His Social Responsbility and Services

माझ्या बापूंकडे फक्त प्रेम आहे आणि त्यांची अगदी प्रत्येकावर प्रेम व्यक्त करण्याची पद्धत म्हणजे त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादाने होत असलेल्या विविध भक्तीमय सेवा. अर्थात Devotional Services.
बापूंकडे आल्यानंतर केवळ टाळकुटेपणा कधीच नसतो. मुखी असते ते भगवंताचे नाम आणि हाती असते ते भगवंताचे काम, हे मला दिसून आले. भक्तीचा कास धरून इथे प्रत्येक सेवा होत असतात. प्रत्येक सेवांचा पाया हा भक्ती आहे. म्हणूनच या सेवांना समाजसेवा न म्हणता भक्तीमय सेवा अस म्हटले गेले असावे, असे मला वाटते. खर तर आपल्या जीवनाचाच पाया मुळी भक्तीचाच असावा. त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होतात. 

बापूंच्या मार्गदर्शनाखाली भरपूर सेवा होत असतात. मी देखील स्वतः विविध सेवांमध्ये सहभागी झाली आहे. 
बापूंनी ३ ऑक्टॊबर २००३ मध्ये तेरा कलमीवर प्रवचन केले आणि सर्वांसमोर १३ कलमी योजना मांडली. या प्रमुख १३ कलमांतून अनेक छोट्या मोठ्या सेवा निर्माण झाला. बापूंच्या ह्या भक्तीमय सेवेच्या वटवृक्षाच्या या १३ पारंब्या आणि त्या पारंब्याचे आता स्वतंत्र असे वटवृक्ष झालेले आहेत. इतकच मी काय ते सांगू शकते.

१३ कलमी योजना पुढील प्रमाणे - 
2. Round The Year Water Farming & Plan - बारामास शेती चारा योजना
3 Used Paper Project - रद्दी योजना
4 Old Is Gold Project - जुने ते सोने
5 The Warmth of Love Project – मायेची ऊब
6 The Light of Knowledge Project - विद्या प्रकाश योजना
7 Cleanliness Campaign - स्वच्छता मोहिम
9 Shreemadpurushaartha - श्रीमद पुरुषार्थ
10 General Knowledge Bank - जनरल नॉलेज बँक
11. The Confluence of Indian Languages - भारतीय भाषा संगम
12 The Institute of Studies of Five Continents - पाच खंडांचा अभ्यास

त्यानंतर बापूंनी ६ मे २०१० ला रामराज्यावर प्रवचन केले आणि ह्या रामराज्याच्या प्रवासात जे जे उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे त्यांची माहीती दिली. या रामराज्याच्या प्रवचनात बापूंनी नव्याने सुरु केलेल्या उपक्रमांची माहीती दिली. त्यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ग्रामविकास. बापू म्हणतात, ’रामराज्याचा प्रवास ग्रामराज्याच्या स्टेशनापासून सुरू होतो व ग्रामराज्य म्हणजेच ’ग्रामीण विकास’. त्यामुळे अनिरुद्धाज इन्स्टीट्यूट ऑफ ग्रामविकासचे ’AIGV’ कार्य अत्यंत महत्त्वाचे व मोलाचे ठरते. आज या इन्स्टीट्यूटच्या कार्याची व्याती अफाट झालेली आहे. ’AIGV’ म्हणजे ग्रामविकासाचा एक संपूर्ण, स्वयंसिद्ध व समग्र दृष्टीकोन आहे. गावातील अडाणी, गरजू, गरीब, कष्टकरी जनतेला सक्षम, सुदृढ व सुखवस्तू बनवण्यासाठीच अनिरुद्ध बापूंनी 'AIGV'ची स्थापना केली. या सर्वांना आपला विकास करून घेण्याची एक दिशा दाखवली आहे. 
याचबरोबर विविध उपक्रम रामज्यात आहेत. त्याबद्द्ल वाचण्यासाठी पुढील लिंक पहा...

आपण नेहमी म्हणतो रोजच्या घाईत कुठे मी सेवेला जाऊ? काय परोपकार करु? अशी कारणे देत असतो. जी १०० टक्के बरोबरही असतात. पण बापूंच्या ह्या योजना अश्या आहेत की अगदी रोजच्या घाईच्या दैनंदिनीतही मी सेवा करून पुण्य प्राप्त करून घेऊ शकतो. अगदी घरातून बाहेर पडायची देखील गरज नाही. हो पण एका गोष्टीची गरज मात्र लागते ते म्हणजे बापूंवरील प्रेम, नितांत विश्वास व प्रबळ इच्छाशक्ती.....

अधिक माहिती घेण्यासाठी - http://www.aniruddhafoundation.com/ पहा 

मी सहभागी झालेल्या विविध सेवांची माझ्या ब्लॉगमधून मिळेलच.

No comments: