https://twitter.com/hashtag/MakeInIndia हे असे त्याचे पेज तयार होते. त्यावर लाईव्ह, न्यूज, फोटोज, व्हीडीओ, अनेकविध पर्यायामधून #MakeInIndia आपल्याला माहिती उपलब्ध होते. तसेच हा हॅशटॅग गुगलच्या सर्चमध्ये जरी टाकला तरी आपल्याला वरील संबंधीत पेज दिसू लागते. त्यासाठी ट्विटरला लॉग इन असण्याची आवश्यकता आहे असे नाही.

आता वरील #MakeInIndia हॅशटॅगला ट्विटरने सिंहाचा इमोजी सुद्धा दिला आहे. ट्विटरवर अधिकृत इमोजी मिळवणारा मेक इन इंडिया हा पहिला अमेरिकेच्या बाहेरील ब्रॅंड आहे.

ट्विटरवर सर्वात ट्रेंडिंग हॅशटॅग कोणते आहे त्याची माहिती मिळते. जसे तुम्ही हॅशटॅग वापरता त्या प्रमाणे  तुमच्या पोस्टला जास्त इंप्रेशन मिळते.

ट्विटरच्या हॅशटॅगचे सामाजिक महत्त्व खुप आहे. याच ट्विटर हॅशटॅगचा वापर करुन कोणतेही आंदोलन छेडता येते आणि कोणताही कार्यक्रम (कॅपेंन) सुरु करता येतो. ही प्रमुख आणि विशेष बाजू हॅशटॅगची आहे. एखाद्या गोष्टीसाठी आवाज उठवून जनमत तयार करण्यासाठी ह्या ट्विटर हॅशटॅगचा वापर करण्यात येतो. तसेच या हॅशटॅगचा वापर करुन डिजिटल भांडणे देखील होत असतात. तसेच एखाद्या चांगल्या विचाराच्या प्रसारासाठी जनजागृती करण्याचे कार्य सुद्धा हॅशटॅगचा वापर करुन करता येते. यात माझ्या लक्षात राहण्यासारखा हॅशटॅग म्हणजे #SelfieWithDaughter.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात मधून या हॅशटॅगची घोषणा केली होती. स्त्री भूण हत्येमुळे मुले आणि मुलींच्या जन्मदरात निर्माण होणारी तफावत लक्षात येऊन ही गोष्ट बंद व्हावी यासाठी जनजागृती करण्यासाठी (बेटी बचाओ बेटी पढाओ या सरकारी कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी) या हॅशटॅगचा वापर करण्याचे त्यांनी सुचविले होते. ही आयडीया त्यांना हरियाणाच्या एका गावाच्या सरपंचाकडून मिळाले. खरे तर हे कॅंपेन त्या सुनिल जगलन या सरपंचाने सुरु केले होते. पतंप्रधानांनी ते उचलून दिले व सर्वांना त्यांच्या मुलींसोबतचे फोटॊ ट्विटरवर #SelfieWithDaughter या हॅशटॅगने अपलोड करण्यास सांगितले होते.नुसते फोटो नाही तर आपल्या मुलीबद्दल एखादी ओळ लिहण्यास ही सांगितले होते. हा हॅशटॅग भारतात आणि भारताच्या बाहेर टॉप ट्रेंडींग झाला. अनेक माता पित्यांनी आपल्या मुलींबरोबरचे सेल्फी या हॅशटॅगबरोबर अपलोड केले. आपल्याला मुलगी आहे याचा अभिमान व्यक्त केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या मुलीबरोबर फोटो अपलोड केला होता.


यातून फायदा काय आणि कसा झाला? तर समाजाची देखील एक मानसिकता असते. ती बदलण्यासाठी अथवा सुधारण्यासाठी जनजागृती हाच एक मार्ग आहे. #SelfieWithDaughter हॅशटॅगने मुलगी असण्याचे महत्त्व काय असते हे समाजमनाला पटून स्त्री भ्रूण हत्या थांबतील ही भाबडी आशा करायला काय हरकत आहे. खर तर ही गोष्ट केवळ हॅशटॅगने साध्य होत नाही. पण निदान मन तरी तयार होते. याची एक दुसरी बाजू म्हणजे ज्यांना मुलगी नाही ते यात सहभागी होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याकडे मुलगी हा मौल्यवान असा दागिना नाही....मुलगी असलेल्या अनेक पित्यांसारखी  समाधानाची झूल नाही याची खंत मनात निर्माण होऊ शकते व आपल्याला ही मुलगी हवी असा सकारात्मक विचार मनात पेरला जाऊ शकतो. हा हॅशटॅग हे आजच्या डीजिटल युगाचे जनजागृतीचे माध्यम आहे. हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. पण त्यातही यासाठी ट्विटरवरील हॅशटॅगला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आपल्याला आपल मत चटकन जगासमोर मांडता येते. समजा तुम्ही एखादा चित्रपट पाहिला आणि तुम्हाला तो नाही आवडला. तर तसा हॅशटॅग तयार करुन तुम्ही तुमच मत मांडू शकता. तुमचे समविचारी या हॅशटॅगचा वापर करुन त्यांचे मत मांडतील. मग तो चित्रपट खरच चांगला आहे की नाही यावर तुम्हाला विविध मत मिळू शकतात. बॉक्स ऑफीसवर मग तो चित्रपट गाजो अथवा न गाजो पण तुम्हाला जनमत ट्विटर हॅशटॅगवरुन कळू शकतो.

