Thursday, April 28, 2011

"आईचा गोंधळ"


नंदा आई तुझ्या कृपेने तू तारीशी भक्ताला
धावत ये लवकरी जीव हा कासावीस झाला
आई कृपा करी आम्हावरी
जागवितो रात सारी (२)
आई गोंधळाला ये...
गोंधळ मांडिला ग नंदे गोंधळाला ये
उदे उदे उदे उदे उदे उदे उदे


शुंभ-निशुंभाचे सरदार (२) माजले
जीवन आमुचे त्यांनी आई त्यांनी ग घेरीले
आई तू प्रकटूनी त्यांन एका घासात ग्रासिले
घोर कष्टातूनी आई आम्हा ग रक्षिले
भक्त माता तू, जगतपालिनी, तू च ग नंदाई (२)
आई गोंधळाला ये
गोंधळ मांडिला ग नंदे गोंधळाला ये
उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे

रक्तबीजाचे रक्त प्राशूनी त्याचा नाश करीशी
काळाच्याही वर राहूनी काळाला नमविशी
काळ, वेळ, भूत, भविष्य तुझिया चरणाशी
आम्ही ही आलो शरण आई बघ चरणधुळीशी
कलिका तू, काली तू, तूच ग नंदाई (२)
आई गोंधळाला ये
गोंधळ मांडिला ग नंदे गोंधळाला ये
उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे

चण्ड-मुण्ड मारुनी तू आदीमातेला वाहिले
चामुण्डा म्हणूनी आदिमातेने तुजला गौरविले
कृपादृष्टी बनवून तुज नैनात ठेविले
हेच नयन आम्हावरी कृपा म्हणूनी बरसले
जानकी तू, पार्वती तू, तूच ग नंदाई (२)
आई गोंधळाला ये
गोंधळ मांडिला ग नंदे गोंधळाला ये
उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे

श्री सुक्ताने आदीमातेचे तू स्तवन केले
कुंकूमतिलकात मायेने तुला ग धारिले
तुजला प्रिय जो, तोची आदीमातेचा जाहला
असा आशिर्वाद माये तुजला ग दिधला
लक्ष्मी तू, कमला तू, तूच ग नंदाई (२)
आई गोंधळाला ये
गोंधळ मांडिला ग नंदे गोंधळाला ये
उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे

- सुहासिनीवीरा निकम व रेश्मावीरा हरचेकर
२०१०-११ आत्मबल गुरुक्षेत्रम प्रोजेक्टसाठी केलेला गोंधळ
चाल : आई भवानी तुझ्या कृपेने (चित्रपट : सावरखेड एक गाव)

No comments: