Aniruddha Bapu Quotes

Aniruddha Bapu Quotes (From Pravachan)

Date : 5/8/2014

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
You are not judged by your performance, but by your faith 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आम्ही निर्णय चांगला घेतला पण तो टिकला नाही. आमचं मन इतक्या ठिकाणी खेचलं जातं की ते एका ठिकाणी concentrate नाही होत. इथेच त्रिविक्रम मदतीला येतो. तो तुमच्या मनोमय, प्राणमय आणि अन्नमय देहावर एकाच वेळी पाऊल टाकतो म्हणजे तिघांना एकत्र आणतो. म्हणून त्रिविक्रम जो उच्चार मनात रोवतो तो पार पडतोच.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मौनम्‌ सर्वार्थ साधनम्‌’ - “हे त्रिविक्रमा, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे’’ अतिशय शांत चित्ताने डोळे बंद करून हे बोलायचा प्रयत्त्न करा. डोळे बंद करा, अंगाची हालचाल करू नका. शरीराची, तोंडाची हालचाल करू नका. मानसिक हालचाल करू नका. मनात विचार येऊ नयेत म्हणून प्रयत्न करू नका. मनात फक्त हाच विचार करा की, ‘त्रिविक्रमा, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे.’ हे मनातल्या मनात बोलत राहायचं. ओठांची हालचाल अजिबात करायची नाही. मनात एखादा विचार येत असेल तर त्याला घालवायचा प्रयत्न करु नका आणि त्याला वाढवायचाही नाही. मग बघा, हे वाक्य तुमच्या मनाला कसं shape देतं! हे वाक्य तुमच्या मनाला शेप देणारं आहे. हे invitation आहे. जेवढा जास्त वेळ कराल तो तेवढा अधिकाअधिक प्रखर होणार. दररोज सकाळी पाच मिनिटं आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिट करा. सकाळी नाही जमलं तरी रात्री नक्की करा. ह्या पाच मिनिटांत तुमचं आख्खं आयुष्य बदलू शकतं. दररोज पाच मिनिटं तुमच्या मनातले विचार आणि त्रिविक्रमाचा तुमच्यासाठीचा प्लॅन आणि तुमची आत्ताची परिस्थिती यातली तफावत ह्यामध्ये जो विचार आवश्यक आहे तो विचार त्रिविक्रम वाढवेल आणि जो अहितकारक आहे तो विचार दूर करेल. Enjoy that peace.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तुम्ही स्वत:ला का फालतू ठरवता? तुम्हाला काय देवाने तुमचा judge म्हणून निवडलयं का? त्याला Judge करु दे. तो त्रिविक्रम क्षमा करायला तयार आहे पण आमचं मनच आम्ही केलेल्या चुका उगाळत राहतं. कुठलाही निर्णय नीट घेण्यासाठी मन शांत असावं लागतं की परमेश्वराशी अनुसंधान जमतं आणि मग कुठलीही वाईट शक्ती, विचार छळूच शकत नाहीत.  
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंगी हा अतिशय जुना प्राणी आहे. Swarm Intelligence हे शास्त्र develop होतंय. मधमाश्यांचा, पक्ष्यांचा ही थवा असतो. Swarm Intelligence मुळे सायन्सची जोरदार प्रगती होत चाललीय. मुंग्या घर बांधतात, सुरळीतपणे बांधतात. एका शास्त्रज्ञाने लिक्विड सिमेंट वारुळात टाकलं. त्याला दहा टन सिमेंट लागलं, तेव्हा त्याला वारुळाचं स्ट्रक्चर मिळालं. मुंग्या अन्न गोळा करताना एकमेकांना गाईड करतात, नवीन घर शोधतात, काही मुंग्या शेती करतात काही प्रकारचे फंगस वाढवून, त्याचे ताफे तयार करतात. काही मुंग्या पशुपालन करतात. किटक गोळा करतात, त्यांच्याकडून त्या मध गोळा करतात. एका वारुळातल्या मुंग्या दुसर्‍या वारुळावर हल्लादेखील करतात आणि त्यांना गुलाम बनवतात. ही कळपाची बुद्धीमत्ता आहे. मुंगी सारखा प्राणीसुद्धा मोठं कृत्य करू शकतो. मग माणसाला काय अवघड आहे?  
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Date : 27/2/2014

