Wednesday, November 24, 2010

अनिरुद्धाचे तरुण...

हरि ॐ

"कायम तरुणच रहा" हा बापूरायाने दिलेला मंत्र खूप काही सांगून जातो...परेड फाऊंडेशन डेला बापूरायाने त्याच्या परेडच्या सर्व "तरुण" फौजेला हा मंत्र दिला...पण इथे वयाचे तारुण्य अपेक्षित नव्हते....तर वृत्तीचे, कृतीचे, कार्याचे तारुण्य अपेक्षित होते...तारुण्य म्हणजे केवळ कॉलेज विश्वात फुकट शायनिंग मारणार्या मुलांचे भरकटलेल वर्तन नव्हे...तर तारुण्य म्हणजे चैतन्य...तारुण्य म्हणजे नवीन काही करण्याची उर्मी...तारुण्य म्हणजे नवीन बदल स्वीकारण्याची मानसिकता...तारुण्य म्हणजे मोठेपणावर मारलेली काट आणि स्विकारलेले जाणारे लहानपण...तारुण्य म्हणजे एखाद्या ध्येयाने प्रेरित झालेले आयुष्य....तारुण्य म्हणजे कार्यशक्ती....अस मला वाटते...कारण जो स्वतःला वृद्ध समजू लागला त्याची कार्यशक्ती आपोआपच मंद होत जाते..मग अगदी २५ वर्षाचा तरुण आळसात आपले दिवस घालवू लागला तरी तो वृद्धच आणि वयाने वृद्ध असणारे पण तरुणांना लाजवेल अशा जोशाने कार्यरत असणारे सर्व जण म्हणजे जिंदादील तरुणच...अशा या आगळ्या तरुणाईशी अनिरुद्ध परेडमध्ये ओळख झाली....त्यांच्याविषयीच थोडेसे लिहणार आहे....

शनिवारी परेड सराव म्हणजेच रंगीत तालिम करताना एका प्लाटूनमध्ये एका व्यक्तीला परेड करताना पाहिले आणि आश्चर्याने पाहतच बसलो...आमच्या आजोबांच्या वयाचे एक डीएमव्ही सफाईदारपणे परेड करीत होते...दुसर्या दिवशी त्यांची भेट घेण्याचे ठरविले...औरंगाबाद प्लाटून मधील अरुणसिंह शास्त्री वयवर्षे
Arunsinh Shastri
६५.....त्यांच्याशी संवाद साधायचा म्हणजे कुठून सुरुवात करु हेच कळेना....त्यांना मी विचारले...कधी पासून अनिरुद्ध परेड पथकात आहात...मला उत्तर अपेक्षित होत...आत्ताच जॉईन केली...पण खर तर त्यांनी २००४ पासून परेड जॉईन केल्याचे त्यांनी सांगितले..हे ऐकून खरच मला त्यांचा अभिमान वाटला....त्यांनी सी सर्टीफीकेट मिळविले आहे....आणि त्यांना परेडची सवय असल्याचे त्यांनी मला सांगितले...त्यांना कुठलाही त्रास होत नाही...आणि तरुणांच्या बरोबरीने ते परेड करतात...आणि खरच त्यांची परेड खूप सुंदर आहे...त्यांना मी सहज एक प्रश्न विचारला की आम्हा लहान मुलांसोबत परेड करताना...आमच्या कमांडखाली कार्य करताना कस वाटत...तेव्हा ते म्हणाले खरच खूप छान वाटते...अस लहान मोठ काही वाटत नाही...सगळे एकाच पातळीचे आहोत...त्यांच्या या उत्तराने मला त्यांच्यातील तरुणाईची साक्ष पटली...त्यांनी स्वतःहून दोन ते तीन पिढ्यांमधील जनरेशन गॅप कमी केला....आणि यापूढेही ते परेडमध्ये राहणार अस त्यांनी सांगितले...
Vinayaksinh Joshi

त्यानंतर मी औरंगाबादचे ४५ वर्षीय विनायकसिंह जोशी यांची भेट घेतली...त्यांच्याशी संवाद साधताना...इच्छा असेल तिथे मार्ग...ही उक्ती कशी परफेक्ट आहे हे जाणवले...विनायकसिंह यांना सैन्यात जाण्याची फार इच्छा होती...मात्र त्यांना त्यांच्या कमी उंचीमुळे जाता आल नाही..एनसीसीमध्येही त्यांना भाग घेता आला नाही..सैन्यात भरती होण्याची त्यांची ही तीव्र इच्छा पूर्ण झाली नाही....मात्र ही तीव्र इच्छा अनिरुद्ध पथक परेड मध्ये पूर्ण होणार होती..म्हणून त्यांनी परेड जॉईन केली...सैनिक नाही होता आलं. पण वानरसैनिक बनण्याची संधी त्यांनी सोडली नाही..आणि परेड मध्ये असल्याचा आनंद, अभिमान आणि उत्साह त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता...ते पुढे तर परेड कंटीन्यू करणारच आहेत..शिवाय त्यांनी आपल्या मुलीला देखील परेडमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठींबा दिला आहे...त्यांची मुलगी देखील पुढच्या प्लाटूनमध्ये होती...
Vinaysinh Chndrate
त्यांच्याच प्रमाणे विनयसिंह चंद्राते (५७) दिलीपसिंह जोशी (५०) यांनी देखील याचवर्षी पासून परेड जॉईन केली...आणि ते पुढे देखील परेड करीत राहणार आहे...या सर्वांना सुरवातीला थोडा त्रास झाला...पण म्हणतात ना डर के आगे जीत है.....तसच...त्या त्रासाची पर्वा न करता त्यांनी परेड करण्याचा निर्धार केला आणि आता ते फिट आहेत...

