Friday, November 26, 2010

मला समजलेली अनिरुद्ध परेड - १ (ANIRUDDH PARADE)

हरी ॐ
परेडचे अनुभव लिहून झाल्यावर आता मी मला समजलेली अनिरुद्ध परेड यावर थोडसे लिहणार आहे. अर्थात हे पूर्णतः माझ मत आहे. कारण नुसत परेडला येणं आणि जाणं अस मी कधीच केल नाही. परेड समजून घेऊन पूर्णतः त्यात सहभाग घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामुळे ही परेड मला काही तरी नवीन शिकवीत आली. जे काही मला समजल तेच मी तुमच्यापुढे मांडणार आहे. बाकी काही नाही. आज पर्यंतच्या लिखाणाला तुम्ही भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल श्रीराम!!! यापुढे ही देत राहाल ही खात्री आहे. तर सुरुवात करुया आपल्या अनिरुध्द परेडला.

प्रत्यक्षमध्ये लागले त्याच्या दुसर्या वर्षी मला शिवाजी पार्कमध्ये प्रजासत्ताक दिनाला होणार्या परेडचे फोटो काढण्याची संधी मिळाली होती. हा इव्हेंट माझ्या दृष्टीने फारच महत्त्वाचा होता. कारण प्रथमच मी अशी परेड पाहणार होते. परेडला सुरुवात झाली. त्यातील पहिल्या आणि दुसर्या प्लाटूनची परेड पाहून मी क्षणभर फोटो काढायचीच विसरले. आहाहा!! काय ती सुरेख परेड. एका लयीत हात, पायची हालचाल..कुठेही कुणीही चुकत नाही. कमालीची शिस्त..क्लासिक दहिने देख..त्यांना पाहून वाटले..छे!! आपण काही अशी परेड केलीच नाही..माझा कधी पायच बेंड होतो..तर कधी हातच बेंड होतो..कधी पोक काढून चालते..कधी शूटींग लेगला प्रोब्लेम..पण हे सैनिक कसे बरे एवढ परफेक्ट करतात..कस जमत कस यांना...नकळत केली होती तुलना मी तेव्हा..पण ही केलेली तुलना मला खूप काही देणारी होती. खूप विचार करायला लावणारी होती. तेव्हा मला प्रश्न पडला हे लोक का करतात परेड? यांचे काही परेड करण हे काम नव्हे? मग मला ही प्रश्न पडला मी का केली परेड? का बर करायची परेड? हे प्रश्न पडले आणि या प्रश्नांची उत्तरे बापूरायानेच शोधून दिली. (एव्हाना परेड सोडून मला वर्ष उलटल होत.)

ए ए डी एम आणि रेस्क्यु ही माझी सेवा...हे माझे काम..आणि हे काम ही सेवा करताना मला शिस्त लागावी म्हणून परेड...ही माझी प्रामाणिक समजूत. परेड करण्याच्या आधी मी अनेक ए ए डी एमच्या सेवा अटेंड केल्या..पण परेडमध्ये जॉईन झाल्यानंतर सगळ्या सेवा एका शिस्तीने करण्याची सवय मला लागली..म्हणजे साध उदाहरण द्यायच म्हणजे लाईन कंट्रोल करताना तासनतास टंगळ मंगळ न करता एका जागेवर उभी राहण्याची सवय..मी मुळातच फार चंचल आहे..त्यामुळे एका जागी उभे राहून सेवा करण म्हणजे मला तरी अशक्य...परेडच्या सवयी मुळे ही चंचलता दूर झाली. तसच उभ राहण्याचा स्टॅमिनापण वाढला. खर तर सेवेला उभ राहिले की कुणीही निष्ठेने सेवा करत पण शेवटी प्रत्येकाच्या शरीराच्या क्षमतेची मर्यादा असते..ही क्षमता वाढविण्याचे काम परेडमुळे झाले..पूर्वी तर तासन तास आम्ही उभे राहयचो. त्याचा फायदा झाला. सेवा करतानाच नाही तर पुढे फोटोग्राफीच्या करीयरमध्ये परेडचा प्रचंड फायदा झाला.

लालबागच्या राज्याची गर्दी आणि त्याची विसर्जन मिरवणूक तुम्हाला सांगायला नको. तिथे परळला लालबागच्या राज्यावर पुष्पवृष्टी होते. तो फोटो काढण्यासाठी सकाळी ११.३० वाजल्यापासून मी एका दुकानाच्या छपरावर जागा पकडून उभी होती. आजूबाजूला व्हीडीयोग्राफर आणि फोटोग्राफर होते. जरा हलले की शिव्या पडायच्या. त्यामुळे नुसती उभी. पायाला खालून गरम पत्र्याचा चटका आणि डोक्यावर मध्यानीचा सूर्य अशा परिस्थीत तिथे बाप्पाचे नाव घेत उभी होते. आधी इतर गणपती आले. त्यांचे फोटो काढले आणि मग चारच्या सुमारास लालबागचा गणपती आला. तेव्हा श्वास रोखून त्याचे फोटो काढले. तो एक क्षण टीपण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. खर तर बापूरायाची कृपा म्हणून मी उभी राहू शकले..पण मी करु शकेन उभी राहेन हा आत्मविश्वास कुठून आला? परेडमुळेच. अगदी १०८ टक्के. परेडमुळेच माझा आत्मविश्वास विकसीत झाला आणि ही परेड कुणासाठी आणि कुणाची तर अनिरुद्धाची आणि अनिरुद्धाचसाठी..

