Friday, January 25, 2013

Googling 3 - The Story of Send


आता आपण ईमेल सर्रास वापरतो. इथून मी ई-मेल पाठविला की दुसर्‍या क्षणाला तो ई-मेल ज्याला पाठवला आहे त्याला पोहचलेला असतो. किती इंस्टंटली पोहचतो ना! कधी कधी अगदी बाजूच्या माणसाला देखील पटकन पोहचत नाही तेव्हा आपण वैतागतो. यावेळी आपण अगदी सहज रिऍक्ट केलेले असते. पण आपल्याला सहज असे मिळणार्‍या मेलचा प्रवास हा ईतका सहज असतो का? ह्या एका ईमेलचा प्रवास पाहणे, जाणणे खरच इंटरेस्टींग आहे आणि तेही ऍनिमेशनच्या रुपात.

गुगलने त्यांच्या ईमेलचा प्रवास एका सुंदर ऍनिमेशन मधून दाखविला आहे. हा प्रवास पाहणे खरंच चुकवू नका. आपण अनेक प्रवासवर्णने वाचली असतील..पण मी निश्चितच सांगू शकते की "एका ईमेलचे" प्रवासवर्णन तुम्हाला नक्कीच आवडेल. 

खर तर हा संपूर्ण प्रवास शब्दात मांडायचा होता मात्र गुगलच्या ऍनिमेशनपुढे त्याची गरज नाही. गुगल ग्रीनने पुढाकार घेऊन ही स्टोरी मांडली आहे. गुगलच्या सस्टेंबिलीटीबद्दल खरोखरीने जाणून घ्यायचे असेल तर गुगल ग्रीन (Google Green) वेबसाईट पाहणे अत्यंत आवश्यक आहे. 

एका सामान्य माणसाला मदतीच्या दृष्टीने गुगल ग्रीन फारसे महत्त्वाचे कदाचित ठरणार नाही. मात्र, काही सेकंदाच्या आता प्रचंड माहितीची देवाण-घेवाण कशी सहज होते हे जाणून घेणे खरच इंटरेस्टींग ठरेल. त्याचबरोबर पर्यावरणास हितकारक असे गुगल कसे काम करते हे पाहणे देखिल इंटरेस्टींग आहे.  

स्टॊरी ऑफ सेंड ( The Story of Send) पाहताना आपल्याला गुगलची ऍनिमेशनची क्लासिक स्टाईल पाहण्यास मिळणार आहे. हा मेल विविध स्टेजमधून प्रवास करताना आजूबाजूला आनंदाचे प्रसन्नतेचे आणि मुख्य म्हणजे रिलॅक्सेशनचे वातावरण ठेवण्याची शक्कल गुगलने सॉलिड लढवलेली आहे. इतकी किचकट प्रोसेस सहजरित्या होत असते हे या ऍनिमेशनमधून सहज आपल्या मनावर बिंबते. खरच अमेझींग आहे. हॅटस ऑफ टू मेकर्स ऑफ धीस ऍनिमेशन....श्रीराम...अंबज्ञ





Thursday, January 24, 2013

Googling 2 - ..Please Takeaway....TAKEOUT


मला एक सांगा....तुमचा गुगलवर किती डेटा आहे. सांगू शकाल. एकत्रित करु शकाल...नाही ना!! गुगलच्या आपल्याच माहितीमध्ये आपण कधी हरवून जाऊ हेच कळणार नाही. आणि तुम्हाला हा डेटा एकत्रित हवा असेल तर काय करणार. किंबहुना असा विचार देखिल तुम्ही केला नसेल ना! परंतु हा विचार मला तरी करावा लागला..जेव्हा गुगलने त्यांची बझची सर्व्हीस बंद केली तेव्हा. बझवर माझ्या काही कविता, काही विचार पोस्ट केलेल्या होत्या. मात्र बझ बंद झाल्यानंतर मला ते पुन्हा मिळविणे कठीण झाले होते. काहीतरी सर्च करुन एखादी पोस्ट मिळायची खरी पण त्यात काही समाधान नव्हते. 

