Wednesday, July 11, 2012

मोबाईलगिरि

आज काय एक एक धम्माल मोबाईल आलेले आहेत. अगदी आख्खा कॉम्प्युटर आपल्या इवल्याश्या हातामध्ये आला आहे. अनेक फिचर या मोबाईलमध्ये आले आहेत. परंतु या फिचरचा आपल्याला पूरेपूर वापर करताच येत नाही.
फोन करणे, एसएमएम पाठविणे, गेम खेळणे, गाणी ऐकणे इत्यादी या पलिकडे मोबाईलचा आपण काही वापर करतो का? याचा विचार करण्यास हवा. स्टाईलसाठी महागडे मोबाईल घेतो खरे पण त्याचा क्रीएटीव्ह वापर करायला पाहिजे,
मी नुकताच एनरॉईड ऑपरेटींग सिस्टीम असलेला सॅमसंग गॅलेक्सी मोबईल घेतलाय आणि खर सांगू या मोबाईल माझी बरीच कामे होतात.
ऍनरॉईड देत असलेल्या ऍपलिकेशनचा सॉलिड फायदा होतोय. खर म्हणजे मी तो करुन घेतेय. त्यात सगळ्यात आवडते ऍपलिकेशन म्हणजे पीडीएफ रिडर...सर्व पीडीएफ फाईल्स कोणत्याही त्रासाशिवाय मी त्यावर वाचू शकते. आताच साईसच्चरित्र पंचशील परिक्षेची तयारी मी मोबाईलवर केली. कसे काय? तर साईसच्चरित्रचे अध्याय मोबाईलवरच वाचले आणि त्याचा अभ्यास केला. प्रवासात साईसच्चरित्र नेणे आणने अवघड. मोबाईलमध्येच आख्ख साईसतचरित्र असल्याने अभ्यास आणि पारायण किती सोपे झालेय.
याव्यतिरक्त आजकल मला उपासनेची पुस्तके कॅरी करावी लागत नाही. आदीमाता स्तवनम, अशुभनशिनी स्तोत्र, दत्तस्तव स्तोत्रम, रामरक्षा, हनुमान चालिसा, गुरुक्षेत्रम मंत्र असे अनेक जप व स्तोत्र स्टोर करुन ठेवलेली आहेत. हा माझ्या मोबाईलचा भक्तीमय उपयोग मी करुन घेतलाय.

यव्यतिरिक्त माझी आवडती ई बुक्स हॅरी पॉटर, चेतन भगत इत्यांदीची पुस्तके पण मोबाईल वर आहेत. त्यामुळे पुस्तकांचे वाचन ही होते. शिवाय मार्गदर्शक पुस्तके देखील आहेत. म्हणजे चालती फीरती लायब्ररी आहे माझ्याकडे.


या नंतर दुसरे ऍपलिकेश म्हणजे थिंक ऑफीस. यामध्ये ऍक्सेल्, वर्ड, पॉवर पॉईंट हे सगळे चालते. त्यामुळे  माझी डाटाबेसची अर्जंट कामे मोबाईलवरच होतात.

शिवाय नेट कनेक्शन असल्याने जी टॉक आणि फेसबुक वरुन मित्रांशी संपर्कात राहता येते. तसेच इमरजन्सीमध्ये फाईल ट्रान्सफरींग करता येते.


डिझास्टर मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये वेगवेगळ्या रेस्क्यु नॉटस शिकले होते. त्या आणि त्यांच्यासारख्य अनेक महत्त्वाच्या गाठींची माहीती नॉटस गाईड या ऍपलिकेशनमधून मिळते,
तसेच डीझास्टर अर्लट या ऍपलिकेशनमधून जगभरात झालेल्या आपत्तींची अपडेट मिळत राहते.
शिवाय न्यूज चॅनेलच्या ऍपलिकेशनमुळे दैंनदिन घडामोडी कळतात. 

कॅम कार्ड ऍपलिकेशन मुळे एखाद्याचे बिझनेस कार्ड केवळ त्याचा फोटॊ काढून सेव्ह करता येते. 
शिवाय डिक्शनरी, वायकीपिडीया, गुगल सर्च आहेच. यासारखी लाखो ऍपलिकेशन्स असतील. त्यातील किति ऍपलिकेशन्सचा वापर आपण करतो हे महत्त्वाचे आहे.

गुगल मॅप, गुगल स्काय मॅप, पियानो, वेदर रिपोर्ट हे पण ऍपलिकेशन माझी आवडती आहेत. विरंगुळा करायचाच आहे ना. मग या ऍपलिकेशन्सचा वापर करणे मला जास्त आवडते. दररोज नवनवीन ऍपलिकेशन्सची भर पडत असते. 

नुसता गेम्स खेळण्यासाठी या अशा हायटेक मोबाईलचा वापर करणे म्हणजे या मोबाईल्सची लाज काढल्यासारखे मला वाटते. त्यामुळे या अशा मोबाईल्सचा उचित वापर आपल्या स्वतःच्या विकासासाठी करुन खर्या अर्थाने आपल्याला हायटेक व्हायला हवे. नाही का?