Thursday, September 3, 2015

तुझे होऊन जाताना......


तुझे होऊन जाताना
माझे पण भान ना उरले

तुझे होऊन जाताना
दुःखासही स्थान ना उरले

तुझे होऊन जाताना
सुखाचे घन रिते ना उरले

तुझे होऊन जाताना
जीवनाचे रंग फिके ना उरले

तुझे होऊन जाताना
मनाची धारा ना उरली

तुझे होऊन जाताना
माझी मी राधा ना उरली

तुझे होऊन जाताना 
माझे श्वास ही ना उरले

असे, 

तुझे होऊन जाताना
माझे काही काहीच ना उरले

- रेश्मा नारखेडे

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

7 comments:

Unknown said...

Superb. Maze kaay aahe deva sarv tuzechi re deva.

VINI GORE said...

Superb Reshma Masta Kavita

pranil takale said...

तुझे होऊन जाताना,
माझी मी राधा न उरले....

खूपच मनाला भावणारी कविता, त्यातल्या त्यात ह्या वरील दोन ओळी पुनःपुन्हा वाचाव्याशा वाटतात...

Anonymous said...

Shree Ram - Ambadnya

Unknown said...

superb रेश्मावीरा

तुझे होउन जाणे काळजाला भिडले ,
तुझे होउनी राहताना "माझे" न काही उरले !

चालिते तुझ्यासवे ,वेगळी वाट न आता उरली,
तुझ्या पाउलांच्या ठशात,माझी पाऊलवाट विरघळली

Unknown said...

superb रेश्मावीरा

तुझे होउन जाणे काळजाला भिडले ,
तुझे होउनी राहताना "माझे" न काही उरले !

चालिते तुझ्यासवे ,वेगळी वाट न आता उरली,
तुझ्या पाउलांच्या ठशात,माझी पाऊलवाट विरघळली

Mkmahesh2025 said...

Simple rhyming, deep meaning. Excellent poem.