Thursday, August 19, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग 3 (PARADE)

हरि ओम

परेडचे दोन भाग सगळ्यांनी आनंदाने वाचले...उत्तम प्रतिसाद ही दिला. यासाठी शतशः श्री राम!!!. प्रत्येकाने मला म्हटलं तू ग्रेट आहेस...सही आहेस...खूप कौतुक केल. धन्यवाद श्रीराम...पण हे सर्व स्वतःचे कौतुक करुन घेण्यासाठी नाही लिहले. तस करायच असत तर याआधी ही हे केल असत. पण माझा तो उद्देश नाही. परेडची जी ओळख मला झाली आणि परेडमुळे माझी जी ओळख झाली ते तुम्हाला सांगायच होत...हे सगळ वाचून एक जरी परेडला याच निष्ठेने जॉईन किंवा रिजॉईन झाला तर हे सगळ लिहण्याचे सार्थक झाले अस मी समजेन. असो...
हा फोटो मी परेड सोडल्यानंतरचा आहे..यामध्ये पहिल्या प्लाटूनमध्ये काही माझ्या बॅचच्यामुली आहेत. दहिना दर्शक म्हणून शर्वरी आहे. संस्थेचा ध्वज धरुन रश्मी मर्चंट आहे.
तर मागच्या भागात १५ ऑगस्टच्या परेडचा अनुभव सांगितला. यानंतर परेडमध्ये आणि परेडमार्फत घेण्यात येणार्या सेवांमध्ये स्वतःला पूर्ण झोकून दिले.
मागच्या दोन भागांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने मी सांगितली की घरातून विरोध होता. पण त्यालाही मीच जबाबदार होते..करीयर वार्यावर सोडून "परेड....परेड" केल तर घरचे विरोध करणार नाही तर काय करणार याची जाणिव परेडमध्येच झाली. कशी? तर एकदा असचं आम्हाला एका सरांनी लेक्चर दिले होते. त्यामध्ये त्यांनी हलकासा उल्लेख केला होता की "अपने करीयर पे भी ध्यान देना चाहिए. सब छोड छाड के परेड के लिए भागोगे तो बापू को अच्छा नही लगेगा" हे वाक्य खूप मनाला लागले...कारण मी नेमके तेच करीत होते.
मी जेव्हा परेडला आले ते बारावी सायन्स "नापास" असा शिक्का घेऊनच. खूप प्रयत्न केला पण माझी गाडी पुढे सरकेनाच..फिजिक्स म्हणजे मला यमदूत वाटायचा...त्यामुळे पुढे शिकायचेच नाही अस ठरवल होत. जेव्हा मला आपल्या चुकीची जाणिव झाली तेव्हा मी जोमाने अभ्यासाला लागले आणि त्यावर्षी बारावी पास झाले. तरी पुढे नवा प्रश्न...आता पुढे काय? खर तर पुढे शिकायची तयारीच नव्हती...पण करीयर केले पाहिजे...नाहीतर बापूंना आवडणार नाही....आणि परेड ला ही विरोध होईल. म्हणून दहावीच्या मार्क्सवर रेल्वेमध्ये बेसिक ट्रेनिंग कोर्सला (बीटीसी) प्रवेश घेतला. दहावीला चांगले टक्के असल्याने मला तिथे सहज प्रवेश मिळाला. तिथे मी इलेक्ट्रीशीयनचा कोर्स करुन पुढे रेल्वेतच जॉब करायच ठरवल. साईड बाय साईड परेड सुरु होती. रेल्वे मधून स्टायपेंड मिळत होता. त्याचा पूरेपूर वापर परेडच्या गरजा भागविण्यासाठी केला.
