Monday, July 19, 2010

ONE NIGHT @ गुरुक्षेत्रम

हरी ओम
"ONE NIGHT @ गुरुक्षेत्रम" टायटल वाचून तुम्हाला ONE NIGHT @ CALL CENTER या चेतन भगतच्या पुस्तकाची आठवण झाली असेल. हो पण त्या पुस्तकातील आणि माझी रात्र जरा वेगळी आहे बर का! पण त्या पुस्तकातील पात्रांची ती रात्र आणि माझी रात्र एकाशीच संबंधीत होती..GOD...देवाशी..

त्या पुस्तकातील पात्रांना आयुष्याच्या शेवट ठरु शकणार्या क्षणी देवाचा फोन येतो..
मात्र मी माझ्या नवीन आयुष्याच्या सुरुवात करताना देवाशी संवाद साधायला गेले होते. गुरुक्षेत्रमला!!!
आता नवीन आयुष्य कसे काय? तर त्या दिवशीच आत्मबलचा पहिला क्लास होता आणि नंदाईने सांगितले होते की तुमच्या कष्टमय दुःखी आयुष्याचा हा शेवट आणि उद्यापासून तुम्ही एक नव अनोख आयुष्याची सुरुवात करणार आहात. तर माझ्या एका आयुष्याचा शेवट आणि नविन आयुष्याची सुरुवात साक्षात महिषासुरमर्दीनी, दत्तबाप्पा आणि अनसूया माता यांच्या समोरच झाली. तेही राम रसायनात पूर्णपणे विरघळलेले असताना....किती छान ना! काय सॉलिड योग जुळवून आणला बाप्पा तू!!!

तर गुरुक्षेत्रमला शनिवारी १७ जुलैला मी आणि माझे सहकारी पठणाला गेलो होतो. गुरुक्षेत्रममध्ये हजेरी लावून पठणाला बसलो. आधी आह्निक केले. मग रामरसायन वाचण्यास सुरुवात केली. साधारण १०.३० ते १ या वेळेत रामरसायनाचे पठण झाले. एका अर्थाने राम रसायन म्हणजे रामाचे चरित्रच पण ते बापूंनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने रचलेले आहे..ते वाचताना काय होत ते मी शब्दात मांडूच शकत नाही. पण खूप भारी वाटत!!!

त्यानंतर मी मातृवात्सल्यविंदानमचा एक अध्याय वाचण्याचे ठरविले. मला १०८ वेळा हनुमान चालिसा म्हणायचे होते म्हणून मातृवात्सल्यविंदानमचा एकच अध्याय वाचण्याचे ठरविले. रॅण्डमली एक अध्याय निवडला आणि नेमका तो "मणिभद्रकंकणा" संदर्भाचा होता. मी म्हटले वा!!!!! आजच्या दिवसाला हाच अध्याय वाचणे उचित आहे...कारण त्यात  प्रभु परशुरामाचे आई प्रेम उफाळून आले होते...आणि त्याच्या प्रेमामुळे रेणूका माता प्रगट झाली. हा अध्याय वाचून माझेही आई प्रेम उंचबळून आले आणि त्या दिवशी तर संपूर्ण आईमय झाले होते...या शिवाय काहीच सुंदर नाही...तेव्हा काय वाटले ते सांगूच शकणार नाही...फक्त आई चण्डीकेला आणि अनसूया मातेल अत्यंत प्रेम पूर्वक पाहिले..तेव्हा वाटल उठून जाऊन आईला  घट्ट मिठी मारावी आणि मनोमन तसे केलेही....:)

त्यानंतर काही स्तोत्रपठण करुन हनुमान चालिसा म्हणावयास सुरुवात केली..साधारण पाच तासात १०८ वेळा व्यवस्थित म्हणून झाली. भिती वाटत होती की झोप येइल. पण बापूकृपे ती झोप काही नावाला पण नाही आली. हनुमान चलिसा पठण ऍक्च्युली कधी पूर्ण होत आले कळलेच नाही. बापूंनी हे पठण करायला सांगितल्यानंतर मला ते पूर्ण करणे पहिल्यांदाच जमले बर का!!! १०८ वेळा कस होणार??? या भितीने पहिल्यावर्षी धाडसच नाही झाले म्हणायचे. त्यानंतर १०८ वेळा झाले नाही. अर्धवटच होत होते...
पण या वर्षी बातच निराळी होती...कारण आईचे शब्द कानात घुमत होते.."तुमच कस पाहीजे माहीत आहे..."एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै अपने आप की भी नही सुनता."  मग आपोआपच जमल...सगळं..कूल ना!
देवाशी त्या एका रात्रीत मी मनोमन संवाद साधला..माझा तरी ठाम विश्वास आहे गुरुक्षेत्रममध्ये आई - दत्तबाप्पा थेट ऐकतो आणि खरं सांगू त्याने ऐकलय त्याची प्रचिती ही लगेच मिळते... तिथे त्यांच्याशी हितगुज केल्यानंतर जे समाधान आणि रिलॅक्सेशन मिळते ना हीच खरी प्रचिती नाही का? माझ्यासाठी तरी आहे बुवा!!!


गुरुक्षेत्रम बद्द्ल वाचण्यासाठी येथे क्लिक करा

3 comments:

nileshlok2025 said...

Reshma tuzya kaalachya "AAI" chya article vaachun mala maagcha Nandaibaddalcha ek anubhav aathavla.

Mi aai cha aavaaj kadhi aikla navta, mala aaicha aavaaj aikaychi far iccha hoti ani atahi aahech, pan sandhi milat navti.
2-3 varshapurvi bapuchya krupene medical campla selection zale, ani
tevha surprisingly Nandai pan aaleli. Ha amha sarvansathi anandacha sukhad dhakkach hota.
Aai la pahnyasathi barech bhakt utavil hot hote. Mi student distribution pendal madhe hoto sevela. Seva kartaana kalle ki aai saglikade bhet detiye. Aai kadhi ikkde yeil tyachi vaat baghat hoto.
Seva kartaana jam maja yet hoti.
Ani tevdhyat message ala "AAI Student pedal madhe Yete" He aikle aani dhak dhak vadhyla laagli.
kadhi yenaar mala mhanje amhala bhetnaar ase zale hote. aani aali ti vel aali.
Dhimi dhimi paule taakat, chhan sudar mand smit haasya karat aai aali ani tya balanchya gholkyat shirli. Mi pahatach rahilo.
Nandaicha to gaur varna ani tichi ti chandrakorichi tikli.
Wow ! superb yaar. Kaay sangu ani kas kalat nahi e. Pan te rup atahi aathavtaya. Tevdhyat ajun ek sukhad dhakka...

" Hari Om bola, Baalaano"---
Baas he shabd aikle aani thaar veda zalo. Aayushyat pahilyanda nandaicha aavaaj aikla ani kharach kaay mahit kaay zale ani vedaach zalo mi bas.
Tya aavaajat kaay hote mahit nahi. sarva baalanbaddal prem, vatsalya, karuna agdi je je kahi hya jagaat aaichya premabaddal shabd astil naa tevdhe saglechya sagle tyat hote.
Mazyabarobar arthatach tithli ti sagli jamleli mule aani volunteers agdi saglech bharavle hote.Tya mulaani dekhil thodese lajatach pan niraagaspane aaila ekdum "Hari Om" kele, aai pan khup anadli ani mag swataachya hataane vaatap kele.
Ajunahi to prasanga aathavla ki far anand hoto Aaicha chehraa dolyapudhe yeto.ani man prassana hote.
Hari Om

nishigandha said...

रेश्मा छान लिहले आहेस तू.गुरुक्षेत्रमला गेल्यावर खरेच मन प्रसन्न होते .बापू बोलले आहे की सर्वोत्तम तिर्थक्षेत्र आहे .गुरुशेत्रमची बातच काही निराळी आहे. खरेच. कारण तिथे श्री दत्तगुरु {आपले आजोबा },महिषासुर मर्दिनी माता {आपली आजी} अनुसया माता खरेच तिघांना पाहिले न की खुप समाधान वाटते आणि आता विशेष म्हणजे त्रिविक्रम. मला विशेष म्हण्जे आरती आवडते आणि घंटा नाद तो एकला न बस मन अश्रुंनी बहरून जाते .
गुरुक्षेत्रममध्ये जायला मला नेहमीच आवडते तिथे गेल्यावर मनाला खुपच शांति मिळते .
गुरुक्षेत्रम म्हणजे श्री दत्तगुरु, आदिमाता महिषासुरमर्दिनी मातेचे वास्तव्य तिथे आपल्याला सदेव मिळते शांति म्हणूनच गुरुक्षेत्रम म्हणजे बापुंचे वास्तव्य तिथे आपल्याला सदैव मिळतो आंनद.........

Unknown said...

तो दत्ताबप्पा हनुमंताने दिला अहेना महणून........अनिरुद्धा शराणं ममं हॅरीओम