मग एके दिवशी असच गुगलींग करताना मला सापडले "टेकआऊट" "google takeout" या गुगल टेक-आऊटवरुन मी बझच काय तर त्या जी मेलच्या आय डी वर असणारी प्रत्येक गुगल प्रोडक्टवरील माहिती मी एकत्रित रित्या डाऊनलोड करुन घेऊ शकले. आहे ना अमेझिंग!! 

गुगलच्या डाटा लिबरेशन फ्रंट (Data Libration Front) या इंजिनियरिंग टीमने "गुगल टेकाआऊट हा प्रोजेक्ट सुरु केला आहे. युजर्सना त्यांचा डाटा गुगलच्या बाहेर नेता यावा यासाठी ही टीम प्रयत्न करीत असते. त्यांनीच हे गुगल टेकआऊट सुरु केले आहे. 

गुगलच्या प्रोडक्टसमधील आपला डेटा आपण एका झिप फाईलमध्ये डाऊनलोड करुन घेऊ शकतो. 
सध्या टेकआऊटमधून गुगल प्लस Google Plus, बझ Google Buzz, कॉन्टेक्टस Contacts, डाईव्ह Drive, गुगल + सर्कल्स, गुगल + स्ट्रीम, लॅटीट्युड Latitude, पिकासा वेब अल्बम्स Picasa Web Album, प्रोफाईल, रिडर Reader  व्हॉईस, युट्युबचा You Tube डेटा आपण मिळवू शकतो. 

सध्या तरी टेकआऊट लिमिटेड प्रोडक्टससाठी अव्हेलेबल आहे. मात्र युट्युबसाठी लेटेस्ट ही सुविधा देऊ केलेली आहे. याचा वापर करुन यु ट्युबवरील तुमचे सर्व व्हीडीयो फाईल्स एका झिप फाईल घेऊ शकतात. २०११ च्या जूनमध्ये गुगलने ही टेकआउट सर्व्हीस सुरु केली. 

Saturday, January 19, 2013

Googling 1 - Make My Drive


गुगल माहित असणार्‍याला आत्तापर्यंत गुगल ड्राईव्हची (Google Drive) नक्कीच ओळख झाली असेल. अगदी वापरले नसले तरी ऐकून तरी माहित असेल. सामान्यपणे तुमचा कॉम्प्युटर मधील फाईल्स तुम्ही गुगलच्या या ड्राईव्ह क्लाऊडवर ठेवू शकता. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डी ड्राईव्ह, सी ड्राईव्ह असे तुम्ही स्टोरेज डिस्क पाहिल्या असतील. पण आता गुगलने देखील तुम्हाला गुगल ड्राईव्ह उपलब्ध करुन दिला आहे. क्लाऊड कॉम्प्युटींग (Cloud Computing) या संकल्पनेवर आधारित असणारे हे गुगल ड्राईव्ह तुमचे नवीन स्टोरेज डिस्क होऊ शकते आणि ती तुम्ही कुठऊनही अ‍ॅक्सेस करु शकता. 
यापासून सुरुवात झालेल्या गुगल ड्राईव्हने आता अजून एक उडी घेतली आहे. गुगलने आता थर्डपार्टी अ‍ॅप्स ड्राईव्ह सोबत इंटीग्रेट करण्यास सुरुवात केली आहे.

गुगल ड्राईव्हचे अ‍ॅप्स हे सामान्य वेब अ‍ॅप्सप्रमाणेच कार्य करतात. फरक इतकाच की हे अ‍ॅप्स फाईल्स वेब सर्व्हर्वर सेव्ह न करता गुगल ड्राईव्हवर सेव्ह करतात. उदाहरण तुम्ही एखादा फोटो एडीट केला तर तो पुनश्च गुगल ड्राईव्हवर सेव्ह करता येतो. हे अ‍ॅप्स तुम्हाला गुगल क्रोमच्या बेव स्टोरवर मिळतील. तिथे गुगल ड्राईव्ह अ‍ॅप्सची पूर्ण यादी मिळेल.  इथून तुम्ही अ‍ॅप्स इन्स्टॉल करु शकता.
गुगल ड्राईव्हच्या वेबसाईटवरुन प्रत्येक फाईल तुम्ही वेगवेगळ्या अ‍ॅप्समध्ये ओपन करु शकता. तसेच तूम्ही थेट अ‍ॅप्स देखील उघडू शकता, 
Google_Drive

आता तुम्हाला कोण कोणते अ‍ॅप्स मिळतात ते पाहू. 