परेडसाठी फिटनेस हवा हे महत्त्वाचे आहे....म्हणजे अगदी कसला तरी भयानक त्रास आहे आणि मी परेड जबरदस्ती करतोय व त्रास वाढवून ठेवतोय..हे चूकीचेच..पण जर आपण फिजीकल फीट आहोत तर परेडमध्ये सहभागी होऊन हा फीटनेस वाढविता येऊ शकतो...पुढे बापूरायाचीच इच्छा...

Kailassinh Shete
Ganeshsinh Nanivadekar
त्याची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत परेड नक्कीच करु अस रत्नागिरि प्लाटूनच्या ४७ वर्षीय कैलाससिंह शेटे आणि ५३ वर्षीय गणेशसिंह नानीवडेकर यांनी सांगितले..कैलाससिंह यांची मुलगी आणि गणेशसिंह यांचा मुलगा परेडमध्ये सहभागी आहेत...खरच असे प्रोत्साहन देणारे वडील पाहून खरचं खूप छान वाटले..नुसते प्रोत्साहनच नाही तर स्वतः देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून परेडमध्ये सहभागी झाले...खरच त्यांना हॅटस ऑफ..
त्यानंतर मी मुंबई प्लाटूनच्या ५३ वर्षीय किरणसिंह पेटीवाले यांना भेटले...त्यांना तर मी स्वतः सराव करताना पाहिले...कुठलिही कुरकुर न करता इतरांप्रमाणे सर्व काही करीत होते...त्यांच्या उत्साहाला खरच सलाम....
Kiransinh Petiwale
Darshanaveera Bhat
जिथे हे सर्व सिंह आपले धैर्य दाखवत होते तेथे वीरा ही मागे नव्हत्या. प्रत्येक मुलींच्या प्लाटूनमध्ये या महिला डीएमव्ही आपला ठसा उमटवून होत्या....त्यांचे वयच कुणी सांगू शकणार नाही या जोशात परेड करत होत्या. आणि परेडचा ड्रेस अंगावर चढवला की मुलगा मुलगी..लहान मोठे हा फरकच विरुन जातो...उरतात फक्ता सिंह आणि वीरा....
पुणे प्लाटूनच्या ३३ वर्षीय दर्शनावीरा भट ह्या गेली २ वर्षे परेड येत आहेत आणि प्राऊड फील करतात. अनेक महिला होत्या...खरच त्यांच्याकडे पाहून खूप अभिमान वाटला..नेहमी साडी आणि पंजाबी ड्रेस घालणार्या महिला परेडचा गणवेष घालताना जराही कचरत नाही...त्यांच्या ह्या धीराला सलाम...खरी मज्जा तर मला नंतर आली...आमच्या मुंबईच्या दुसर्या प्लाटूनमध्ये नालासोपार्याची एक मुलगी होती...तिचे नाव आठवत नाही आडनाव सिंग आहे. तिची आईपण आमच्याच प्लाटूनला होती...मी म्हटल आई आणि मुलगी एकत्र वा छान!! तेवढ्यात दुसरी मुलगी म्हणाली आई आणि मुलगी नाही तर मुलगा पण आहे....तो अंडरट्रेनी प्लाटूनमध्ये होता...वा...खरच या सिंग कुटुंबाचा अभिमान वाटला...याच बरोबर तीन जोडपी देखील परेडला होती..नवरा बायको....दोघेही परेडला...खरचं..एक जण तर होते...ते लवकरच दुबईला शिफ्ट होणार होते...पण त्या आधी परेड करायची म्हणून ठरविले होते..आदल्या रात्री गणवेश शूज तयार ठेवले आणि परेडला दुसर्या दिवशी हजर...
खर सांगायची तर ही काही निवडक उदाहरणे मी दिली आहेत...अजून अनेक उदाहरणे परेडमध्ये आहेत...यांच्या उदाहरणातून काही मुद्दे तुमच्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
खर तर इच्छा असेल तर काहीच अशक्य नाही..आणि बापूराया म्हणतोच...तू आणि मी शक्य नाही अस या जगात काहीच नाही...मग अडतय कुठ....आपल्याच मधील ह्या डीएमव्हींकडून शिकले पाहिजे....आणि एकदा तरी त्याला सलामी देता आली पाहिजे....
ही सलामी म्हणजे देखील दुसर काय हो...."मी तुझा आहे आणि फक्त तुझाच आहे....तुझ्यासाठीच इथे आहे....आणि तू आहेस म्हणून मी आहे" हाच भाव...मी देतो ती सलामी म्हणजे मी बापूंना घातलेली "साद" आणि तो देतो ती सलामी म्हणजे "प्रतिसाद"...आणि माझी "साद" जितकी तीव्र तितका त्याचा "प्रतिसाद" जलद...ह्याचा अनुभव देणारी सेवा म्हणजे "अनिरुद्ध पथक परेड"