जसा या हॅशटॅगचा वापर चांगल्यासाठी केला जातो तसाच दिशाभूल करण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे आपल्या खांद्यावर आपले डोके ठेवूनच ह्या हॅशटॅगचा वापर त्याचे अ‍ॅनालिसिस करावे. हॅशटॅग्सच्या आहारी जाऊ नये. कारण कोणता हॅशटॅग कोणत्या हेतू खातर केला जातो आणि त्यातून काय परिणाम साधला जातो हे आपल्यासारख्या "सामान्यांना" कळू शकत नाही.

- रेश्मा नारखेडे

Part - 1 - http://www.aniruddhafriend-reshmashaileshnarkhede.com/2015/12/what-is-hashtag.html
 

Wednesday, December 23, 2015

हॅशटॅग- जागतिक व्यासपीठ -1



एका सकाळी उठल्या उठल्या नविनच संकल्पनेची मला ओळख झाली. सकाळी फोन वरचे मॅसेज वाचत असतान एका मित्राच्या मॅसेजने फार सतावले. मेसेजचा प्रत्येक शब्द वाचण्याच्यामध्ये # असं काहीतरी होते. सुरवातीला मला कळेच ना!! ही कोड लॅंग्वेज आहे की एरर आहे. सारख आपल्या प्रत्येक शब्दाच्या मध्ये सो कॉल्ड हॅशटॅग. शेवटी मी त्या मित्राला फोन करुनच काय तो निरोप विचारला आणि थोडस अज्ञान दूर होत का याचा प्रयास केला..अर्थातच माझ अज्ञान...त्याने मोठ्या दिलदार वृत्तीने मला हॅशटॅगची ओळख करुन दिली.
खरच ती ओळख इथे मी मांडत नाही पण त्याने दिलेल्या ओळखी नंतर मला खरच हॅशटॅगचा अभ्यास करावासा वाटला आणि तोच मी इथे देत आहे. 

या इंटरनेटच्या दुनियेत आपल्याला जोडणारा फॅक्टर म्हणजे लिंक्स. आता लिंक्स म्हटल की आपल्या डोळ्यासमोर पटकन येते ती www. पासून सुरु होणारी लिंक. हॅशटॅगच्या वापराने देखील इंटरनेटवर लिंक्स तयार होतात पण त्याचा वापर..हेतु..आणि परिणाम हा वेगवेगळा असू शकतो
इंटरनेटने जग जवळ आणलेय तर हॅशटॅग्सने ते आणखीन घट्ट जोडले जातेय.
हॅश टॅगच्या बाबतीत जेव्हा मी विचार करते तेव्हा मला ते स्वतःहुन स्वतःसाठी केलेले जागतिक व्यासपीठच वाटते.
बघा विचार केला....एखाद जागतीक व्यासपीठ तुमच्यासाठी तेही तुम्हाला करता आले तर? आणि तेही केवळ # या एका चिन्हामुळे. आणि आज हा हॅशटॅगचा वापर असाच होतोय. पण अजूनही अनेकजण याच्या नेमक्या वापराबद्द्ल खूपच दूर आहेत.

