Showing posts with label The Bapu - From My View Finder. Show all posts
Showing posts with label The Bapu - From My View Finder. Show all posts

Friday, November 20, 2015

श्री हरिगुरुग्राम माझ्या कॅमेरामधून - भाग 3


ॐ साई श्री साई जय जय साई राम ही आरती भक्तांसमवेत करताना 

दर्शन

माझे तुझ्यावर लक्ष आहे.....

असेच हृदयी बंद करावे हे अनिरुद्ध रुप

दर्शन

पुजन

दत्तगुरु हे दैवत माझे

मी तुझ्या पाठीशी आहे..

मी तुला कधीच टाकणार नाही

I Love You My Dad

अनिरुद्ध आहे...

आरती.....

श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराज - श्रद्धावानांचा आधार आणि उद्धार स्तंभ

वर्षोनोवर्ष हिंदी आरतीचा हा एक क्षण अनुभवतोय आणि प्रत्येक वेळेस हवाहवासा वाटतो

श्री हरिगुरुग्राम माझ्या कॅमेरामधून - भाग २

पूज्य समिरदादा ऊद अर्पण करताना...भावपूर्ण

पूज्य समिरदादा ऊद अर्पण करताना...भक्ती सेवा शिकायची तर पूज्य समिरदादांकडूनच

आमुचे आराध्य

शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात

श्रीहरिगुरुग्राम

सुदिप - ज्योत से ज्योत मिलाते चलो....प्रेम की गंगा बहाते चलो

सुदिप प्रज्वलन - ॐ मनः प्राणः प्रज्ञा.....

बापू आभाळी दिसतो...झेप मी उंच उंच घेतो

चरणी ठेवीतो मी माथा...तुज मागतो आता

दत्तयंत्र भाळी स्पर्शिले...भय दुःख सारे हरले..

तुझ्या चरणांची धूळ हेच अमुचे गोत्र कुळ


तुझे चरण सेविता...लाभे मनास शांतता

श्रद्धावानसंस्कार....आकार द्यायचा तो याच वयात...

श्री हरिगुरुग्राम माझ्या कॅमेरामधून - भाग १

 खुप दिवसांनी श्री हरीगुरुग्राम येथे जाण्याची संधी मिळाली. श्रीशब्दध्यानयोग  ह्या उपासनेचा अवर्णनीय आनंद मिळाला. त्यातच नवीन कॅमेरा घेऊन गेल्याने श्रीहरिगुरुग्रामचे काही महत्त्वपूर्ण क्षण टिपता आले. त्यातील काही फोटो मी शेअर करीत आहे.

Aniruddha bapu at Shree harigurugram Reshma narkhede Photography
माझे सदगुरु श्री अनिरुद्ध बापू श्री साईसच्चरित पंचशील परिक्षा ऑगस्ट २०१५ प्रथमाचा निकाल जाहिर करताना, परिक्षा देणार्‍या प्रत्येक श्रद्धावानासाठीचा हा मोलाचा क्षण. जेव्हा स्वतः बापू त्यांचे नाव जाहिर करतात. 


Aniruddha bapu at Shree harigurugram Reshma narkhede Photography
बापू प्रवचन  (आत्ताचे पितृवचन) कसे करतात? या प्रश्नाला हा आणि पुढील फोटो Apt उत्तर आहे. बापू कायमच एका प्रेमळ शिक्षकाच्या भुमिकेत आहेत. ते त्यांच्या श्रद्धावान मित्रांना अतीशय सोप्प्या पद्धत्तीने विज्ञान आणि अध्यात्म उलघडून सांगतात. आपले जीवन सुकर करण्याचे Life Science बापु आपल्या पितृवचनातून शिकवितात. 

Aniruddha bapu at Shree harigurugram Reshma narkhede Photography
१९ नोव्हेंबरच्या गुरुवारी Integrity या संकल्पनेचे अतिशय सोप्प्या शब्दात त्यांनी विवरण केले.

Aniruddha bapu at Shree harigurugram Reshma narkhede Photography
आणि या Integrity च्या सर्व व्याख्या सांगून त्यास मराठी शब्द दिला "अदितीत्व" तोच हा क्षण


Aniruddha bapu at Shree harigurugram Reshma narkhede Photography
माझ्या आयुष्याचे ध्येय काय असावे? तर हे अदितीत्व प्राप्त करणे. ते कसे प्राप्त करावे या एका फोटोतून कळू शकते.
 हे अदितीत्व प्राप्त करण्याचे पितृवचन आपण बापुंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देऊ शकतो

॥हरि ओम॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥
॥जय जगदंब जय दुर्गे॥

Saturday, September 29, 2012

The Bapu - From My View Finder - Part 2

Aniruddha Bapu
His love is therefore free and so it is Aniruddha.
Aniruddha Bapu
The One who is Aniruddha are the Truth, the ultimate Truth.

Aniruddha Bapu
He is Aniruddha, He is Unstoppable

Aniruddha Bapu
Aniruddha is the One for whom there are no obstructions or impediments.

Aniruddha Bapu
Aniruddha is the One who is self-willed, who is free.

Aniruddha Bapu
The mission of Aniruddha is the mission stemming from the purity and the sanctity of His Love. It will culminate in Joy all because it is the Will of Aniruddha the Unstoppable.

Thursday, July 19, 2012

The Bapu - From My View Finder - Part 1

हरि ॐ 
The Bapu - From My View Finder ची सुरुवात करताना मला फोटोग्राफी सेवेचा पहिला अनुभव सांगावासा वाटतो. गुरुपौर्णिमा २०१० ला पहिल्यांदा बापूंना व्ह्यू फायंडरमधून अनुभवले. (याआधीच्या गणेशोत्सवाला मी फोटो काढले होते. पण ते फार लांबून आणि ठराविक काढले होते. त्यामुळे तेव्हा काही अनुभवताच आले नाही. कारण फोटो काढून प्रत्यक्षसाठी पळायचे होते.)  जे काही अनुभवले ते मी तेव्हाच लिहून ठेवले होते या ब्लॉगवर. आज ते पुन्हा शेअर करुन सुरुवात करावीशी वाटते. अनेकांनी ते वाचले देखिल असेल. पण आज पुन्हा वाचताना वाटलेही नव्हतं की येथून पुढे एक प्रवास सुरु झाला आहे. याच आर्टीकलमध्ये आत्तच्या The Bapu - From My View Finder चे बीज रोवलेले होते, हे ही कळतेय आणि उचित वेळी या बीजाला अंकुर फुटले आहे. या बुद्धीस्फुरणदाता अनिरुद्धाने बहुतेक आता या बीजाचा वटवृक्ष करण्याचे ठरविलेलेच आहे. 

हृदयात कोरली गेलेली गुरुपौर्णिमा २०१०

अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो!!!! याची पूर्ण अनुभूती गुरुपौर्णिमेला आली...२०१० ही गुरुपौर्णिमा कायमची हृदयात कोरली गेली आहे. केवळ बापू आई दादांचे सुरेख दर्शनच नाही. तर अनेक धडे शिकविणारी ही गुरुपौर्णिमा होती. खरं तरं गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुला गुरु दक्षिणा देण्याचा दिवस...पण या दिवशी बापूंनीच इतक भरभरून प्रेम दिले तर त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी आपण पूर्णपणे असमर्थ असल्याचे प्रकर्षाने जाणवले..तो भरभरुन देत असलेले प्रेम स्विकारण्या खेरीज मला तरी दुसरे काही जमले नाही..काय वर्णू देवाचा सोहळा...शब्दच नाही...पण नाही...आज कुठून कुठून शब्द शोधून बापूंचे प्रेम मांडण्याचा प्रयास करणारच आहे..हो पण ते कितपत जमेल ह्याची सुद्धा मला शंका वाटतेय...असो


गुरुपौर्णिमेला मला फोटोग्राफीची सेवा दिली होती. हे ऐकूनच माझी धडधड वाढली होती आणि चिक्कार आनंद ही झाला होता...म्हणतात ना!!! आनंद पोटात माझ्या माईना!! अशी परिस्थिती झाली होती माझी..रात्रीपासून बापू आई दादांचे असे फोटो काढायचे..तसे फोटो काढायचे अश्या बर्याच योजना बनविल्या. या विचारांनी रात्रीची झोप सुद्धा घाबरली असावी...कारण आलीच नाही ती माझ्यापाशी...सकाळी धावपळ करुन तेरापंथला पोहोचले..
कॅमेरा आणि इतर सगळ साहित्य घेऊन मी तयार होते..फक्त बापूंची वाट पाहत होते...पण बापू येण्याची वेळ जस जशी जवळ येत होती..तस तशी धडधड अधिकच वाढत होती..त्यात भिती ही वाटत होती की आता आपला कॅमेरा आपल्याला दगा देणार..या आधी ही त्याने दगा दिलेला आहे...पण आज काय होईल त्याचा अंदाज नाही...त्यात उत्सवाला फोटो काढण्याची पहिलीच वेळ...


आला रे हरी आला रे चा गजर सुरु झाला....आता पर्यंत कधी बापूंचे औक्षण ही नीट न पाहिलेले नव्हते. काय करतात ते सुद्धा माहित नव्हते...आणि आज मात्र थेट फोटो काढायला! जरा गांगरुनच गेले मी...आई मोठ्या गाडीतून उतरली..ती उतरतानाच कॅमेर्याच्या बटनावर बोट ठेवले आणि सुरुवात तीचे एक एक एक्सप्रेशन पकडायला......आहा हा!!! शेवटी एक छान लुक दिला आईने...आणि बरोबर तो लुक कॅमेरात कॅच झाला...तिचीच कृपा..
हाच तो गुरुपौर्णिमा २०१० ला काढलेला फोटो. गाडीमधून उतरल्या उतरल्या
हा फोटो काढला होता. अगदी जवळून काढलेला हा पहिलाच फोटो
 आणि हा फोटो पाहिल्या पाहिल्या मनात उमटतेच
"वात्सल्याची शुद्धमुर्ती आई काळजी वाही"
मग औक्षणाचे फोटो काढले.. धिमी पावले टाकीत येता....असचं मस्त बापू हळू हळू भक्तांना आशीर्वाद देत बापू आई दादा पुढे निघाले. बापू पायर्यांनी वर आले तर आई लिफ्टने वर आली..पहिल्या मजल्यावर हॉलच्या बाहेर बापू आईसाठी थांबले. मग आई आल्यावर ते पुढे चालू लागले. बापू पुढे..आई मागे...त्यामागे दादा..हॉलमध्ये हरी ओम बापूंचा जयघोष आणि दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी...आणि औक्षण..


आत्तापर्यंत भलेभले इव्हेंटस शिताफीने कव्हर केले मी....पण बापूचे फोटो काढताना वाट लागली होती...धडधड थांबायलाच मागत नव्हती..असो..मग बापू स्टेजवर गेले...स्टेजवर चढताना बाप्पाने आईचा हात पकडला...आई ग!! हा क्षण पकडायचा होता मला...आणि कॅमेराच बंद झाला...पोपट झाला माझा...बापू आईकडे हताशपणे पाहण्याखेरीज मी काही करु शकले नाही.


असो मग पुढचे फोटो काढायला लागले..काय बापूंचे एक्सप्रेशन...मस्त मस्त मस्त...अनिरुद्ध चलिसा सुरु झाली...बापू डोळे बंद करुन शांत बसले होते..तेव्हा त्यांचे एक दोन फोटो काढले..मग दादांचे काढले आणि आईचे पण...फोटो काढून झाल्यावर आईने मस्त पाहिले माझ्याकडे...पाहतच होती...ती माझ्या कडे आणि मी तिच्याकडे...कितीवेळ माहित नाही...जणू तिच्या नजरेने माझी नजर धरुन ठेवली....शेवटी मला तिचे तेज सहन झाले नाही आणि मी मान खाली घातली. यावेळी ती फक्त पाहत होती..चेहर्यावरचे भाव काहीच कळत नव्हते...ती रागावलेली आहे की प्रेमाने पाहतेय...काहीच कळत नव्हते...ती फक्त पाहत होती...त्यानंतर माझ्या काळजातली धडधड थांबली.
त्यानंतर पुन्हा एकदा आईने पाहीले मात्र यावेळी ती गोड हसली माझ्याकडे बघून..जणू जुनी ओळख आहे..मज्जाच वाटली मला.
मग बापूंनी ही माझ्याकडे पाहिल आणि मस्त हसले..
हा बापूंचा मी काढलेला फोटो...बघा ना बापू कसा संवाद साधत आहेत.
हा फोटो बघता क्षणी मनात उमटते  "मी आहे"


मग माझी धडधड जाऊन धडाधड फोटो काढण्याचे काम सुरु झाले..
भक्तांची रांग सुरु झाली.. अनेक भक्त बापूंच्या तब्येतीची चौकशी करीत होते.. दीड एक महिन्यांनी बापूंना पाहत असल्याने अनेकांना रडू फुटले होते..चिल्ली पिल्ली तर बेंबीच्या टोकापासून ओरडून बापू आई दादांना हाका मारत होते...
अरे!!! बापू या असंख्य भक्तांशी त्या काही सेकंदांमध्ये किती बोलतात...कुणाला थंब्स अप..कुणा्ला थंब्स डाऊन...कोणाला पाहून डोळे मोठे करणे..कुणाला मान हलवून स्पष्ट नाही सांगणे...काय काय संवाद चालू असतात त्यांचे आणि त्यांच्या भक्तांचे हे त्यांनाच ठाऊक...मला तर जाम मज्जा आली...हे सगळ पाहून...आई दादा पण...
एक क्षण असा आला...साईराम जप टीपेला पोहोचला...भक्तांचा गजर टीपेला पोहचला...बापूंना पाहून एकच जयघोष सुरु झाला...बापू आई दादांची मुद्रा ही वेगळीच होती...ते वातावरणच वेगळे झाले होते...आणि त्या क्षणी मी स्वतःचे अश्रु रोखू शकले नाही...बापूंवरील भक्तांचे प्रेम आणि बापूंचे त्यांच्या भक्तांवरील प्रेम पाहण्याचा अलभ्य लाभ मला झाला आणि मी तिथे फोटोग्राफर आहे हे काही क्षणांसाठी विसरुन गेले...मला हे सगळ पाहून काय कराव कळत नव्हत..मी फक्त रडत होत...रडत होते...पण लगेचच स्वतःला सावरुन फोटो काढायला लागले...मात्र पुढचा बराच वेळ माझ रडण काही थांबल नाही...डोळ्यातून अश्रू वाहतच होते...वाहतच होते...
मग दादा जेव्हा राउंडला गेले तेव्हा मी त्यांचे फोटो काढायला गेले...पण दादांनी माझी चांगलीच फजिती केली.. मी कॅमेरा घेऊन समोर आले की दादा माझ्याकडे पाठ करायचे...किती वेळा झाले असे...माझ माकड झालं होतं...सारख इकडून तिकडून उड्या मारायला लावल...मग ठरवल मी फोटो काढणार म्हणजे काढणार...आणि नंतर माझा हट्ट दादांनी ही दिलखुलास पुरवला...बहुतेक दादांना फोटो काढण जास्त आवडत नसाव.



नंदाई राऊंडला केव्हा गेली हे मला कळलच नाही..त्यामुळे तिचे फोटो काढायचे राहिले...मग सगळे इव्हेंट कव्हर केले. बापूंचे फोटो काढायला पुन्हा हॉलमध्ये गेले...पण यावेळेला माझ्या मनात वेगळेच फिलिंग आले...बापूंना फोटोचा त्रास होतोय का? मला जाणवले ते बसल्यापासून मी फोटो काढतेय...त्यांना फ्लॅशचा त्रास होत नसेल का? असा मनात माझ्या विचार आला...आणि होतच असणार...
मग त्यानंतर प्रत्येक क्लिक केल्यानंतर मला त्रास होत होता...सेवा सोडू शकत नाही...पण बापूपण का हकलवत नाही? "बस फोटो" अस का म्हणत नाही अस मला झाले होते...बापूंच्या डोळ्यावर पडणारा प्रत्येक फ्लॅश माझ्या हृदयाला चिरा पाडत होता...कधी ३ वाजत आहेत आणि मी इथून जातेय अस वाटत होत मला...हे फिलिंग येण्याचे प्रमुख कारण म्हणजे बापू नुकताच आजारातून उठले आहे आणि त्यांना त्रास होताना मी सहनच नाही करु शकले...मला माझाच राग आला...धर्मसंकटात सापडल्यासारखे वाटत होते...पण मला काहीच कळत नव्हते...कधी एकदाचे ३ वाजत आहेत अस वाटत होते...आणि बहुतेक ३ वाजताच बापू आत गेले...आणि या धर्मसंकटातून माझी सुटका झाल्यासारखे वाटले..
एकंदरीतच या सेवेचा अनुभव हा खुप काही शिकविणारा होता...यातून काय काय शिकले हे मी तुम्हाला कदाचित सांगू शकणार नाही...पण त्यामुळे माझ्यात नक्कीच बदल झाला.
सेवा करताना अधे मध्ये कुणीही नाही...केवळ मी बापू आई दादा बस्स!!!!!!!


मला तर वाटते प्रत्येकाने फोटोग्राफर व्हावे आणि झूम लेन्समधून बापूंना पहावे..
प्रत्यक्षात हे जरी प्रत्येकाला शक्य नसल तरीही मनाच्या झूम लेन्सने बापूला पहावे आणि तो फोटो कायमचा हृदयात कोरून घ्यावा...हो पण माझ्या नालायकासारखा बापूंना त्रासदायक ठरु शकणारा स्वार्थाचा "फ्लॅश" मात्र वापरु नका..

श्रीराम

Wednesday, July 18, 2012

Birthday Gift to Nandai

लहानपणी मला कॅमेर्‍याचे जाम वेड होते आणि हे वेड प्रोफेशनमध्ये केव्हा बदलले हे कळले नाही. आज जरी वेगवेगळ्या फिल्डमध्ये मी काम करीत असले तरी फोटोग्राफीशी नाळ ही जुळलेलीच आहे. परंतु याचे सर्वस्वी श्रेय जाते ते माझ्या एकमेव ख‌‍र्‍या मित्राला. डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी अर्थात माझे सदगुरु श्री अनिरुद्ध बापू. २००५ पासून मी फोटोग्राफर झाले पण आज सात वर्षानंतर मला उमगतेय की "मला फोटोग्राफर व्हायचे होते म्हणून मी फोटोग्राफर झाले नाही. तर, बापूंना मला फोटोग्राफर करायचे होते म्हणून मी फोटोग्राफर सहज झाले." आजही मला वाटते की या क्षेत्रात अजून मला बरच काही शिकायचे आहे. अनेक वेगवेगळे टप्पे गाठणे आवश्यक आहे. अजून फोटोग्राफी प्रॅक्टीस आवश्यक आहे आणि म्हणूनच माझे फोटोग्राफीचे शिक्षण आणि सराव अजूनही सुरु आहे. ह्या फोटोग्राफीच्या फिल्डमधून बक्कळ पैसा कमावू शकते. परंतु पैसा कमाविण्याच्या दृष्टीने या फिल्डकडे कधी पाहिलेच नाही. पैश्यापेक्षा लाखमोलाचे असलेले समाधान कमविण्यात मला जास्त इंटरेस्ट होता, आहे आणि राहणार. आणि म्हणूनच मी स्वतःला मोस्ट सस्केसफुल फोटोग्राफर म्हणू शकते कारण मला माझ्या या कलेतून जे हव ते समाधान प्राप्त झाले आहे आणि हे तोच समजू शकतो ज्याचे त्याला अवगत असलेल्या कलेवर प्रेम आहे.
एकंदरीतच फोटोग्राफर म्हणून वावरताना मला इतर कोणत्याही फोटोग्राफरशी स्पर्धा आहे आणि ती मला जिंकली पाहिजे अस काही वाटले नाही. कारण "समाधाना"ची स्पर्धा कधीच नसते आणि ती कुणी ठेवू शकत नाही. आपले फोटोग्राफीचे टेक्नीक्स दुसर्‍यांबरोबर शेअर करायला देखिल कधी भिती वाटली नाही आणि वाटणार देखिल नाही. कारण एकच "समाधान"

इतिहासात अजरामर राहतील असे क्षण टिपण्याची संधी मिळतेय यासारख मोठ अवॉर्ड नाही. आता तुम्ही म्हणाल हे कस काय? अरे पुन्हा होणार नाही असा "श्री वरदाचण्डीका प्रसन्नोत्सव" कव्हर करायला मिळाला हे काय कमी समाधान देणारे आहे का? किंवा गेल्यावर्षी नंदाईचा ५० वा वाढदिवस कव्हर करण्यास मिळणे हे काय कमी समाधान देणारे आहे का? आज नंदाईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सारं आठवतेय. एक एक क्षण आठवतोय. तेव्हाचे सारे क्षण मेमरी कार्डवर किंवा हार्ड डिक्सवर तर आहेतच. पण हे सारं माझ्या मेमरीत आणि हार्ट डिक्सवर आहेच. त्यामुळेच आई बापू दादांचे सर्व एक्सप्रेशन्स, एक एक नाजूक अप्रतिम क्षण लक्षात आहेत.
अनेकांना बापूंचे वेगवेगळे अनुभव आले आहेत. मला असे काही अनुभव आलेले नाही. पण मी जे काय अनुभवलेय ते आता मला शेअर करावेसे वाटते. केवळ बापूंची एक भक्त म्हणून किंवा बापूंची सेवेकरी किंवा बापू आईंची मुलगी म्हणून नाही तर त्यासोबतच एक फोटोग्राफर म्हणून मी तुमच्याशी माझे अनुभव शेअर करणार आहे. त्यामुळे आजच्या शुभदिनापासून "The Bapu - From My View Finder" ची सुरुवात करीत आहे. मला माहित नाही मी पुढे आता काय काय लिहणार पण जे काय लिहेन ते मला समाधान देणारे, वाचकांना समाधान देणारे नक्कीच असेल याची खात्री मी देऊ शकते. कसे?
Because My View Finder is based on Camera of Pure and Ultimate SAMADHAN and this series is birthday gift to my beloved NANDAI. 
Happy Birthday Aai.
I love You.