आता तुम्हाला हे सगळ सांगायची गरज का? असा प्रश्न पडला असेल ना? तर मग ऐका,
बीटीसीमध्ये आम्हाला सगळ काही शिकवल जात होत. तिथे परेड ही शिकविली जात होती. आम्ही सहा मुली होतो..बाकी सगळी मुले होती. महाराष्ट्राच्या कान्याकोपर्यातून या कोर्ससाठी मुले आली होती. आम्हाला २६ जानेवारीसाठी परेडला घेतल होत. सगळ्यांनाच. पण कुणालाही करायची इच्छा नव्हती..मला काय!! मी तर जाम खुशीत होते...कारण आठवड्यातून तीनदा माझी प्रॅक्टीस होणार होती. तिथेही माझी परेड जोरदार सुरु होती. तिथल्या सरांना माझी परेड आणि ऍटीट्युड आवडले. त्यांनी मला त्या बीटीसी प्लाटूनचा कमांडर नेमला. मी नको नको म्हणत असताना देखील. मी नको म्हणायच कारण म्हणजे मला देवाच्या दारात परेड करायची होती. रेल्वेत जरी मी कमांडर असले तरी मला देवाच्या दारातच परेड करायची होती. मग मी कोणत्याही कोपर्यात का असेना!!
सर माझ्याच मागे लागले की तूच व्हायचच कमांडर...मग तेव्हा मी त्यांना सरळ उत्तर दिल...जमणार नाही...कारण ही सांगितल.."ज्या अनिरुद्ध पथकात जाऊन मी परेड शिकले, आणि तुम्ही ज्या माझ्या परेडच कौतुक करत आहात...ती परेड मला या २६ जानेवारीला अनिरुद्ध पथकातूनच करायची आहे..मला माफ करा आणि तूम्ही दुसर्या कोणाची तरी नेमणूक करा. मी नाही येणार." माझ्या या उत्तराने बहुतेक सरांचा इगो हर्ट झाला किंवा आणखीन काही तरी प्रोब्लेम झाला असावा...कारण त्यानंतर मला बीटीसीमध्ये प्रचंड त्रास झाला. त्यावर्षी मी कमांडर झाले असते तर बीटीसीची मी बहुतेक पहिली महिला कमांडर ठरली असते..असो...त्यानंतर मात्र मला प्रचंड त्रास झाला.
पहिले म्हणजे मला त्यांनी इलेक्ट्रीशीयनच्या कोर्सला न घालता एसी वाईंडींगला घातले..दुसरे म्हणजे साफ सफाई तर इतकी करुन घेतली की जर साफ सफाईची ती स्पर्धा असती तर गोल्ड मेडल मिळाले असते मला. माझा कुठलाही जॉब त्यांना पटतच नव्हता. ना फायलिंग, ना वेल्डींग, ना कटींग...शेवटी तिकडचे मित्र मला हे सगळ करुन देत होते. एकदा तर सरांनी मला ते रेल्वेचे अवजड भले मोठे बाबाआझमच्या काळातले पंखे पुसायला सांगितले...एक दोन नव्हेत चांगले २५ होते...त्या दिवशी खरोखर मला रडायला आले आणि मी ठरवल गेली चुलीत रेल्वेची नोकरी..आणि मी बीटीसी सोडून पुढे पदवी शिक्षण घेण्याचे ठरविले. खर तर रेल्वेतील वातावरण माझ्या वृत्तीला पोषक नव्हते...रेल्वे सोडले आणि पुन्हा पुढे काय? हा प्रश्न आला...बापू घेतील पाहून पण मी स्वस्थ बसणार नाही अस ठरवलं...पुढे मी माझे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आणि आज मी माझ एम ए पूर्ण केले..