हॅशटॅग म्हणजे काय?
हॅशटॅग म्हणजे सोशल मिडीया किंवा मायक्रोब्लॉगिंग सुविधेमध्ये वापरण्यात येणारा असा एक लेबल किंवा मेटाडाटा टॅग आहे ज्याचा वापर करुन आपण विशिष्ठ माहिती मिळवू अथवा पोहचवू शकतो. 
अधिक विस्ताराने पहायचे झाले तर, सोशल नेटवर्कींगमध्ये जेव्हा एखाद्या शब्दाच्या आधी आपण # हे चिन्ह लावतो तेव्हा त्याचा हॅश टॅग अर्थात त्या शब्दाची हायपरलिंक तयार होते. ज्यावर तुम्ही क्लिक करु शकता. असा शब्द जेव्हा जो जो कुणी त्यांच्या पोस्टमध्ये वापरतो तेव्हा त्या क्रीएट झालेल्या लिंकमध्ये त्या सर्व पोस्ट दिसू लागतात.
उदा. मी जर #HappyNewYear असा हॅशटॅग वापरुन एखादी पोस्ट पब्लिश केली तर त्याची एक लिंक तयार होईल आणि तसाच सेम टू सेम हॅश टॅग वापरणार्‍या कोणत्याही व्यक्तीची पोस्टही त्या नव्याने तयार झालेल्या लिंकवर दिसेल. म्हणजे मी मुंबईतून वरील हॅशटॅगवर पोस्ट टाकली आणि एखाद्याने दूर अमेरिकेतून सेम हॅशटॅग वापरुन पोस्ट टाकली. तर आमच्या दोघांच्याही पोस्ट #HappyNewYear या हॅशटॅगच्या लिंक्सवर "एकत्र" दिसू लागतील. त्यामुळे आम्ही दोघे क्षणार्धात एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतो. असा एखादा हॅशटॅग वारंवार किंवा सर्वाधिक वापरला गेला की तो त्या साईटवरिल अथवा सोशल मिडीयातील ट्रेंडींग हॅशटॅग बनतो. म्हणजेच सर्वाधिक चलतीचा हॅशटॅग.

हॅशटॅग कसा असतो?
१. हॅशटॅगमध्ये दोन शब्दांच्यामधील स्पेस म्हणजे जागा चालत नाही. जर दोन शब्दांचा हॅश टॅग बनवायचा असेल तर ते दोन्ही शब्द जोडून घ्यावे लागतात. पण आपण त्या दोन शब्दांमधील फरक पहिले अक्षर कॅपीटल करुन अथवा अंडरस्कोर (_) करुन देऊ शकतो.
उदा. #Happy New Year, # HappyNewYear - चूकीचा
#happynewyear , #HappyNewYear, #Happy_New_Year - बरोबर
परंतु शक्यतो अंडरस्कोर वापरला जात नाही.
येथे पहिल्या उदाहरणात केवळ Happy शब्दालाच # जोडून असल्याने केवळ त्या एका शब्दाचा हॅशटॅग तयार झाला. Y नंतर तो हॅशटॅग संपला. हे ध्यानात ठेवावे. त्या पुढच्या उदाहरणात # आणि H मध्ये स्पेस (अंतर) राहील्याने तिथे कोणताही हॅश टॅग तयारच  झालेला नाही.
म्हणजे हॅशटॅग देताना तो काळजीपूर्वक द्यावा. अन्यथा माझी सकाळ जशी चमत्कारीक झाली तसच इतरांचे तुमच्याबाबतीत होऊ शकेल. 
असो
२. हॅशटॅग देताना तो शब्दाला जोडला आहे की नाही आणि त्याची लिंक तयार झाली आहे की नाही हे पहावे आणि मगच पोस्ट पब्लीश करावी.
३. जेव्हा एखाद्या हॅशटॅगमध्ये तुम्ही अप्परकेस किंवा लोअरकेस कॉम्बिनेशन करता तेव्हा त्याचा रिझल्ट हा सेमच असतो. म्हणजे
#happynewyear , #HappyNewYear या दोन्ही हॅशटॅगचा रिझल्ट सेमच असेल.
४. या हॅशटॅगमध्ये नंबर चालतात. परंतु उदगार्वाचक चिन्ह(!), अल्पविराम(;), स्वल्पविराम(,), प्रश्नचिन्ह(?), इत्यादी इतर चिन्ह आणि स्पेशल कॅरेक्टर ($%*&) चालत नाहीत.

या हॅशटॅगची अशी लिस्ट वगैरे काही नसते तूम्ही तयार कराल तो हॅशटॅग. पण तो ट्रेंडींग करणे किंवा असणे महत्त्वाचचे .

हॅशटॅग कुठे कुठे चालतो?
ट्विटर, फेसबुक, इन्टाग्राम, पिंटरेस्ट, गुगल प्लस, टंब्लर, या मेजर सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर हॅशटॅग चालतो. ट्विटर या हॅशटॅगची जन्मदात्री आहे अस आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही.

आता हॅशटॅगची बेसिक माहिती आपण घेतली पुढच्या भागात हॅशटॅगचा वापर आणि इतर माहिती पाहूया.