१) प्लिक्सर एडिटर (Pixlr Editor) - पिक्सर हे एक अडवान्स वेब बेस इमेज एडीटर आहे. याचा संपूर्ण लूक हा अ‍ॅडॉब फोटोशॉप सारखा आहे. 
Pixlr_Editor

२) पिकमंकी PicMonkey- हे देखील फोटो एडीटींग आणि फोटो रिटच करणारे अ‍ॅप आहे. पॉप्युलर फोटो एडीटर पिकनिक गुगलने घशात घातल्यानंतर पिकनिकच्या इंजिनियर्सनी हे अ‍ॅप तयार केले आहे. यातून जलद फोटॊ एडीट होतो.
PicMonkey

३) ड्राईव्ह नोटपॅट Notepad++ - गुगल ड्राईव्ह कडे गुगल डॉक्स आधीपासूनच आहे. मात्र त्याचा वापर वर्ड प्रोसेसिंग प्रोग्रॅमसारख आहे. पण जर नोटपॅड++ कोड लिहण्यासाठी वगैरे हवा असेल तर ड्राईव्ह नोटपॅड हे मस्त अ‍ॅप आहे.
Notpad
Add caption

४) ड्राईव्ह ट्यून DriveTunes - हे एक म्युझिक प्लेयर आहे. जे ड्राईव्हमधील गाणी ऐकविण्यास मदत करते. याच्या मदतीने तुम्ही गुगल ड्राईव्हचा वापर म्युझिक प्लेअर म्हणुन देखील करु शकता. 
Drive_Tunes
Add caption

५) व्हीव्हीडीओ WeVideo - हे अत्यंत सोपे असे ऑनलाईन व्हीडीओ एडीटर आहे.

Wevideo

६) हॅलो फॅक्स HelloFax  - हे एक फ्री ऑनलाईन फॅक्स टूल आहे. ज्याचा वापर करुन तुम्ही फॅक्स पाठवू शकता आणि रिसिव्ह देखील करु शकता. खर्‍या अर्थाने पेपरलेस ऑफीससाठी हे फार महत्त्वाचे टूल आहे. 

Hello_Fax

७) पिडीएफझेन PDFzen, - गुगल ड्राईव्हला इन बिल्ट पीडीएफ व्हीवर आहे, मात्र त्यात एडीटींग फिचर्स नाहीत. मात्र ह्या अ‍ॅपच्या मुळे तुम्ही पिडीएफ देखील एडीटकरु शकता. 

PDFzen

गुगल ड्राईव्हचे आत्तापर्यंत १०० हून अधीक अ‍ॅप्स आहेत. ज्याचा वापर करुन जगाच्या पाठीवर मी कुठेही माझ्या ऑफीसचे वाट्टेल ते कॉम्प्युटरचे काम करु शकते आणि त्यासाठी मला टॅबलेट देखील पुरेसा आहे... आहे ना इंटरेस्टींग!
Source : http://www.makeuseof.com/tag/making-the-most-of-google-drive-with-integrated-apps/

