Thursday, January 24, 2013

Googling 2 - ..Please Takeaway....TAKEOUT


मला एक सांगा....तुमचा गुगलवर किती डेटा आहे. सांगू शकाल. एकत्रित करु शकाल...नाही ना!! गुगलच्या आपल्याच माहितीमध्ये आपण कधी हरवून जाऊ हेच कळणार नाही. आणि तुम्हाला हा डेटा एकत्रित हवा असेल तर काय करणार. किंबहुना असा विचार देखिल तुम्ही केला नसेल ना! परंतु हा विचार मला तरी करावा लागला..जेव्हा गुगलने त्यांची बझची सर्व्हीस बंद केली तेव्हा. बझवर माझ्या काही कविता, काही विचार पोस्ट केलेल्या होत्या. मात्र बझ बंद झाल्यानंतर मला ते पुन्हा मिळविणे कठीण झाले होते. काहीतरी सर्च करुन एखादी पोस्ट मिळायची खरी पण त्यात काही समाधान नव्हते. 

मग एके दिवशी असच गुगलींग करताना मला सापडले "टेकआऊट" "google takeout" या गुगल टेक-आऊटवरुन मी बझच काय तर त्या जी मेलच्या आय डी वर असणारी प्रत्येक गुगल प्रोडक्टवरील माहिती मी एकत्रित रित्या डाऊनलोड करुन घेऊ शकले. आहे ना अमेझिंग!! 

गुगलच्या डाटा लिबरेशन फ्रंट (Data Libration Front) या इंजिनियरिंग टीमने "गुगल टेकाआऊट हा प्रोजेक्ट सुरु केला आहे. युजर्सना त्यांचा डाटा गुगलच्या बाहेर नेता यावा यासाठी ही टीम प्रयत्न करीत असते. त्यांनीच हे गुगल टेकआऊट सुरु केले आहे. 

गुगलच्या प्रोडक्टसमधील आपला डेटा आपण एका झिप फाईलमध्ये डाऊनलोड करुन घेऊ शकतो. 
सध्या टेकआऊटमधून गुगल प्लस Google Plus, बझ Google Buzz, कॉन्टेक्टस Contacts, डाईव्ह Drive, गुगल + सर्कल्स, गुगल + स्ट्रीम, लॅटीट्युड Latitude, पिकासा वेब अल्बम्स Picasa Web Album, प्रोफाईल, रिडर Reader  व्हॉईस, युट्युबचा You Tube डेटा आपण मिळवू शकतो. 

सध्या तरी टेकआऊट लिमिटेड प्रोडक्टससाठी अव्हेलेबल आहे. मात्र युट्युबसाठी लेटेस्ट ही सुविधा देऊ केलेली आहे. याचा वापर करुन यु ट्युबवरील तुमचे सर्व व्हीडीयो फाईल्स एका झिप फाईल घेऊ शकतात. २०११ च्या जूनमध्ये गुगलने ही टेकआउट सर्व्हीस सुरु केली.