His Personality

माझे बापू कसे आहेत? जसे दिसतात अगदी तसेच.
त्यांचे व्यक्तीमत्व कसे आहे हे जाणण्यासाठी समिरदादांच्या ब्लॉगवरील "मी पाहिलेला बापू" हे सदर नक्की वाचावे. ह्यात बापूंचे विविध पैलू तूम्हाला दिसतील.

पेश्याने डॉक्टर असणारे बापूंना अध्यात्माचा एवढा मोठा व्यासंग आहे हे चकीत करून टाकणारे आहे. त्यामुळेच बापू विज्ञान आणि अध्यात्माची सुरेख सांगड घालतात आणि आम्हा भक्तांनाही तसे शिकवितात. अध्यात्मामधील विज्ञान आणि विज्ञानातील अध्यात्म हे पाहायला बापूंनी मला शिकविले. आणि खरच ते एक उत्तम शिक्षक आहेत. त्यांनी नायर हॉस्पिटलमधून वैद्यकीय शिक्षण दिले असले तरी लाईफ सायन्स हा त्यांच्या आवडीचा विषय असावा. कारण ते १९९६ अविरतपणे पासून हे लाईफ सायन्स आपल्या भक्तांना प्रवचनाच्या माध्यमातून शिकवित आहे. अगदी प्रत्येकाला समजेलच अशा पद्धतीने.

बापू उत्तम नाटककार आहेत. बापू उत्तम लेखक आहेत. बापू एक उत्तम कवी देखील आहे. बापू म्हणजे एक झपाटलेला वाचक, बापू एक श्रेष्ठ श्रोता आहे. बापू एक उत्कृष्ट वक्ता आहे. बापूंचे संगिताचे ज्ञान अफाट आहे. बापू उत्तम फोटोग्राफी देखील करतात. ते मूर्तीकारही आहेत. ते चित्रकारही आहेत. ते गाणे ही सुंदर गातात. ते नृत्य ही सुरेख करतात. बापू अत्यंत प्रेमळ, दयाळू, क्षमाशील आहेत तर प्रसंगी अत्यंत कठॊर देखील आहेत. बापूंसारखा तपस्वी कुणी नाही आणि बापूंसारखा बाप ही कुणी नाही.

खर तर काय लिहू मी. अस झालेय मला. त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्द्ल काही लिहण्यास खर तर मी असमर्थ आहे. परंतु बापू हे एक श्रेष्ठ व्यक्तीमत्व असून त्यांच्याकडे पाहताना दिव्यत्वाची प्रचिती येते हे मात्र नक्की. माझे आयुष्य केवळ आणि केवळ एकच बापूंच्याच व्यक्तीमत्वाने व्यापलेले आहे. कुठल्याही गोष्टीचे समाधान, उत्तर, किंवा दिशा ही केवळ बापूंच्या व्यक्तीमत्वातून मिळत राहते. कस वागाव, कस बोलाव, नाती कशी जपावी, हे सारं काही एका बापूंकडून शिकता येते. आदर्श शब्द कमी पडेल असे बापूंचे व्यक्तीमत्व आहे अगदी त्यांच्या नावासारखे अनिरुद्ध.....ज्यास कुणीही अडवू शकत नाही....

माझ्यामनावर उमटलेला बापूंच्या व्यक्तीमत्वाचा ठसा आणि त्याचे विविध पैलू तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून वाचण्यास मिळतील.

No comments: