Friday, August 30, 2013

Sai For Me....AAI For Me


HARI OM



नुकतच Aanjaneya Publications आंजनेया प्रकाशनच्या वेबसाईटवरुन मागावलेली Happy English Stories ची पहिली सिरिज साई फॉर मी Sai For Me ची पुस्तके घरी आली. अगदी सुंदर पॅकींग असलेले पार्सल अत्यंत अधाश्याप्रमाणे फोडून त्यातून आईची भेट बाहेर काढली. झपझप आठही पुस्तकांवर नजर फिरवून साई फॉर मी चे पहिले पुस्तक वाचण्यास घेतले.


पुस्तकावरील ओळ न ओळ वाचली. अगदी पब्लीकेशन कुठले...पत्ता वगैरे.....


आणि बिगनर्स सेक्शन पासुन सुरुवात केली. सर्वप्रथम विद्यार्थी म्हणून न वाचता...कुतुहूल म्हणून वाचले...आणि मग वाचता वाचता खरच amazed झाले.

आता तुम्ही म्हणाल अस का? कारण तसेच आहे. मराठी माध्यमाची विद्यार्थीनी असल्यामुळे कायम इंग्लिश सुधारण्यासाठी धडपड करत होते. इंग्लिश बोलताना आत्मविश्वास नसल्याने कायम मागे मागे राहायचे. इंग्लिश सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली सर्वच प्रसिद्ध पुस्तके माझ्याकडे आहेत. त्यांच्या मदतीने इंग्लिश बोलता आले, लिहिता आले, वाचता ही आले, समजता देखिल आले पण आत्मविश्वास काही आला नाही. कारण या सगळ्या पुस्तकातून मी मराठीतच इंग्लिश शिकले. आणि त्यामुळे मराठीत विचार करुन मग इंग्लिश्मध्ये बोलण्याची सवय लागली आणि त्यामुळे आत्मविश्वास अधिकच खालावत गेला. 

साई फॉर मी - १ चे बिगिनर्स आणि इंटरमिजिट सेक्शन वाचतानाच एक लख्ख प्रकाश डोक्यात पडला आणि लक्षात आले की हेच मला हवे होते...आणि असच हवे होते.

प्रत्येक पुस्तकामागे मग ते कोणतेही असो त्यामागे एक संकल्पना असते. एक हेतू असतो. एक प्रवाह असतो....आणि त्या पुस्तकांचा एक प्रभाव देखील असतो. खरं तर पुस्तक म्हणजे कागद आणि त्यावरील काळी शाळी नसून एक जिवंत, अनुभवसंपन्न, मार्गदर्शक व्यक्तीमत्व असते. मात्र त्या दृष्टीने पुस्तके वाचली पाहिजेत.

साई फॉर मी म्हणजे तर माझ्या सोबत माझी आईच असल्यासारखे आहे. अर्थात नंदाईने लिहलेल्या या पुस्तकातून तीचे वात्सल्य पदोपदी जाणविते. आणि मी हे ठामपणे सांगू शकते; नव्हे सिद्ध करु शकते. आज मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे बाळाचे संगोपन भरण पोषण कसे करावे हे मला ठाऊक आहे. कोणत्या वयात बाळाला काय खायल द्यावे याचे भान मला राखावे लागते. चार महिन्यापर्यंत केवळ आईचे दूध, चौथ्या महिन्यानंतर फळांचा रस, मग हळू हळू पेज, मऊ खिचडी मग हळू हळू पूर्ण जेवण असा क्रम असतो. कारण बाळाला झेपेल पचेल तेवढच द्यायचे. हेच तत्त्व नंदाईने या पुस्तके लिहताना वापरले आहे असे मला वाटते. 

बघा ना एकाच अर्थाचे तीन वेगवेगळे शब्द बिगिनर्स, इंटरिमिडीएट आणि अडवान्स लेव्हलवर वापरले आहेत. उदा. मिशन, असायमेंट, टास्क...तीन वेगळ्या लेव्हलवर आईने शब्द introduce केले आहेत. गम्मत पुढे अशी आहे की एकच गोष्ट सांगण्यासाठी आईने हे तीन शब्द एका समान वाक्यात वापरले आहेत. अस प्रत्येक ठीकाणी आहे.
Beginners : to begin the mission of writing stories.
Intermediate : to begin the assignment of writing stories
Advance : to begin the task of writing stories.

बाळाला त्याच्या पचनशक्तीनुसार जसे अन्न दिले जाते त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आकलनशक्तीनुसार इथे शिकविले गेले आहे. त्यामुळे मला एकच वाक्य तीन वेगळ्या शब्दांचा वापर करुन कसे लिहता येते हे कळते. 

तसेच शेवटी आईने हेच तीन शब्द तीन वेगवेगळ्या वाक्यात वापरुन दाखविले आहेत; जिथे हे शब्द APT कसे वापरायचे हे कळते.
B : Neil Armstrong was the first person who accomplished the mission of landing on the moon.
I : Advance nations outsource assignments to developing countries.
A : Tending to a special child is a huge task for the parents.

अगदी प्रत्येकाला उपयोगी पडेल अशी ही पुस्तके आहेत. याआधी आईकडून इंग्लिशचे धडे आत्मबलमधून गिरिवले आहे. आज पुन्हा या क्लासला गेल्यासारखे वाटते. या पुस्तकांना अनेकविध पैलू आहेत. 

त्यातील महत्त्वाचा पैलू म्हणजे साईकथांच्या माध्यमातून इंग्लिश शिकणे. आज अधिक सोप्या भाषेतून मग ती इंग्लिश का असेना साईसच्चरित्र वाचल्याची अनुभूती आली. फेरिटेल्समध्ये हरविणार्‍या लहान मुलांना साई कथांच्या माध्यमातून संस्कार करणे अधिक सोपे आहे. पण या कथा सोप्या करुन कशा सांगाव्यात हा प्रश्न पडला होता. हा प्रश्न देखील या पुस्तकांमुळे सुटला आहे. तसेच जणू साईसच्चरित्र चित्र रुपातही समोर आले आहे त्यामुळे अगदी लहान मुले ही या चित्रांतुन कथा समजू शकतील. 

एकाच संकल्पनेतून अनेक हेतू या पुस्तकाच्या माध्यमातून साध्य होतात. आईने व बापूंनी ही पुस्तके आपल्या हातात तर दिली आहेत आता कितीक व्यापक आणि विविधांगी उपयोग आपण करुन घेतो हे आपल्यावर आहे.

मी तर बाबा जाम खुश आहे..."वात्सल्याची शुद्ध मुर्ती आई काळजी वाही"    याची पुरेपुर अनुभूती मला आलेली आहे. कारण मला प्रश्न पडलाच होता...की माझ्या बाळाला मी पुढे कोणत्या गोष्टी कश्या सांगणार आहे? जे संस्कार मला त्याच्यावर करायचे आहेत ते मी कसे करणार...

पण हा प्रश्न त्याच्या "MOM" नेच सोडविला. 

आता त्याची आज्जीच ("MOM") रोज रात्री गोष्ट सांगायला येणार हे नक्की.

(सोबत माझे ही इंग्लिशची उजळणी आई घेणार)

Happy English Stories चा साई फॉर मी सारखा प्रवाह अखंड माझ्या आयुष्यात रहावा व ह्या अशा पुस्तकांची घरोघरी लायब्ररी व्हावी व पिढ्यान पिढ्या इंग्रजी शिकण्यासाठी यांचा वापर व्हावा ही मोठ्या आईच्या चरणी सदिच्छा....मी अंबज्ञ आहे....

- Reshmaveera Narkhede