त्याच दरम्यान फोटोग्राफी शिकले...फोटोग्राफी शिकण्याचे देखील परेड मार्फत आयोजित केलेल्या एका प्रदर्शनात क्लिक झाले..आणि प्रिया मिसने मला फोटोग्राफीसाठी मार्गदर्शन केले...ती जिथे शिकली तिथेच मी फोटोग्राफीसाठी ऍडमिशन घेतले...आणि नंतर म्हणजे धम्माल बापूंनी प्रत्यक्षमध्ये घेतले...हे सगळ परेडमुळे शक्य झाल. कारण प्रत्यक्षमध्ये लागले तेव्हा माझ्याकडे साधी पदवीपण नव्हती...फोटोग्राफीचे बेसिक माहिती होती..आणि बरे फोटो काढता येत होते..पुढे सगळ प्रत्यक्षमध्येच शिकले...धन्यवाद बापूंचे आणि सर्व सहकार्यांचे...परेडमध्ये नसते तर इथे पोहचूच शकले नसते...अस मला वाटते...असो...ही झाली पुढची गोष्ट...
त्याआधी म्हणजे रेल्वे सोडून प्रत्यक्षमध्ये लागण्याच्या दरम्यान परेड बोरीवली येथे शिफ्ट झाली होती. वसई - विक्रोळी हा प्रवास कमी झाला. खूप वाईट वाटल...तोडल्यासारख वाटल...पण विस्तार वाढतो तस विभाग करावेच लागतात ना!!! बोरीवलीला प्रिया मिस आणि तृप्ती मिस यांच्या हाताखाली पुढचे परेडचे प्रशिक्षण सुरु झाले...खर तर आम्ही सगळे एकाच बॅचचे...पण त्यांच्या कमांडखाली परेड करायला मज्जा आली. तृप्ती मिसचे शूट आऊट फार आवडायचे मला. कमरेच्यावर पाय जायचा तिचा...तिच्याकडून प्रेरणा घेऊन मी ही त्यासाठी सराव सुरु केला..घरी हाच सराव चालायचा...येथे एक गोष्ट शिकले की आपल्या बरोबरीची मंडळीपुढे गेली की त्यांना प्रोत्साहन द्यायचे आणि ते पुढे गेले म्हणून मनात असूया बाळगायची नाही...बापूंनी सांगितलेले प्रत्येकाची रांग वेगळी आहे...आणि प्रत्येकासाठी त्याने कार्य ठरविलेले आहे. ते बरोबर  आपल्याकडूनच करवून घेणार...याची प्रचिती आली ती म्हणजे पुढे जेव्हा नालासोपारा परेड केंद्राचे मला परेड कमांडर म्हणून नेमले तेव्हा...आणि ही गोष्ट मला पुढच्या आयुष्यात ही उपयोगी ठरली...नालासोपाराला जाणे म्हणजे अजून एक विभाग...वाईट वाटले...आपल्या लोकांना सोडणार....पण काय करणार...आदेश तो आदॆश....
हा आत्ताच्या १५ ऑगस्टचा  (२०१०) फोटो आहे..यामध्ये सर्व माजी परेड डीएमव्ही दिसत आहे..अपर्णा मिस, प्रिया मिस, रश्मी, रुपेश सर, तृप्ती मिस, प्रविण, कुणाल, निलेश हे दिसत आहेत. या सगळ्यांना एकाच फोटोमध्ये पकडण्याची संधी मला मिळाली आणि त्याचा मी पूरेपुर फायदा उठविला.
बोरीवलीला मध्येच दहिसरला परेड व्हायची....मज्जा यायची....येथूनच माझी परेड रेस्क्यु टीममध्ये निवड झाली आणि रेस्क्यु टीममध्ये  निवड झाल्यानंतर जी काय धम्माल केली ती म्हणजे या सर्व अनुभवांचा कळस आहे....
ते  सांगेन पुढील भागात....तुर्तास दहिने से आगे पढ!!!

