Friday, September 10, 2010

गणपती माझा नाचत आला!!!

आज घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे..मी अनुभवलेले गणरायाचे सगळ्यात सॉलिड आगमन म्हणजे बापूंच्या घरच्या गणपतीचे आगमन. संध्याकाळी चार पाचच्या सुमारास बांद्रा पश्चिम लिंक रोडवरील अमरसन्स शोरुमजवळच्या गल्लीतून बापूंच्या घरच्या गणरायाच्या आगमनाची मिरवणूक निघते. सगळ्यात पुढे लेझीम पथक, नंतर दिंडी, आणि बेन्जो असे वेगवेगळे ग्रुप्स या मिरवणूकीत् सहभागी होतात. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करुन मिरवणूकीला सुरुवात होते..अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लहान मुले-मुली, महिला-पुरुष भक्तगण या मिरवणूकीत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या मिरवणूकीत सगळे स्वतःला विसरुन सहभागी होतात. सॉलिड नाचतात. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये आणि डॉ. पौरससिंह जोशी यांच्यासह समस्त बापू भक्तगण परिवार या मिरवणूकीत सहभागी होतो. अंधार होता होता...मिरवणूक बापूंच्या घराजवळ हॅपी होमला पोहचते..गजर, संगीत आणि बाप्पाच्या आगमनाचा आनंद टीपेला पोहोचतो. हॅपी होमच्या गेटजवळ भक्तांची अलोट गर्दी दाटलेली असते. गेटवर लेझीम पथक आधी येते...बापू आई दादा स्वतः गणरायाचे स्वागत करण्यासाठी खाली सज्ज असतात. लेझीम पथक आपले वेगवेगळे कर्तब बापूंपुढे सादर करतात..प्रत्येक जण बापूंचे दर्शन घेऊन नाचत पुढे जातो...मग मागून गणराय येतो...नंदाई गणरायाचे स्वागत करण्यासाठी औक्षणाचे ताट घेऊन आलेली असते. अत्यंत प्रेमाने नंदाई गणरायाचे औक्षण करते. मग गणेशमूर्ती घरी नेल्यावर बापू बेन्जोच्या तालावर सॉलिड नाचतात. त्यावेळेला जे तिथे वातावरण असते त्याचे कुणी वर्णनच करु शकत नाही, असे मला वाटते. ही गोष्ट प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी. गेल्यावर्षी मी हे सारे अनुभवले...आता यंदा काय काय होतेय याची मला आता उत्सुकता लागली आहे...मिरवणूक सुरु होण्यापर्यंतची अधीरता आणि सगळा कार्यक्रम संपल्यानंतरची तृप्तता याच्यासारख दुसर काही नाही....अरे हो!! ही तर फक्त आगमनाच्या मिरवणूकीची गोष्ट सांगितली....खरतर विसर्जनाच्या मिरवणूकीची याहून मोठी धम्माल आहे...आगमनाची मिरवणूक म्हणजे विसर्जन मिरवणूकीच्या तुलनेत फक्त १ टक्के आहे असे मला वाटते...सो. आज या. अनुभवा! पण एक लक्षात ठेवा...हा ट्रेलर आहे....पूर्ण पिक्चर तर सोमवारी आहे!!!!!
मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!