Saturday, May 21, 2011

श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात,,,,, माय चण्डिका ठसली मनामनात


श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात
सार्या अशुभाचा करुनी ग नाश
हा अनिरुद्ध नाचतो तिच्या पुढ्यात
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

अखिल कामेश्वरी महालक्ष्मी उभी
प्रसन्न वदने आशिष देईल अशी
वात्सल्यझरा वाहे तिच्या नयनात
हा अनिरुद्ध भिजतो तिच्या प्रेमात
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

आरोग्यभवानी महासरस्वती उभी
शुभ्रवर्णे तारुन नेईल अशी
अचिंत्यदानी रुप तिचे जनात
हा अनिरुद्ध दंगतो तिच्या नामात
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

कालनियन्त्री महाकाली ही उभी
असुरी वृत्ती नष्ट करीते अशी
असुरांच्या मुंडी असे जिच्या गळ्यात
हा अनिरुद्ध रंगतो तिच्या रंगात
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

रक्तवर्ण रक्तदंतिका उभी
बालरक्षणा उग्र मुद्रा अशी
हरेक श्वासात जी असूर असे चावत
हा अनिरुद्ध तिच्या मातृछायेत
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

गंगा माय असे इथे साक्षात उभी
अवतरली अनिरुद्धाकारणे अशी
भक्त देवाचा संगम जिच्या उदरात
हा अनिरुद्ध रिघतो तिच्या कुशीत
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

अकरा असुरांचे दहन महाकाली कुंडात
महालक्ष्मी दिप नित्य असे तेवत
महासरस्वती वापीत अवघा रंग एक
ह्या अनिरुद्धाची तळमळ तू देख
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

दुर्गा वरद नवकला होम करुनी
मातृभक्तीची अनोखी देणगी दिली
मंत्रमालिनीचे अखंड गुण गात
हा अनिरुद्ध आम्हा असे तारत
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात



- रेश्मावीरा हरचेकर, 21 May 2011