Tuesday, February 10, 2015

केव्हा तरी पहाटे...विडंबन

एक बिच्चारा प्रियकराने आपल्या प्रेयसीला डोळा मारला आणि नेमके हे तिच्या भावाने पाहिले. ती रात्र त्या प्रियकराच्या आयुष्यातील न भूतो न भविष्य रात्र होती... त्या प्रियकराचे दुःख या विडंबनातून मांडले आहे. मूळ कविता केव्हा तरी पहाटे चे विडंबन करताना...आणि या प्रियकराची वाईट अवस्था मांडताना काही आक्षेपहार्य शब्द वापरण्यात आले आहे.. हे शब्द वापरणे ही या विडंबनाची गरज होती...याची नोंद घ्यावी..

 केव्हा तरी पहाटे, खडबडून जाग आली
मारले चुकून डोळे, मार खात मग रात गेली

सांगू तरी कसे मी, भय तुझिया भावाचे
दाबून श्वास माझा, बदडून रात गेली

कळले मला ना तेव्हा, फुटली कवटी जराशी
कळले मला ना तेव्हा, निसटून धार गेली

उरले शरिरात काही, हुंदके वेदनेचे
आकाश तारकांचे, दाखवूनी रात गेली

उरल्या मला ना तेव्हा, माझ्याच दंत पंक्ती
मग दाढ शेवटाची, कोसळून रात गेली

- Reshma Narkhede