Saturday, December 25, 2010

बापूराया, हे वर्ष चमत्कारीक आहे


हे वर्ष चमत्कारीक आहे
जे कधी नव्हते ते
सगळ यंदा घडत आहे

मनात उमटलेली पुसटशी इच्छा देखील
सदगुरु पूर्ण करीत आहे
त्याचे भरभरून प्रेम अनुभवताना
माझी आकृती घडत आहे
जे कधी नव्हते ते
सगळ यंदा घडत आहे
बापूराया, हे वर्ष चमत्कारीक आहे

परीसस्पर्शाची अनुभूती
सोबतीला अनिरुद्ध गती
प्रत्येक सुप्त इच्छेची पूर्ती
सुख आणि दुःखाचीही तृप्ती
सगळी कसं असं जमवून आणले आहे
जे कधी नव्हते ते सगळ यंदा घडत आहे
खरच बापूराया,  हे वर्ष चमत्कारीक आहे

गेल्या २५ वर्षात जगले नसेन
असे आयुष्य या एका वर्षात जगले
सदगुरु तुझी मी किती ऋणी झाले
अन तुझीया लिलेने भरुनी पावले
यशाअपयशाच्या व्याख्या तू सार्या बदलल्या
कल्पना ही केली नसेन अशा घटना घडविल्या
अजब लाभेवीण प्रेमाची ही जणू गजब कहाणी आहे
जे कधी नव्हते ते सगळ यंदा घडत आहे
खरच बापूराया,  हे वर्ष चमत्कारीक आहे

जे घडतेय ते असच सुरु राहू दे
सुख असो की दुःख ते तुझ्या इच्छेने येऊ दे
तुझी इच्छा माझे प्राण होऊ दे
माझी इच्छा तुझे गुणगान होऊ दे
हे वर्ष संपताना माझ्या इच्छा देखील संपतील
पुढील वर्षी मात्र फक्त तुझ्या इच्छा उरतील
तुझ्या इच्छेच्याच प्रातांत राहण्याचा माझा
नवीन वर्षांचा संकल्प आहे
जे कधी नव्हते ते सगळ यंदा घडत आहे
खरच बापूराया, हे वर्ष चमत्कारीक आहे

- रेश्मा हरचेकर २५/१२/२०१०

Friday, December 24, 2010

वास्तूबाधा

वास्तूबाधा विषयी सागताना प.पू. बापूंनी २३ -१२ २०१० च्या प्रवचनात  सांगितलेले काही महत्वाचे points

१) स्वतःच्या घरात कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये .

२) तुमच्या घरात कोणीही मनुष्य बाहेरून आत आला की प्रथम त्याला तुमच्या देवाचा /सद्गुरूंचा फोटो दिसलाच पाहिजे.(ह्यामुळे जर कोणी मनुष्य वाईट हेतू घेवुन तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर त्याचे विखार (वाईट विचार ) तुमचा देव स्वत:कडे घेतो .)

३) किचन मध्ये तुमच्या शेगडीच्या विरुद्ध (समोरच्या बाजूस तुमच्या  देवाचा फोटो असलाच पाहिजे .
ह्यामुळे तुमच्या घरात जे अन्न शिजते ते तुमच्या देवाच्या नजरेखाली बनते.

४) तुमच्या बाथरूम मध्ये नळाच्या वरती कुंकू/हळद/अष्टगंध ह्याने रोज स्वस्तिक काढावा. तो paint करून घेवु नये . तर रोज हाताने काढणे आवश्यक आहे. जर शौचालय  व  बाथरूम एकत्र असेल तर शौचालायापासून दूर नळाच्या वर स्वस्तिक काढावा.

५) रोजची अंघोळ म्हणजे स्वत: स्वत:ला अभिषेक करणे म्हणून रोजची आंघोळ करताना सद्गुरूंचे नामस्मरण करावे .(ॐ ग्लौम  अनिरुद्धाय नम: )

**** तुमच्या राहत्या घरात जर वास्तू बाधा आहे असे जाणवत  असेल तर पुढील तीन  महत्वाच्या गोष्ठी प.पू.बापूंनी  करण्यास  सांगितल्या .

१) कुठल्याही एका मंगळवारी आदिमाता चंडीकेचा फोटो हृदयाशी डाव्या बाजूला धरून श्री गुरूक्षेत्रम मंत्र म्हणत दिवसाच्या आठ भागात प्रत्येक वेळी कमीत कमी ६ मिनिटे घरात फिरावे . ( दिवसाचे  आठ भाग म्हणजे रात्री ११.३० ते दुसर्या दिवशी रात्री ११.३० पर्यंतचा काळ .ह्या काळाला ८ भागात विभागणे म्हणजे ३ तासाचा एक भाग होतो. ह्या एका भागात ६ मिनिटे असे ८ वेळा म्हणजे ४८ मिनिटे वर सांगितल्या प्रमाणे श्री गुरूक्षेत्रम मंत्र म्हणावा .( ** असा मंत्र म्हणताना त्या मंगळवारी  घरात उपस्थित असणार्या कोणाचा वाढदिवस नसावा व तो दिवस अमावास्येचा नसावा )

२)  घराला जर भूत किवा अन्य कुठली बाधा जाणवत असेल तर कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी डाव्या हातात उदीचे भांडे  घेवून उजव्या हाताने घराच्या  उंबरठ्यापासून उदी लावायला सुरुवात करावी व सगळी कडे  भिंती , कपाटे ,बाथरूम  प्रत्येक ठिकाणी घरात उदी लावत जावे . उदी लावण्याचा काळ पौर्णिमा जेव्हा सुरु होते व जेव्हा संपते ह्या मधलाच असावा. ही गोष्ट वर्षातून एकदा केली तरी चालते .

३) तिसरी महत्वाची  वास्तू बाधानाशक गोष्ट  म्हणजे प्रपत्ती ..श्री रण चंडिका  प्रपत्ती व  श्री मंगल चंडिका प्रपत्ती .

" तुमची स्वत:ला जेवढी खात्री नसेल तेवढी मला तुमची  खात्री आहे ..तुमचे दोष मी मोजत नाही तर तुमचे गुण मी मोजतो ". --- प.पू. सदगुरू श्री अनिरुद्ध बापू

----- ( श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन ..२३-१२-२०१० )