Showing posts with label Saisatcharit and me. Show all posts
Showing posts with label Saisatcharit and me. Show all posts

Tuesday, October 29, 2013

About Hemadpant - 2

हेमाडपंतांबद्दल विचार करताना मला नेहमी एक गोष्ट बेस लेव्हलला दिसते ती म्हणजे ते गुरुचरित्राचे ४० वर्षे पारायण करत होते. म्हणजेच त्यांना गुरुची / सदगुरुंची अनामिक आणि त्यांनी कधीही दाखविली नसावी अशी ओढ असावी. सदगुरुतत्त्वावर त्यांचा विश्वास होता आणि त्या सदगुरुच्या त्यांच्या आयुष्यातील प्रवेशासाठी ते चातका प्रमाणे तळमळत असावे. कारण या तळमळीशिवाय पहिल्या भेटीतच कुणीही “धुळभेट” घेऊ शकत नाही असे मला वाटते. गुरु बाबत त्यांच्या मनात विकल्प आला. हे १०० टक्के. परंतु खर्‍या सदगुरुच्या दिशेनेच आपले पाऊल पडावे आणि कोणत्याही भोंदू बाबाच्या फंदात पडू नये यासाठी ते दक्ष असावेत अस मला वाटले. साईनाथांबद्दल जेव्हा कळले तेव्हा त्यांच्याकडे जाण्यासाठी त्यांनी वेळ घेतला असावा. जाऊ की नको या व्दंव्दमध्ये ते अकडले असावेत….आणि हे व्दंव्द साक्षात साईनाथांनी सोडविले असे मला वाटते. त्यांच्या मनात गुरुतत्त्वाबद्दल काही शंका असावी अस वाटत नाही. पंण आपण ज्या साईबाबांकडे जाणार आहोत ते नक्कीच आपल्याला हव असलेले अंतिम स्थान आहे का? या बाबत साशंक असावेत. असे आपले देखील होते. अगदी सामान्य भक्ताचेही होते. बापूंकडे येण्याआधी येऊ की नको, यास सदगुरु मानू की नको अशी व्दीधा अवस्था असते. पण बापूंना पाहिल्यावर ही व्दीधा अवस्था विरुन जाऊन आयुष्याची समिधा कधी होते हे त्या भक्ताला ही कळत नाही. यावरुन मला एक गोष्ट कळते की हेमाडपंत कीतीही श्रेष्ठ भक्त असले तरी त्यांच्या प्रवास एखाद्या सामान्य भक्ताप्रमाणे विकल्पाचा अडथळा पार करुनच झाला. हा विकल्प ते मनातून सक्षमपणे काढू शकले एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पहिल्या धुळभेटीपासून ते लेखणी ठेवेपर्यंत त्यांचा विश्वास हा पूर्ण होता. पूर्ण १०८ टक्के.

Read Saisatcharitra Articles - http://www.pratyaksha-mitra.com/category/shree-sai-saccharitra/
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer : साईसच्चरित हा माझा सर्वात आवडता ग्रंथ आहे आणि याची गोडी ही परमपूज्य बापूंनी लावली आहे. श्रीसाई समर्थ विज्ञान प्रबोधनीकडून घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परीक्षा घेतल्या जातात. ह्या परिक्षा देताना जे विचार मनात आले ते इथे मांडत आहे. प्रत्यक्षात तसेच असेल असा किंवा या प्रकारचा माझा कोणताही दावा नाही याची कृपया नोंद असावी. साईनाथ व बापूंचे गुणसंकीर्तन व्हावे  आणि त्यातून निर्मळ आनंद मिळावा ही प्रेमळ इच्छा आहे. अंबज्ञ - रेश्मावीरा नारखेडे

