Monday, July 27, 2015

अनिरुद्ध बापू यांचे जुने फोटो

#aniruddhabapu, #oldphotos #memories
माझे सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे  जुने फोटो समिरदादांनी नुकताच प्रकाशित केले. हे एक आठवणीचे गाठोडे माझ्या ब्लॉगवरही असावे म्हणून इथे पुन्हा देत आहे. 

Param pujya aniruddha bapu in shirdi rasayatra
श्रीक्षेत्र शिरडी रसयात्रा - दिनांक २२-०९-१९९६ रोजी रात्रौ ११ वाजता सुरु झालेला सत्संग पहाटे ३.३० पर्यंत सुरु होता.
 त्यावेळी पहाटे ३.३० वाजता बापुंच्या मुखातून ब्रह्म वाणी स्त्रवली. 
“मी जो कोणी आहे तो आहे. मी ऋत आहे. मी नित्य आहे व मी सत्य आहे. 
माझा आणि माझ्या गुरुचा युगानुयुगे संबंध आहे” त्यावेळी घेतलेला फोटो.

Param pujya aniruddha bapu in shirdi rasayatra
श्रीक्षेत्र शिरडी रसयात्रा - उत्सवाच्या दुसर्या दिवशी रसयात्रेच्या सांगता समारोपाच्या वेळी 
परमपूज्य बापू व परमपूज्य नंदाईने पेरु या फळाचा प्रसाद सर्वांना वाटला. 
तो प्रसाद स्विकारताना श्री.सुहाससिंह डोंगरे.
परमपूज्य बापूंच्या मागे सौ.मीनावैनी दाभोलकर उभ्या आहेत.
दिनांक : २३-०९-१९९६


Param pujya aniruddha bapu in akkalkot rasayatra
श्रीक्षेत्र #अक्कलकोट रसयात्रा - जिथे निवास केला होता तिथे श्रद्धावानांबरोबर गजर करताना 
परमपूज्य बापू व परमपूज्य सुचितदादा.
(स्थळ : सर्जेराव जाधव सभागृह, अक्कलकोट)

Param pujya aniruddha bapu in akkalkot rasayatra
श्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रेच्या वेळी श्रद्धावानांबरोबर भोजन करताना परमपूज्य बापू व परमपूज्य सुचितदादा.
 (मागील रांगेत श्री. व श्रीमती महागांवकर, सौ.अनितावीरा वागळे, 
श्रीमती वागळे आणि स्टेजवर उभा कार्यकर्ता सेवक शरदसिंह नागवेकर)
दिनांक : १२-०९-१९९७ (रसयात्रा - ११-०९-९७ ते १४-०९-९७)



Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma