खुप दिवसांनी श्री हरीगुरुग्राम येथे जाण्याची संधी मिळाली. श्रीशब्दध्यानयोग ह्या उपासनेचा अवर्णनीय आनंद मिळाला. त्यातच नवीन कॅमेरा घेऊन गेल्याने श्रीहरिगुरुग्रामचे काही महत्त्वपूर्ण क्षण टिपता आले. त्यातील काही फोटो मी शेअर करीत आहे.
|
माझे सदगुरु श्री अनिरुद्ध बापू श्री साईसच्चरित पंचशील परिक्षा ऑगस्ट २०१५ प्रथमाचा निकाल जाहिर करताना, परिक्षा देणार्या प्रत्येक श्रद्धावानासाठीचा हा मोलाचा क्षण. जेव्हा स्वतः बापू त्यांचे नाव जाहिर करतात. |
|
बापू प्रवचन (आत्ताचे पितृवचन) कसे करतात? या प्रश्नाला हा आणि पुढील फोटो Apt उत्तर आहे. बापू कायमच एका प्रेमळ शिक्षकाच्या भुमिकेत आहेत. ते त्यांच्या श्रद्धावान मित्रांना अतीशय सोप्प्या पद्धत्तीने विज्ञान आणि अध्यात्म उलघडून सांगतात. आपले जीवन सुकर करण्याचे Life Science बापु आपल्या पितृवचनातून शिकवितात. |
|
१९ नोव्हेंबरच्या गुरुवारी Integrity या संकल्पनेचे अतिशय सोप्प्या शब्दात त्यांनी विवरण केले. |
|
आणि या Integrity च्या सर्व व्याख्या सांगून त्यास मराठी शब्द दिला "अदितीत्व" तोच हा क्षण |
|
माझ्या आयुष्याचे ध्येय काय असावे? तर हे अदितीत्व प्राप्त करणे. ते कसे प्राप्त करावे या एका फोटोतून कळू शकते. |
हे अदितीत्व प्राप्त करण्याचे पितृवचन आपण बापुंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देऊ शकतो
॥हरि ओम॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥
॥जय जगदंब जय दुर्गे॥