Wednesday, July 18, 2012

Birthday Gift to Nandai

लहानपणी मला कॅमेर्‍याचे जाम वेड होते आणि हे वेड प्रोफेशनमध्ये केव्हा बदलले हे कळले नाही. आज जरी वेगवेगळ्या फिल्डमध्ये मी काम करीत असले तरी फोटोग्राफीशी नाळ ही जुळलेलीच आहे. परंतु याचे सर्वस्वी श्रेय जाते ते माझ्या एकमेव ख‌‍र्‍या मित्राला. डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी अर्थात माझे सदगुरु श्री अनिरुद्ध बापू. २००५ पासून मी फोटोग्राफर झाले पण आज सात वर्षानंतर मला उमगतेय की "मला फोटोग्राफर व्हायचे होते म्हणून मी फोटोग्राफर झाले नाही. तर, बापूंना मला फोटोग्राफर करायचे होते म्हणून मी फोटोग्राफर सहज झाले." आजही मला वाटते की या क्षेत्रात अजून मला बरच काही शिकायचे आहे. अनेक वेगवेगळे टप्पे गाठणे आवश्यक आहे. अजून फोटोग्राफी प्रॅक्टीस आवश्यक आहे आणि म्हणूनच माझे फोटोग्राफीचे शिक्षण आणि सराव अजूनही सुरु आहे. ह्या फोटोग्राफीच्या फिल्डमधून बक्कळ पैसा कमावू शकते. परंतु पैसा कमाविण्याच्या दृष्टीने या फिल्डकडे कधी पाहिलेच नाही. पैश्यापेक्षा लाखमोलाचे असलेले समाधान कमविण्यात मला जास्त इंटरेस्ट होता, आहे आणि राहणार. आणि म्हणूनच मी स्वतःला मोस्ट सस्केसफुल फोटोग्राफर म्हणू शकते कारण मला माझ्या या कलेतून जे हव ते समाधान प्राप्त झाले आहे आणि हे तोच समजू शकतो ज्याचे त्याला अवगत असलेल्या कलेवर प्रेम आहे.
एकंदरीतच फोटोग्राफर म्हणून वावरताना मला इतर कोणत्याही फोटोग्राफरशी स्पर्धा आहे आणि ती मला जिंकली पाहिजे अस काही वाटले नाही. कारण "समाधाना"ची स्पर्धा कधीच नसते आणि ती कुणी ठेवू शकत नाही. आपले फोटोग्राफीचे टेक्नीक्स दुसर्‍यांबरोबर शेअर करायला देखिल कधी भिती वाटली नाही आणि वाटणार देखिल नाही. कारण एकच "समाधान"

इतिहासात अजरामर राहतील असे क्षण टिपण्याची संधी मिळतेय यासारख मोठ अवॉर्ड नाही. आता तुम्ही म्हणाल हे कस काय? अरे पुन्हा होणार नाही असा "श्री वरदाचण्डीका प्रसन्नोत्सव" कव्हर करायला मिळाला हे काय कमी समाधान देणारे आहे का? किंवा गेल्यावर्षी नंदाईचा ५० वा वाढदिवस कव्हर करण्यास मिळणे हे काय कमी समाधान देणारे आहे का? आज नंदाईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सारं आठवतेय. एक एक क्षण आठवतोय. तेव्हाचे सारे क्षण मेमरी कार्डवर किंवा हार्ड डिक्सवर तर आहेतच. पण हे सारं माझ्या मेमरीत आणि हार्ट डिक्सवर आहेच. त्यामुळेच आई बापू दादांचे सर्व एक्सप्रेशन्स, एक एक नाजूक अप्रतिम क्षण लक्षात आहेत.
अनेकांना बापूंचे वेगवेगळे अनुभव आले आहेत. मला असे काही अनुभव आलेले नाही. पण मी जे काय अनुभवलेय ते आता मला शेअर करावेसे वाटते. केवळ बापूंची एक भक्त म्हणून किंवा बापूंची सेवेकरी किंवा बापू आईंची मुलगी म्हणून नाही तर त्यासोबतच एक फोटोग्राफर म्हणून मी तुमच्याशी माझे अनुभव शेअर करणार आहे. त्यामुळे आजच्या शुभदिनापासून "The Bapu - From My View Finder" ची सुरुवात करीत आहे. मला माहित नाही मी पुढे आता काय काय लिहणार पण जे काय लिहेन ते मला समाधान देणारे, वाचकांना समाधान देणारे नक्कीच असेल याची खात्री मी देऊ शकते. कसे?
Because My View Finder is based on Camera of Pure and Ultimate SAMADHAN and this series is birthday gift to my beloved NANDAI. 
Happy Birthday Aai.
I love You.