Saturday, September 18, 2010

दे...धम्माल...मिरवणूक गणूबाप्पाची

अनिरुद्ध गुरुक्षेत्रम गणपती मिरवणूकीचा हॅंग ओव्हर अजून उतरलेला नाही..त्यामुळे जरा वृत्तांत लिहण्यास उशीर झाला. असो..पण जास्त उशिर करुन चालायच नाही...बरोबर ना!!!
अडीच दिवसासाठी येतो आणि नुसत खुळ करुन टाकतो...हा गणपती बाप्पा पण आणि हा अनिरुद्ध बाप्पापण...नादखुळा...खर तर शेवटच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना मन खूप भरुन येत...पण त्याला पूर्ण भक्तीभावाने आणि वाजत गाजत निरोप देण्यास हवाच ना!!! त्यात बापूंच्या घरचा गणपती जो कधी परका वाटतच नाही...मग त्याच्या निरोप समारंभात छे छे निरोप उत्सवात..झोकून देणे इतकच आपल्याला करता येऊ शकते..बापूंच्या गणपती विसर्जन मिरवणूकीची मजाच आणि थाटच निराळा असतो. आणि खरच या भक्ती प्रेमाच्या सोहळ्यात पूर्णतः धुंद होऊन जातो...या सोहळ्याची झिंग अशी आहे की बापू आई आणि दादांसह गणपती बाप्पा देखील डोळ्यासमोरुन जात नाही. आहा आहा!!! अगदी लोभस आणि गोंडस रुप आहे...शब्दच नाहीत माझ्याकडे...
यावर्षी मला फोटो काढण्यासाठी "प्रत्यक्ष" मधून पाठविले होते...मी जरा टेंशनमध्येच होते..उगाचच...आदल्या रात्रीपासून प्लॅनिंग सुरु होते. कसे फोटो काढायचे..कुठून काढायचे...कुठे चढायचे...सगळ काही प्लॅन्ड...पण आयत्यावेळी पोपट व्हायचा तो झालाच...असो...तर प्लॅनिंगप्रमाणे मी फोटो काढायला सुरुवात केली. फोटोच नाही तर व्हीडीओ शूट देखील केले. पण मज्जा आली..सर्वप्रथम आई बापू दादा दोन लिफ्टने खाली आले...ते आले नाही तर आम्ही खटाखट क्लिक करायला सुरुवात केली. आई सोबत शाकंबरीवीरा दत्तोपाध्ये (मुलगी) आणि निष्ठावीरा जोशी (सून) दोघीही होत्या. शांकबरीवीराच्या हातात औक्षणाचे ताट होते..थोड्यावेळाने एका लिफ्ट्मधून दत्तबाप्पा आणि एका लिफ्टमधून गणपती बाप्पाची मूर्ती आणली गेली. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये (जावई) आणि डॉ. पौरससिंह जोशी (मुलगा) यांनी आसनावर दत्तबाप्पा आणि गणपती बाप्पाला ठेवले..नंतर सर्वप्रथम नंदाईने गणपती बाप्पाचे औक्षण केले...अगदी प्रेमाने....मग शांकबरीवीरा आणि निष्ठावीरा यांनी औक्षण केले..त्यानंतर सुचितदादांच्या आईंनी औक्षण केले..मग सुखकर्ता दुःखहर्ता आरती घेण्यात आली. आरती झाल्यानंतर गणपती आणि दत्तबाप्पाच्या मूर्तीला सजवलेल्या गाडीवर ठेवण्यात आले आणि गाडी हळूहळू ढकलत हॅपी होम गेटच्या बाहेर आणण्यात आली. काय मस्त वाटत होते...दोन्ही बाजूला तुतार्या वाजत आहेत आणि त्यामधून गणपती बाप्पा हळू हळु पुढे सरकत आहे..गणपतीच्या मार्गावर आई  पवित्र जल शिंपडत आहे. अस करत मोठ्या सजवलेल्या ट्रकजवळ गाडी येते...पौरससिंह आणि स्वप्निलसिंह आधी दत्तबाप्पाला त्याच्या जागी विराजमान करतात आणि मग गणपती बाप्पाला..मग बापू आई दादा सजवलेल्या ट्रकवर चढतात आणि अत्यंत प्रेमाने दत्तबाप्पा आणि गणूबाप्पाचे दर्शन घेतात..मग त्या ट्रकच्या मागे असलेल्या भक्त समुदायाला हात वर करुन दर्शन देतात.. मग बापू आईचा हात धरुन सावकाश खाली उतरतात...पुढे बापू कागद्याच्या लगद्याने बनविलेल्या शंकराच्या मोठ्या पिंडीच्या ट्रकवर चढतात..पिंडीला फुले, बेल आणि हार अर्पण करुन भक्तांच्या गर्दीमधून कोपर्यावरील स्टेजवर जातात..स्टेजवर जाताच...मोठ्या आवाजात गजर स्पिकरवर सुरु होतात..गणपती बाप्पा मोरया.....
मग एके एक ग्रुप पुढे बापू आई दादांचे दर्शन घेत पुढे सरकतो...प्रत्येकाला मनसोक्त दर्शन मिळते..ते देतात...मला एक गम्मत वाटली.. एवढी गर्दी होती...या गर्दीतही नंदाईला कुणी तरी अगदी ओळखीचे दिसले...तेव्हा बापूंचे लक्ष दुसरीकडे होते....तेव्हा आईने बापूंना त्या व्यक्तीकडे पहायला सांगितले..."अनिरुद्ध तिकडे बघ" अस काहीस ती पुटपुटलेले मी ऐकले...तेव्हा मी खालीच स्टेज जवळच होते ना!! आणि मग बापूंनी आईने सांगितलेल्या दिशेने बघून मस्त हात वर करुन अच्छा केला.. मला कमाल वाटली. आईचे किती बारीक लक्ष असते प्रत्येकाकडे...यावरुन ते मला समजले...
सगळे भक्त स्टेजच्या समोर आले की हलतच नव्हते..तेव्हा बापू आई दादा त्यांना हळूहळू पुढे सरका असे सारखे सांगत होते...भक्त थोडीच ऐकत आहे......आपल्या प्राणप्रिय सदगुरुला पाहण्यातच ते सगळे विसरुन गेलेले दिसले...खर तर हे भक्त पुढे सरकतच नव्हते स्वतःहून...मागचे भक्त पुढच्याला धक्का मारत पुढे येत होते...त्यामुळे हे पुढे जात होते...आणि तो मागचा भक्त स्टेजसमोर आला की तो तीथेच खिळायचा...मग त्याच्या मागचा भक्त स्टेजसमोरुन येण्यासाठी त्याला धक्का मारायचा...हे असच चालत होत...मला जाम गम्मत वाटली. एरव्ही जरासा धक्का लागल्यावर रागाने पेटणारी माणसे सदगुरु समोरुन कुणी धक्का मारल्याशिवाय हलणारच नाही अशाच ऍटीट्युड्मध्ये दिसली...जाम गम्मत वाटली...देवाला किती पाहू आणि किती सामावून घेऊ हाच भाव त्यांचा दिसत होता...आणि कितीही पाहीले सदगुरुला तरी ते कमीच वाटते...