प्रदोष समय म्हणजे सूर्यास्ताआधीचा अर्धा तास आणि सूर्यास्तानंतरचा दीड तास प्रदोष काळात शिवाचं पूजन करणं म्हणजे शिवाला प्रार्थना करणं, “देवा, माझ्या मनात, शरीरात, प्रारब्धात, पुर्व जन्मात, पुढच्या जन्मात, आजच्या जन्मात जे काही transform घडवायचं आहे ते तू तुझ्या मनाप्रमाणे घडवून आण.”  
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवाला काय वाहतो आपण - बेल. बेल म्हणजे काय? दोन हाथ आणि एक माथा. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ह्यांच्यामधील संयुक्तिक करणारी रचना ह्यात - ‘तुला पाहिजे ते घडवून आण. शिवा तुला जे बदल घडवून आणायचेत त्याचं freedom तुला आहे. तुला जसं हवं तसं कर. मी मध्ये पडणार नाही आणि मी मध्ये आलो तर मला बाजूला काढ.’ 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा ह्या दिवसात परमात्मातत्वाने त्याचे maximum व्हायब्रेशन्स मोकळे केलेले असतात. त्यावेळी ते आमची capacity बघत नाही. ‘महाशिवरात्र’ हा अख्खा दिवस पवित्र आहे. ह्या दिवशी बेल व्हा. देवाला सांगा, ‘Yor are Welcome, माझ्यात तुला जे बदल घडवायचेत ते बिनधास्तपणे घडवून आण. दर महिन्यामध्ये शिवरात्र असते आणि गुरुक्षेत्रम्‌मध्ये शिवरात्रीला दर महिन्याला ‘महादुर्गेश्वराचं पूजन’ असतं हे किती जणांना माहीत आहे? दर महिन्याला दुर्गाष्टमी आणि शिवरात्र असते. इतर दिवशी आपली ताकद जास्त लागते. शिवाला आवाहन करायचं, ‘हे महादेवा, तुला जे बदल घडवून आणायचे आहेत ते बिनधास्त घडवून आणं. मी मध्ये आलो, आड आलो तर, मला बाजूला काढ. पण तुला पाहिजे तेच कर. त्यासाठी तुला full freedom आहे.  
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रामनवमी, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, दत्तजयन्ती, महाशिवरात्र आणि कार्तिकी एकादशी हे सात दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. ह्या दिवशी नॉन-व्हेज खायचं नाही. तसेच तीन उत्सव - गणपती (घरात असेल तर), नवरात्र (घरात असेल तर) आणि पादुका - उत्सवासाठी घरात असतील तर. नाही तर प्रमुख सेवक म्हणतील की, आमच्याकडे घरी पादुका असतात तेव्हा आम्ही नॉनव्हेज खायचचं नाही? हे दिवस अतिशय पवित्र आहेत. महाशिवरात्र अतिशय शुभ, पवित्र आहे. हा दिवस परमशिवाच्या, त्याच्या मातेच्या, गौरीच्या स्मरणात घालू तर अतिशय चांगला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दरवर्षी आपण हनुमान चलिसा १०८ वेळा एक दिवस म्हणतो. मग एक दिवस असा का असू शकत नाही. घरातल्या सर्वांच सहकार्य घ्यायचं. फक्त एक दिवस लवकर उठायचं टीव्ही. बघायचा नाही. वर्तमानपत्र वाचायचं नाही. शांतपणे देवाचं नावं घ्यायचं. कुठलाही मंत्र घ्या, रामनाम घ्या, आईचे वचन घ्या - ‘I Love My Child Always’ ‘माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते’. अख्खं स्तोत्र घ्यायची गरज नाहीए. ‘ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथ नम:’ म्हणा. दिवसभर ते म्हणत राहायचं, वर्षातून एक दिवस तरी असा हवा. आपल्या capacity नुसार दिवसभर देवाचं नावं घ्यायचं. करून बघा, बाळानों ! शुभ दिवस शोधत बसू नका. वर्षातून एक दिवस घ्यायला काहीच कठीण नाही. मनापासून करून बघा. वाचन करू नका. मनात किंवा तोंडाने म्हणा. मग त्याचं connection कसं घडणार हे तुम्हाला नंतर कळेल. मी तुमच्याकडून promise मागत नाहीए पण एकदा करा. 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
व्यासांचे आश्वासन आहे - “जो कोणी, स्त्री किंवा पुरुष दिवसातून सोळा तास नामस्मरण करतो. तो दिवस त्याच्यासाठी महाशिवरात्र असतो.वर्षातून दोन महाशिवरात्र असायलाच हव्यात. 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Date : 20/2/2014
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्ही आमच्या आईच्या मांडीवर बसून तिच्या गाऊनबरोबर खेळत तिच्याशी कधी गप्पा मारल्यात का? आई ९० वर्षाची असेल सो व्हॉट !, आईला कधी प्रेमाने मिठी मारली का? बाबांना कधी प्रेमाने विचारलं का, बाबा तुमचे पाय चेपून देऊ का?, आपण कधी मुलांना सांगतो का, आज तू खूप अभ्यास केलास चल आपण सगळे मिळून फिरायला जाऊ कुठेतरी. नवरा बायकोला सांगतो का, आज आपण शांतपणे फक्त एकमेकांविषयी बोलायचं. पती-पत्नीच्या नात्याला इतकी वर्ष झालीत म्हणून त्याला सुगंध नाही का? एकमेकांच्या आयुष्यातला सुगंध मल्टीप्लाय व्हायला पाहिजे. आतापर्यंत गोळा केलेला आनंद एकमेकांच्या पदरात ओता. एकमेकांकडे नुसतं बघत बसा - तो एक क्षण महत्त्वाचा आहे. बहीण लग्न करून गेल्यावर आपण कितीवेळा चौकशी करतो तिची. भाऊ कर्तव्य म्हणून भाऊबीजेला येतो आणि बहीणसुद्धा कर्तव्य म्हणून बर्फीचा तुकडा आणते. मानपान येतात नात्यांमध्ये. एक क्षण सुद्ध प्रेमाने देत नाही. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाणी कसं प्यायचं तर आपण जेवतो तसं एक-एक घोट घेत. पाणी एक-एक घास खातो तसं पाणी पिण्यामध्ये मोठी ताकद आहे. त्रिविक्रमाची स्पंदनं पिण्याच्या प्रत्येक पाण्यात असतात. मदिरेमध्ये पण पाणी असतं पण त्यात त्रिविक्रमाची स्पंदनं नसतात. पाणी पिण्याची क्रिया आचमनाप्रमाणे केली तर त्रिविक्रमाच्या अल्गोरिदमची व्हायब्रेशन मिळतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आंघोळ करता तेव्हा सुद्धा भाव पाहिजे की - ‘हे तेच सनातन पाणी आहे.’ ‘ॐ ग्लौं अनिरुद्धाय नम:’    
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

1 comment:

Anupriya said...

Ambadnya Reshmaveera