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग १ (PARADE)

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग २ (PARADE)

 

15 comments:

Bharat Ranjankar said...

sundar!
Aplyala kay karne yogy aahe he Bapuna Barobar Kalte!
Tyanchyaparyant aapan sangaychi dekhil garaj nasate! Te Yogy veli aaplyala disha dakhavtatach!
Hari Om!!!

VINI GORE said...

Hari om reshma kharach khup chan anubhav mandlas tu. bappa aaplya lekrana yogya ti gosta yogya tya veli detoch... waiting for next part..

raam said...

HARI OM
Thanx RESHAVEERA
KHARACH KHUP CHAN LIHATES TU.
Roj aasech lihit ja.......

nishigandha said...

हरी ॐ रेश्मा अति सुंदर अति सुंदर .................................लय भारी

SHREE RAM said...

reshma mast anubhav aahe. khup chan

Yogeshsinh Parab said...

Superb....!!! U have encouraged me to join the parade.!!!

Thank u very much for sharing this anubhav, this is one of the best anubhavs I have read.

Hari om..

Bapu bless u...!!!

Yogeshsinh Parab.

neha said...

Reshma veera

Mast......waiting for next part now.......


Hari om

Nilangi Atul Sawant said...

Khup chhan Reshma...and Shree Ram on behalf of Truptiveera.

swapnilsinh said...

हरि ओम रेश्मावीरा
परेडचे तिनही भाग वाचले. अप्रतिम सुंदर. खरतर पहिला भाग वाचतानाच अस वाटले की हा भाग संपूच नये. कशाला पुढच्या भागांचा आटापिटा. पण जसे पुढचे भाग वाचले तेव्हा कळल की ती उत्सुकता, उत्कंठता का ताणली गेली. खरच रेश्मा ते रेश्मावीरा असा हा प्रवास आहे. प्रत्येकालाच बापूंजवळ जायचे असते. त्याचे प्रेम भरभरुन प्यायचे असते. त्या प्रत्येकाला ह्या किंवा अशाच प्रकारच्या कष्टातून जावेच लागते.

खरतर जिवनाच्या प्रत्येक ट्प्प्यावर तो असतोच माझी साथ द्यायला, मला मदत करायला, माझे ह्ट्ट पुरवायला. पण मी त्याला ओळखत नाही. त्याला आपलस करुन घेत नाही. आणि म्हणून तो खेळीया आपल्याशी असाच खेळ मांडतो. मी त्याच्याकडे गेल्यावर तो पुढे पुढे धावू लागतो. त्याचा उद्देश हाच असतो की ह्याने अजून अजून माझ्याजवळ यावे. आणि कायमचे माझ्याजवळच रहावे. ही एक प्रकारची परेडच नाही का ?

वानरसैनिक बनण्यासाठी मला ह्या नवनिर्धारांचे पालन करावेच लागते. मगच तो मला उचित फळ देतो. परेड मला हा निर्धार शिकवतो. तो निर्धार टिकवायचा कसा हे शिकवतो. ती चिकाटी, चपळता, शिस्त, अनुशासन शिकवते. "हे सगळ वाचून एक जरी परेडला याच निष्ठेने जॉईन किंवा रिजॉईन झाला तर हे सगळ लिहण्याचे सार्थक झाले अस मी समजेन" हे रेश्मावीराचे वाक्यच सगळ काही सांगून जाते.

तुझ्या लेखाबरोबरच मी बाकीच्याचे प्रतिसाद सुध्दा वाचले पण खर सांगू का लेख जेवढा अप्रतिम जिवंत वाटला, प्रतिसाद तेवढेच शुष्क वाटले. उत्साह आणि चैतन्याने भरलेली परेड, तेवढाच जिवंत त्यावरचा लेख, तोही एका DMV ने लिहलेला. पण प्रतिसाद देणारे परेड DMV, आणि बाकीचे मात्र अतिशय अनुत्साही वाटले. खरतर मला वाटले की कोणीतरी आपलाही अनुभव येथे देईल, त्यांच्या वेळेसची मजा शेअर करेल, उत्साहात स्वतःचा ब्लॉग सुरु करेल. पण ती जादू काही घडली नाही. दुसर्‍याला छान म्हणण्याबरोबरच माझे काहीतरी सुध्दा त्याच्या बरोबर शेअर करणे महत्वाचे असते. असो .................