मी फुल्टू फोटो काढण्यात बिझी होते...इथे तिथे लक्ष नव्हते....काही ग्रुप्स पुढे गेल्यानंतर बापू आणि त्यांचे सुरक्षारक्षक जाऊ लागले...स्टेजवर आई आणि दादा दर्शन देत होते...सगळे ग्रुप्स मिरवणूकीत गेल्यावर आई दादा पुन्हा हॅपी होमला गेले..

मिरवणूकीत सर्वप्रथम समीरदादा चालत होते...त्यांच्या पुढे तुतारीवाले आणि मागे लेझीम पथक होते...त्यांच्याबरोबरच स्वप्निलसिंह आणि पौरससिंह होते...ते सगळी मिरवणूकीची व्यवस्था पाहण्यात रमले होते...अधून मधून नाचत ही असावेत...मग झेंडे, गरुडटका घेऊन डीएमव्ही होते..नंतर एक एक ग्रुप्स पुरुष व महिलांचे होते....दिंडीचे ग्रुप होते...सगळे जण सॉलिड म्हणजे सॉलिडच नाचत होते...या सगळ्यांचे फोटो काढले...पाणी वाटप अखंड सुरु होते...प्रसाद वाटप चालत होते...वेगवेगळ्या स्पॉटवर गणूबाप्पाचे औक्षण करण्यात येत होते...सर्व भक्तांना औक्षण करण्याची संधी मिळत होती...

सगळे बेदम नाचले....मूली आणि महिलापण कुठेही कमी नाही...

बापू देखील भक्तांबरोबर नाचले....आणि काय नाचले सांगू!!!! त्यांच्या सारखे नाचणारे कुणीही नाही...मध्येच नाचायचे...चालायचे दोन्ही बाजूंनी जमलेल्या भक्तांना मनसोक्त हात वर करुन दर्शन द्यायचे...खरच ही मिरवणूक म्हणजे भक्तांची ऐश असते...

साधारण दहा वाजता मिरवणूक आटोपती घेतात...सगळे स्पीकर्स बंद करुन भक्तांना माघरी हॅपी होमला प्रसाद घेण्यासाठी पाठवतात...आणि काही ठराविक मंडळी बीचवर जातात...

हॅपी होमला सगळ्या भक्तांना प्रसादाच्या पॅकेटस देण्यात येते...यंदा आई आणि दादा स्वःत सगळ्यांना प्रसाद देत होते...आईच्या हातून प्रसाद घेऊन आम्ही आमच्या घरी परतलो....आता वाट पाहत आहोत ती पुढच्या वर्षीची अगदी त्याच दिवसापासून जेव्हा गणूबाप्पा त्याच्या घरी परतला...

अजूनही मिरवणूकीतील बापू आई दादा माझ्या डोळ्यासमोरुन जात नाही...आणि नकोच जायला....त्यांचे एक एक हाव भाव आठवत आहेत...अविस्मरणीय.....

सगळे  जण माझ्या मागे लागले आहेत...रेश्मा, आई बापू दादांचे फोटॊ देना!!! व्हीडीओ दाखव ना!!!..ब्लॉगवर टाक ना!!! पण खर सांगू. जरा वाट पहा....आपल्या नव्याने सुरु झालेल्या मनःसामर्थ्यदाता वेबसाईटवर लवकरच या अनोख्या गणेशोत्सवाचे फोटॊ आणि व्हीडीओ पाहण्यास मिळतील....थोडा धीर धरा....मला ही हे फोटो कधी साईटवर येत आहे अस झालेय....मला ही राहवत नाही म्हणून शेवटी शब्दातून चित्र उभं करण्याचा प्रयास केला आहे...देवाने जमवून घेतल आहेच...श्रीराम!!!! हरी ओम...बोला गणपती बाप्पा मोरया! अनिरुद्ध बाप्पा मोरया!!!!