Monday, January 7, 2013

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी

हरि ॐ 
जुन्या वर्षाची समाप्ती आणि नव्या वर्षाचा आरंभ एका अमानुष घटनेच्या प्रभावाखालीच झाला. दिल्ली गॅंगरेप प्रकरण त्याची हादरवणारी सत्य कथा पाहून विचार सुन्न झाले. आजच्या काळात एका स्त्रीला सुरक्षितता नावाला देखिल उरलेली नसल्याचे दिसून येते. दिल्ली गॅंगरेप प्रकरणाबरोबरच अशा अनेक बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. अगदी हा विषय इतका तापलेला असताना देखिल बलात्कार होतच आहे. काय समजायचे यास? वासनेपुढे विचारशक्तीच गोठल्याचे हे चांगलेच उदाहरण आहे. कसलीस भिती न उरलेल्या नराधमांकडून दुसरी अपेक्षा तरी काय....कितीही मोठा आणि कठोर कायदा आला तरी शोषिताचे दुःख शेवटी शोषिताचेच असते. ह्या अशा शोषणाला सामोर्‍या गेलेल्या शोषिताची जी हानी होते ती कश्यानेच भरुन येणारी नसते. दिल्ली गॅंगरेप घटनेतील पिडीत मुलीला आज बहादूर असे संबोधले जाते. ती मृत्यूशी कडवी झुंज कशी देत होती हे आपण सारे पाहत होतो. पण एक गोष्ट आपण विसरतो..."त्याशिवाय तिला काही पर्यायच उरत नव्हता..." आणि हे विदारक सत्य आहे. प्रत्येक पिडीत त्याच्यावर झालेल्या शोषणाच्या विरोधात लढू पाहतो...पण त्याची ती जखम कधीच भरुन येत नसावी. कारण दुःख शेवटी त्याला भोगायला लागले आहे. असे दुःख ज्यांनी भोगले नाही त्यांना बोलणे सोपे असते पण.....

या अशा अनेक घटनांनी समाजात वावरताना स्त्रीचा आत्मविश्वास पूर्णपणे तुटतो. ती सतत भितीच्या छायेत वावरत राहते. यावर उपाय होणे आवश्यक आहे. कठोर कायदा करुन गुन्हेगारांना शिक्षा दिलीच पाहीजे मात्र त्या आधीच गुन्हा होऊच शकणार नाही अशी यंत्रणा असणे आवश्यक आहे. कोण बनवेल अशी यंत्रणा...?

हा प्रश्न सगळ्यांच पडला. पण उत्तर मात्र एका ठिकाणाहूनच आले. परम पूज्य बापूंनी जाहीर केलेली पाच कलमे. अध्यात्माच्या माध्यमातून स्वसंरक्षणाची यंत्रणा बापूंनी दिली. बापूंच्या या पाच कलमांनी नुसता आत्मविश्वासच नाही तर निडरपणे समाजात वावरण्याची शक्ती देखील आली आणि स्वसंरक्षण हे खर्‍या अर्थाने स्वसंरक्षण कसे असू शकते ते कळले. पाच कलमे तर बापूंनी आता जाहिर केली. परंतु २००२ पासूनच स्त्रीयांना स्वसंरक्षण करता यावे साठी बापूंनी अहिल्या संघ सुरु केले आहे. या अहिल्या संघातून अनेक स्त्रीयांनी बलविद्या आणि प्राच्यविद्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

काहीही चूक नसताना शिळा झालेल्या अहिल्येसारखीच गत स्त्रीयांची आहे. "स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी". कोणत्याही स्त्रीला या अहिल्येसारखे शिळा होऊन रहावे लागू नये म्हणून बापूंची आणि नंदाईची धडपड स्त्रीला अधिकाधिक सक्षम, सामर्थ्यवान बनवेल ही शंकाच नाही.....कारण कुणी मदतीला येईल ही अपेक्षा ठेवून कलियुगात वावरल्यास हाती फक्त निराशाच येईल...त्यामुळे आपली मदत आपण स्वतःच करणे आवश्यक आहे......सदैव पाठीशी असणार्‍या भाऊ, पिता, मुलगा, मित्र, सद्‍गुरु अनिरुद्धांनी दिलेला आधार घेऊन....
हरि ॐ

आश्‍वासक बापू

ll हरि ॐ ll
 कालच्या श्रीहरिगुरुग्राम येथील आपल्या प्रवचनात, श्रीअनिरुद्धांनी भारतात नुकत्याच घडलेल्या काही घटनांवर भाष्य केलं; ज्या घटनांमुळे अख्खा भारत हादरून गेला, ढवळून निघाला. प्रत्येक सुज्ञ आणि संवेदनशील भारतीय नागरीक ह्या घटनांनी व्यथित झाला. बापूंनी त्यांच्या ह्या प्रवचनामध्ये त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना एक आश्वासक दिलासा दिला.