बाकी रेस्क्युची धमाल वाचायला नक्की आवडेल. एकानंतर एक येणार्‍या भागांनी वाचणार्‍याच्या अक्षरशः काळजाला हात घातलाय. प्रत्येकालाच वाटतय की अरे आपलाही अनुभव असाच काहीसा आहे. अरे मग थांबलात का आणि कोणासाठी. स्व:तासाठी नाही तर बापूसाठी लिहा. हेही त्याचे गुणवर्णनच असेल.

मी यत्न करीता मज उध्दारासाठी |
उभे घेऊनि बापू दूधाची वाटी |
किती बापू भक्तार्थ करीती अटाटी |
भक्तवत्सला तुज मी शरण आलो |
अनिरुध्दा तुझा मी किती ऋणी झालो ||

Shantanu Natu said...

simply Superb article, keep it up! would like to read further parts!!!

mi pan borivalila pared team madhe hoto, pan borivali madhe pared (it was pared + rescue practice i think) jasta diwas zali nahi, bahutek 3-4 mahinech zali, nantar amhala saglyanna Vile parle la yayla sangitala, tevach mala engg madhe ek Jor ka Zatka basla hota, ani mi full jorane abhyas suru kela hota, sunday morning la nemke classes asayche, tevapsun mazi pared sutli pan engg la wachlo (Khup mothi story aahe, khup motha anubhav/zatka dila hota Bapunni..... hahaha, but tht story not now),

good to know tht u were also there in Borivali pared team......

Evadhach sangu icchito ki aata parat parade suru karayla nakkich awadel, plus mi aikala hota ki ata parade + sports activities pan astaat, tasa jar asel tar dar ravivari Vile parle lach kay pan Vikhroli la pan jaychi agadi eka payawar tayar asen! 108 takke.
:-)

Abhijeet Joshi said...

"Nice" & it is Ignitable...
yess it is...

Kapil Bodke said...

Hariom Reshma, really there are no words to express ... aprateem..

Kapil Bodke said...

Hariom Reshma, really there are no words to express ... aprateem.. really as swapnilsinh said.. while reading i was also feeling ... हा बापूंकडे नेनारा प्रवास कधीच संपू नये ..

Unknown said...

हरी ओम रेश्मावीरा,
खरच खूप छान आहे, तुमचे प्रत्येक शब्द ...अप्रतिम.
मी तुमचे सर्वे भाग वाचले प्रत्येक भाग वाचत असताना मला माझे परेडचे दिवस आठवले. कसा कसा करून मी सकाळी परेडला जायचो. black pant नव्हती माझ्याकडे ते मी माझ्या मित्राकडून घ्यायचो.परेडचे एक नियम होता कि शूजला पोलिश पाहिजेच. त्यावेळेस मी कामाला नव्हतो त्यामुळे खिशामध्ये पुरेशे पैसे नसायचे तर मी काजळ लावायचो नंतर मी परेडला जायचो.ह्याच्या मध्ये एक वेगळीच मजा होती.पण परेडचा अनुभव काही वेगळाच.

परेड म्हणजे तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा वळण. परेड मुळेच माणसाच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी लागते.
स्वतःच्या आयुष्याला एक शिस्त लागते. ह्या परेडला मी अनिरुद्ध आर्मी बोलतो, खरच हि एक परेड अनिरुद्ध आर्मी आहे,
बापूंच्या जवळ जाण्याचा हा एक चांगला मार्ग आहे तो परेड.

D' Awakened said...

परेड म्हणजे परेड म्हणजे परेड आहे. ग्राउंडवर जाऊन परेड केल्याशिवाय तिची मजा नाही कळत. त्यासाठी तिथे जाऊन घाम गाळणे आणि कॉमान्देरच्या शिव्या खालल्याशिवाय ती मजा अनुभवता नाही यायची. असे असंख्य DMVs आहेत ज्यांचे अनुभव असेच हृदयस्पर्शी आहेत. त्यांचे अनुभव सुद्धा येथे यायला हवेत.