या अनुभवानंतर मला समजले की ही परेड का करायची आणि याने काय होते ते. परेडमुळे स्टॅमिना वाढतो. तसेच आत्माविश्वास ही वाढतो. रेस्क्युअर म्हणून काम करताना स्टॅमिना आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. मला सगळ्या रेस्क्युच्या मेथड येतात पण समोर असलेली कॅझ्युलटी हॅण्डल करण्याचा आत्मविश्वास आणि स्टॅमिना नसेल तर???

परेडमध्ये गेल्यानंतर मी आणखी कणखर झाले. मनाने कणखर झाले. समोर आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची हिम्मत वाढली. तसेच मी एक रेस्क्युअर आहे आणि त्यानुसार निडर आणि संयमी मानसिकता बनविणे शक्य झाले. जेव्हा मी सैनिक आहे ही भावना दृढ होते...तेव्हा सगळ आपोआप जमतेच...वेगळ काही करण्याची गरज भासत नाही अस मला वाटते. असे नसते तर गुरुपौर्णिमेला रेल्वेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील जखमी प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्याहूनी वाईट, त्यांचे फोटो काढण्याची हिम्मत झाली नसती. त्यावेळी डोक फुटलेला एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात समोरुन येत होता, त्याला पाहून मला धक्का बसला पण नंतर परेडने दिलेला संयमीपणा कामी आला आणि स्वतःला सावरता आले. दुसर्याच क्षणी निडर होऊन कणखर होऊन छिन्नविच्छीन्न झालेल्या मृतदेहाचे आणि उद्धवस्त झालेल्या त्या फस्ट क्लासच्या डब्याचे फोटो काढले. तिथे तर जणू रक्ताची रंगपंचमी झाली होती.

परेड केल्यावर आधीचे दोन रविवार त्रास होतो मग नंतर एकदम फ्रेश वाटू लागत. चरखा रेग्युलर चालवला तरच तो मस्त चालतो. खूप दिवस चरखा बंद असेल आणि  अचानक आपण चालवायला घेतला तर तो नीट चालतो का? सूत निघते का व्यवस्थीत? नाही..आपल्या शरीराचेही तसेच आहे. रेग्युलर परेडमुळे कायम ऍक्टीव्ह राहता येत. शरीर ऍक्टीव्ह राहत. बुध्दी ऍक्टीव्ह राहते आणि मनही ऍक्टीव्ह राहत. तर आज तुम्हाला परेडचे काही फायदे सांगते जे मला समजले.
१) शिस्त लागते
२) स्टॅमिना वाढतो
३) आत्मविश्वास वाढतो
४) ऍक्टीव्हनेस वाढतो
५) संयम वाढतो
६) निडरता वाढते
७) सभानता वाढते
८) जाणिव वाढते
९) कार्यक्षमता वाढते
१०) एकाग्रता वाढते
११)  निरिक्षण क्षमता वाढते
१२) कल्पकता वाढते
१३) नेतृत्व क्षमता वाढते
१४) संपर्क व संवाद वाढतो
 हे काही फायदे आहेतच...या व्यतिरिक्त  ही अनेक आहेत...ह्या गुणांच्या विकासामुळे आपल्या खाजगी, व्यावहारीक, शालेय, कार्यालयीन आयुष्यामध्ये ही फायदा होतो..हो पण तसा तो फायदा करुन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

शिवाय आपली ही परेड अनिरुद्ध परेड आहे म्हणजेच अध्यात्माचा पाया असलेली परेड... मग हीचा प्रत्येक फायदा हो दुप्पटच होणार..अध्यात्मामध्ये सांघिक भक्तीला महत्त्व जास्त आहे...त्याचे फायदे ही जास्त आहेत. त्याचप्रमाणे परेडमध्ये ही सांघिकतेलाच महत्त्व आहे. एकट्याची परेड कधी असूच शकत नाही. सर्वांना एकत्र आणण्याची, माणसे जोडण्याची ताकद असणारी ही परेड आहे.....फक्त प्रश्न  माझ्या दृष्टीकोनाचा आहे..माझ्या मेहनतीचा...आणि माझ्या कमिटमेंटचा आहे...बाकी सगळ क्षेम कुशल पाहण्यास अनिरुद्ध समर्थ आहे....आहेच....
आता जे मला वाटले ते मी तुमच्यासमोर मांडले...पुढेही मांडत राहीत...कारण एकच

युद्धकर्ता श्रीराम ममः
समर्थ दत्तगुरुः मूलाधार
साचार वानरसैनिको अहं
रावण वधः निश्चितः