About Hemadpanta

इतर फुटकळ विषयांवर चर्चा करीत बसण्यापेक्षा हेमाडपंतांची भक्ती, सेवा, शारण्य कसे आहे याचा अभ्यास करणे जास्त श्रेयस्कर वाटते. बापूंनी आपल्याला जागृकतेचे महत्त्व सांगितलेले आहे. हेमाडपंत हे जागृक होते. त्यांची भक्ती डोळस होती. म्हणून गहू दळण्याच्या प्रसंगाचे अनोखेपण त्यांना कळू शकले. तसेच हेमाडपंताचे निरिक्षण आणि ऍनालॅसिस उत्कृष्ट होते. हे आपल्याला प्रत्येक कथेतून कळत जातेच. हेमाडपंत हे श्रेष्ठ भक्त आहेतच…त्यांनी भक्ती कशी करावी हे देखील शिकविले आहे. परंतु एक श्रेष्ठ भक्त बनण्यासाठीचे मुलभूत गुणधर्म त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रतित होतात. 

१. जागृकता : भक्ती करताना जागृक असलेच पाहीजे. 

२. डोळसपणा : भक्ती डोळस असावी. 

३. निरक्षण : सदगुरुचे निरिक्षण करता आले पाहीजे 

४. आकलन : या निरिक्षणातून सदगुरुच्या अकारण कारुण्याचे, सदगुरु लिलेचे आकलन करुन घेतले पाहिजे. 

५. अनु्भव : उचित निरिक्षण आणि आकलन केले की आपोआपच आपण सदगुरुंच्या अनुभवासाठी पात्र ठरतो. 

६. विश्वास : ह्या सार्‍या गुणांचा वापर करण्यासाठी मुळ सदगुरु तत्त्वावर विश्वास असणे आवश्यक आहे. आणि हेमाडपंतांचा सदगुरुतत्त्वावर विश्वास होता. ठाम विश्वास होता. कारण ते चाळीस वर्षे गुरुचरित्राचे पारायण नित्यनियमाने करित असत आणि हे सदगुरुतत्व मूर्तिमंत साई स्वरुपात त्यांच्या समोर उभे ठाकले ते्व्हा त्यांनी धूळभेट घेतली. गुरुची उपयुक्तता काय? हा वाद जरी हेमाडपंत घालत असले तरी त्यामागचा हेतू, त्यामागचा विचार हा अत्यंत वेगळा असला पाहिजे. कारण ते अत्यंत विचारी होते. 

गुरुचरित्र वाचणार्‍या हेमाडपंत सारख्या व्यक्तीला गुरुचे महत्त्व माहित नसावे हे विसंगत आहे. त्यामुळे गुरुची उपयुक्तता काय? ह्या वादामध्ये हेमाडपंत कुठेही मला अहंकारी वाटत नाही. उलट त्यांच्या मन बुद्धीतील विचारांचा प्रचंड मोठा गुंता आणि तो गुंता सोडवण्यासाठी चाललेली हेमाडपंतांची धडपड इतकेच मला दिसू येते. 

आणि हा गुंतला सुटला अगदी क्षणार्धात…..जेव्हा बाबा म्हणाले, “काय म्हणाले हे हेमाडपंत”? हा गुंता सुटला म्हणून आपल्याला साई सच्चरित्र लाभले, असे मला वाटते

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer : साईसच्चरित हा माझा सर्वात आवडता ग्रंथ आहे आणि याची गोडी ही परमपूज्य बापूंनी लावली आहे. श्रीसाई समर्थ विज्ञान प्रबोधनीकडून घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परीक्षा घेतल्या जातात. ह्या परिक्षा देताना जे विचार मनात आले ते इथे मांडत आहे. प्रत्यक्षात तसेच असेल असा किंवा या प्रकारचा माझा कोणताही दावा नाही याची कृपया नोंद असावी. साईनाथ व बापूंचे गुणसंकीर्तन व्हावे  आणि त्यातून निर्मळ आनंद मिळावा ही प्रेमळ इच्छा आहे. अंबज्ञ - रेश्मावीरा नारखेडे