His Teachings

बापूंकडे असे काय आहे की इतकेजण त्यांना फॉलो करतात? हा तर अगदी कॉमन प्रश्न सगळ्या बापू भक्तांना विचारला जातो. आणि बापू स्वतः याचे सरळ उत्तर देतात की "माझ्याकडे फक्त प्रेम आहे"

हो खरचं, बापूंकडे फक्त प्रेम आणि प्रेमच आहे. तेही लाभेवीण प्रेम. माणसाला आयुष्यात सगळ काही मिळविता येते. पण एक प्रेमच, खर प्रेमच अशी गोष्ट असते की ती मिळवता येत नाही. पण हा अनिरुद्ध प्रेमसागर अफाट आहे. याच्याकडे अफाट प्रेम आहे. आम्हीच कमी पडतो हे प्रेम स्वीकारण्यासाठी. कारण जाताना आम्ही चमचा, वाटी, बालदी, पिंप घेऊन जातो. अरे कशाला घेऊन जायचे हे सारं. जाऊन फक्त प्रेमसागरात झोकून द्यायचे. शरीराची प्रत्येक पेशी न् पेशी, मनाचा कण न कण त्याच्या प्रेमाने भिजवून टाकायचा असतो. आणि प्रेम बापूंच्या वाणीतून, बापूंच्या लेखणीतून, बापूंच्या विचारांतून, कृतीतून, डोळ्यातून इतकच काय तर फोटोतून अव्याहतपणे वाहत असते. ते फक्त स्वीकारायचे असते. स्वीकारण्यासाठी त्या प्रेमाची जाणीव होणे फक्त आवश्यक असते. एकदा का ही जाणीव झाली की या अनिरुद्ध प्रेमसागराच्या भन्नाट लहरींवर सराईतपणे आपला प्रवास सुरु होतो. तोही अखंड पणे.

ही जाणीव देखील बापूंच्या शिकवणितून निर्माण होते. बापू काय शिकवितात? तर बापू लाईफ सायन्स शिकवितात. अगदी साध्या सरळ सोप्या शब्दात त्यांनी अनेक मोठी मोठी रहस्य उलघडून आणि समजावून सांगितली आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या की आयुष्य अगदी नितळ आणि सरळ होऊन जाते.

परम पूज्य बापू दर गुरुवारी न्यू इंग्लिश स्कूल, बांद्रा पू  अर्थात श्री हरिगुरुग्राम येथे प्रवचन करतात. प्रवचन म्हणजे त्यांचा हा थेट संवाद असतो. अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे, मार्गदर्शन या प्रवचनातून मिळते. माझ्या आयुष्यातील अमूल्य खजिना म्हणजे बापूंचे प्रवचन आहे. बापूंनी सुरुवातीला विष्णूसहस्त्रनामावर प्रवचन केली. मग रामरक्षेवर, आता गुरुक्षेत्रम मंत्रावर प्रवचने सुरु आहेत. तसेच हिंदीमध्ये ललितासहस्त्रनामावली, राधासहस्त्रनामावलीवर प्रवचन केली व आता श्री साईसत्तचरित्रावर व बाबांच्या अकरा वचनांवर प्रवचन सुरु आहे.

 
या प्रवचनातून बापूंनी रामायण समजवून सांगितले, त्रिविक्रमाची ओळख करुन दिली त्याचे अल्गोरिदम शिकवत आहे. साईनाथांची ओळख करुन दिली. अशा अनेक छोट्या मोठ्या सत्य गोष्टी सांगून प्रबोधन केले. अनेक रुढी परंपरामागिल सत्य सांगून खरे वैदिक भारतीय संस्कारांचा पाया मजबूत केला. असे खुप काही आहे. बरीचशी सर्व प्रवचने अनिरुद्ध बापू वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

बापूंनी सहा ग्रंथ लिहले...त्यातील श्रीमद्‍पुरुषार्थाचे तीन खंड म्हणजे गाईड्स आहे. अतीशय सुंदर असे हे ग्रंथ असून यांची भाषा अत्यंत सोप्पी आहे. जे काही म्हणून चांगले आणि पावित्र्य हेच प्रमाण ह्या अंतर्गत आहे ते सारं या तीन ग्रंथात आहे. आहार, विहार, आचार, विचार, उपासना, व्रते, साधना, योग इत्यादी सर्व या तीन ग्रंथांमध्ये एकवटले आहे. "अवघाची संसार सुखाचा करण्यासाठी" हे तीन ग्रंथ जणू पाठ्यपुस्तकच आहेत. यातील बर्‍याच गोष्टी बापूंनी त्यांच्या प्रवचनातून देखील सांगितल्या आहेत.

त्यानंतर बापूंनी रामरसायन हा ग्रंथ लिहला. या रामरसायन ग्रंथामध्ये अगदी थोडक्यात संपूर्ण रामायण बापूंनी सांगितले आहे. अत्यंत गोड व मधूर असा आनंद देणारा हा रामरसायन ग्रंथ जरुर वाचला पाहीजे. दररोज रात्री या ग्रंथाचे पठण श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रममध्ये श्रद्धावान करीत असतात.

बापूंनी दोन अफलातून असे ग्रंथ लिहले आहेत. खर तर त्यांच्या आई चण्डिकेचे हे गुणसंकीर्तन आहे. मातृवास्तल्यविंदानम आणि मातृवात्सल्य उपनिषद. गायत्रीमाता, महिषासुरमर्दिनी आणि अनसूयामाता यांचे आख्यान मातृवात्सल्यविंदानममध्ये आहे. बापू सांगतात,"हा ग्रंथही आहे, हे गुणसंकिर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे, ही भक्तिभागीरथी आहे व आदिमातेचे आख्यान तर आहेच आहे. परंतु ह्या सर्वांच्या पलीकडे हे माझ्या आदीमातेचे शुभंकरा आणि अशुभनाशिनी स्वरुप आहे, वात्सल्य आहे व वरदानही आहे. "
मातृवात्सल्य उपनिषद तर अतिशय भन्नाट आहे. मोठ्या आईशी, तिच्या पुत्राशी, चण्डिकाकुलाशी अनुसंधान बांधण्याचे, त्यांच्याशी कायमचे जोडून घेण्याचे मार्गदर्शन ह्यात आहे असे मला वाटते. ह्यात येणार्‍या विविध प्रार्थना तर अतीशय सुंदर आहेत. हा ग्रंथ वाचाणार्‍यालाच जाणवेल की ह्यात काय रहस्ये उलघडली आहेत.

याव्यतिरिक्त बापूंनी "तदात्मानम सृजाह्म्यम" आणि "आवाहन न जानामी" ही पुस्तके लिहली आहेत.

दैनिक प्रत्यक्षमध्ये अग्रलेखांची मालिका तर डोळे उघडणारी आहेत. नुकताच तुलसीपत्र ह्या सुन्दरकाण्डावर आधारीत अग्रलेख मालिकांचे १००० भाग पूर्ण झाले आणि बापूंनी एका वेगळ्या विश्वाची ओळख बापूंनी सर्वांना करवून दिली. वसुंधरेचा इतिहास बापू आता उलघडून सांगत आहेत. ह्या १००० तुलसीपत्रांवर विवरण कृपासिंधू मासिकाच्या ऑक्टोबर २०१४च्या अंकात महाधर्मवर्मन डॉ. योगिंद्रसिंह जोशी यांनी केले आहे.

परमपूज्य बापूंनी केवळ अध्यात्मिकच नाही तर समाजात, जगात विश्वात घडणार्‍या अनेक गोष्टींची जाणिव करुन दिली आहे. त्याआधी बापूंनी तिसरे महायुद्धसारखे वास्तववादी पुस्तक लिहले. तिसर्‍या महायुद्धाबद्दल त्यांचा अभ्यास  किती अचूक आहे याची प्रचिती आता  आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी पाहिल्यावर कळून येते.

अस बरच काही माझ्या बापूंबद्द्ल सांगण्यासारखे आहे. पण किमान ह्या गोष्टी प्रामुख्याने माहित असाव्यात म्हणून दिल्या आहेत. बाकी बापूंचे विविध पैलू, नवीन सूचना, मार्गदर्शन पूज्य समिरदादा यांच्या ब्लॉगमधून आपल्याला कळत राहतात.

No comments: