Showing posts with label Bapu Poem's. Show all posts
Showing posts with label Bapu Poem's. Show all posts

Friday, November 7, 2014

माझा नाद राया तू सोडलासच नाही


न मागता राया तू दिलेस सर्व काही
पण त्याची जाण मी कधी राखलीच नाही
अशी मी जन्मासी आले जरी करंटी
पण माझा नाद राया तू सोडलासच नाही



मी चुकत होते तू मला सावरत होतास
मन सुटले होते तू त्यास आवरत होतास
अश्या मी चुका कधी चुकवल्याच नाही
पण तू तुझ्या प्रेमात कधी चुकलासच नाही
आणि माझा नाद राया तू सोडलास नाही



मारुन मुटकून मला वठणिवर आणलेस
ओढून ओढून तुझ्या मार्गावर आणलेस
तुझी पकड माझ्याकडून सुटलीच नाही
तू ही मला एक क्षण मोकळे टाकले नाही
असा माझा नाद राया तू सोडलासच नाही



मी न जाणे काय ते दिसले तुला माझ्यात
दगड मी ज्याचे काही ना अध्यात न मध्यात
तरी मजवरील क्रुपा तुझी आटली नाही
हे तुझे अकारण कारुण्य दुसरे काहीही नाही
म्हणूनच माझा नाद राया तू सोडलास नाही



तुझ्या परिस स्पर्शाने आता सुवर्ण मन झाले
रोम रोमातून राया तुझे सुवर्ण नाम स्त्रवले 
आता मागे वळून कधी पाहणारच नाही
तुझ्या प्रेमाची लूट कधी थांबवणारच नाही
राया आता मीच तुझा नाद सोडणार नाही



तुझा नादच जीवनात साद घेवून आला
साद घालताच तुझा प्रतिसाद देखील आला
साद प्रतिसादाचा खेळ आता थांबतच नाही
असा प्रत्येक क्षण अनिरुद्धमय अनुभव होई
कारण तुला माझा, मला तुझा नाद सोडवत नाही


- रेश्मा नारखेडे

Wednesday, October 8, 2014

प्रेम किती छोटा शब्द आहे


प्रेम किती छोटा शब्द आहे
पण सार विश्व यात सामावले आहे
प्रेमाची सुरूवात नंदाई आहे
अन् प्रेमाची अनंतता अनिरूद्ध आहे

युगान युगे एकमेकांच्या साथीने
हा विश्व संसार चालवित आहेत
सुखाचे करण्यास बाळांचे जीवन
आई बापू दिन रात झटत आहेत

असंख्य वादळे असंख्या वेदना
क्षणा क्षणाला झेलत आहे
बाळांच्या समाधानासाठी मात्र
यांच्या चेहर्यावर प्रेमळ हास्य आहे

बाबा आई जस तुमचे प्रेम
माझ्या जीवनात चैतन्य आणतं
तस तुमच्या चेहर्यावरील समाधान
मनाला खूप शांतता देत असतं

बाबा आई मी तुम्हाला
भेट देण्यास असमर्थ आहेे
तरीहि मला काही तरी
आज द्यावेसे वाटत आहे

समाधान व निश्चिंतता
तुमच्या बाळांकडून तुम्हास कायम मिळो
मोठी आई फक्त एकच कर
कणभर का होईना यास मिही
जबाबदार ठरो....

- रेश्मावीरा नारखेडे

Saturday, May 21, 2011

श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात,,,,, माय चण्डिका ठसली मनामनात


श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात
सार्या अशुभाचा करुनी ग नाश
हा अनिरुद्ध नाचतो तिच्या पुढ्यात
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

अखिल कामेश्वरी महालक्ष्मी उभी
प्रसन्न वदने आशिष देईल अशी
वात्सल्यझरा वाहे तिच्या नयनात
हा अनिरुद्ध भिजतो तिच्या प्रेमात
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

आरोग्यभवानी महासरस्वती उभी
शुभ्रवर्णे तारुन नेईल अशी
अचिंत्यदानी रुप तिचे जनात
हा अनिरुद्ध दंगतो तिच्या नामात
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

कालनियन्त्री महाकाली ही उभी
असुरी वृत्ती नष्ट करीते अशी
असुरांच्या मुंडी असे जिच्या गळ्यात
हा अनिरुद्ध रंगतो तिच्या रंगात
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

रक्तवर्ण रक्तदंतिका उभी
बालरक्षणा उग्र मुद्रा अशी
हरेक श्वासात जी असूर असे चावत
हा अनिरुद्ध तिच्या मातृछायेत
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

गंगा माय असे इथे साक्षात उभी
अवतरली अनिरुद्धाकारणे अशी
भक्त देवाचा संगम जिच्या उदरात
हा अनिरुद्ध रिघतो तिच्या कुशीत
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

अकरा असुरांचे दहन महाकाली कुंडात
महालक्ष्मी दिप नित्य असे तेवत
महासरस्वती वापीत अवघा रंग एक
ह्या अनिरुद्धाची तळमळ तू देख
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात

दुर्गा वरद नवकला होम करुनी
मातृभक्तीची अनोखी देणगी दिली
मंत्रमालिनीचे अखंड गुण गात
हा अनिरुद्ध आम्हा असे तारत
श्री वरदाचण्डिका प्रसन्न उत्सवात
माय चण्डिका ठसली मनामनात



- रेश्मावीरा हरचेकर, 21 May 2011

Thursday, April 28, 2011

"आईचा गोंधळ"


नंदा आई तुझ्या कृपेने तू तारीशी भक्ताला
धावत ये लवकरी जीव हा कासावीस झाला
आई कृपा करी आम्हावरी
जागवितो रात सारी (२)
आई गोंधळाला ये...
गोंधळ मांडिला ग नंदे गोंधळाला ये
उदे उदे उदे उदे उदे उदे उदे

बापू तुझे मिलने का....


बापू तुझे मिलने का रामनाम ही बहाना है
दुनियावाले क्या जाने इससे रिश्ता पुराना है

अरे शिर्डी मैं धूंडा तुझे मुंबई मैं पाया है
दाभोलकर के (२) साईनिवास से ओ शुरु मेरे बापू की कहानी है ||1||
... बापू तुझे मिलने का....

अरे राधा को धुंडा मैने, मीरा के प्रभू को पाया है
बापू के (२) हृदय मैं, मेरी नंदाई की मूरत है ||2||
बापू तुझे मिलने का....

अरे लक्ष्मण को समझा मैने, बलराम को पाया है
सुचितदा के (२) स्वरुप मैं प्यारे शेषराज को पाया है ||3||
बापू तुझे मिलने का....

अरे भागवत को पढा मैंने, और गीता को पढा है
आद्यपिपा की (२) पिपासा से ओ मैंने सिर्फ बापू को ही पाया है ||4||
बापू तुझे मिलने का....

अरे गलियो मैं धुंडा तुझे, मंदीरो मैं धूंडा है
मेरे ही (२) हृदय मैं ओ मरे बापू का सिंहासन है ||5||
बापू तुझे मिलने का.....

अरे अंदर पाय तूझे, बाहर भी पाया है
बापू के (२) चरणॊ मैं, इस पगली का ठिकाना है ||6||
बापू तुझे मिलने का.....

- रेश्मावीरा हरचेकर, वर्ष २००३

सुरु झाली ग..


सुरु झाली ग..झाली ग...माझ्या आयुष्याची गाडी
सोबत लाभली रे मला या बापूरायाची गोडी

वेडू वाकुडे पाऊल, या वाटेवर पडू जाय (२)
तरी सांभाळे सांभाळे माझी सावळी गुरुमाय...
...आता हिच्या विना माझ्यात जे उरेल ते काय? ॥१॥
सुरु झाली ग....

माझी प्रित हा बापू, त्याच्या प्रितीची नंदाई (२)
आईची छाया ग, माया ग दिली या नंदेने
झाले रे मी पावन बुडले रे प्रेमाने ॥२॥
सुरु झाली ग...

सुचितमामा माझ्यासाठी धावती उठाउठी
माझं जीवन जीवन या मामाच्याचसाठी
आधार असे हा माझा सावली आईबापूंची ॥३॥
सुरु झाली ग...


आद्यपिपा देवयान पंथी नाम घेऊन उरापोटी
मी चालली ग, चालली ग आद्यपिपांच्याच पंथी
बांधूनी सच्ची घट्ट गाठ त्यांच्या मनगटाशी
सुरु झाली ग...

माझे शेवटचे ठिकाण या बापूचे चरण
बापूच आहे ग आहे ग माझ्या गाडीचा चालक
तोची चालक, मालक, माझा प्रेमळ पालक
तोची चालक, मालक विश्वाचा प्रेमळ पालक
सुरु झाली ग....
- रेश्मावीरा हरचेकर

Saturday, December 25, 2010

बापूराया, हे वर्ष चमत्कारीक आहे


हे वर्ष चमत्कारीक आहे
जे कधी नव्हते ते
सगळ यंदा घडत आहे

मनात उमटलेली पुसटशी इच्छा देखील
सदगुरु पूर्ण करीत आहे
त्याचे भरभरून प्रेम अनुभवताना
माझी आकृती घडत आहे
जे कधी नव्हते ते
सगळ यंदा घडत आहे
बापूराया, हे वर्ष चमत्कारीक आहे

परीसस्पर्शाची अनुभूती
सोबतीला अनिरुद्ध गती
प्रत्येक सुप्त इच्छेची पूर्ती
सुख आणि दुःखाचीही तृप्ती
सगळी कसं असं जमवून आणले आहे
जे कधी नव्हते ते सगळ यंदा घडत आहे
खरच बापूराया,  हे वर्ष चमत्कारीक आहे

गेल्या २५ वर्षात जगले नसेन
असे आयुष्य या एका वर्षात जगले
सदगुरु तुझी मी किती ऋणी झाले
अन तुझीया लिलेने भरुनी पावले
यशाअपयशाच्या व्याख्या तू सार्या बदलल्या
कल्पना ही केली नसेन अशा घटना घडविल्या
अजब लाभेवीण प्रेमाची ही जणू गजब कहाणी आहे
जे कधी नव्हते ते सगळ यंदा घडत आहे
खरच बापूराया,  हे वर्ष चमत्कारीक आहे

जे घडतेय ते असच सुरु राहू दे
सुख असो की दुःख ते तुझ्या इच्छेने येऊ दे
तुझी इच्छा माझे प्राण होऊ दे
माझी इच्छा तुझे गुणगान होऊ दे
हे वर्ष संपताना माझ्या इच्छा देखील संपतील
पुढील वर्षी मात्र फक्त तुझ्या इच्छा उरतील
तुझ्या इच्छेच्याच प्रातांत राहण्याचा माझा
नवीन वर्षांचा संकल्प आहे
जे कधी नव्हते ते सगळ यंदा घडत आहे
खरच बापूराया, हे वर्ष चमत्कारीक आहे

- रेश्मा हरचेकर २५/१२/२०१०