Showing posts with label PARADE ANUBHAV. Show all posts
Showing posts with label PARADE ANUBHAV. Show all posts

Tuesday, November 23, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग शेवटचा (LAST PART)

हरि ॐ
अनिरुद्ध पथक सावधान....अनिरुद्ध पथक बाये से तेज चल........
चिफ परेड कंन्सलटण्ट बांगर सर यांनी ही कमांड दिली...आणि घोषपथकाने व सर्व परेड डीएमव्ही ठेका धरला...एक दो एक....तेज चल करीत स्टेजच्या उजवीकडून डावीकडे परेड सुरु झाली. स्टेजवर बापू उभे होते...तिरंगा आणि संस्थेचा ध्वज घेऊन पहिले परेड डीएमव्ही पुढे आल्याबरोबर बापूंनी सलामी दिली...नंतर मागाहून येणार्या प्रत्येक प्लाटूनने बापूंना सलामी दिली...

आम्ही सलामी देताना आणि बापू सलामी स्विकारतानाचे चित्र......हेच परेडचे शिखर...

ह्यावेळी काय वाटत हे तिथे परेड केल्याशिवाय खरच कळणार नाही...पण बापूंना त्यांच्या चिल्ल्यापिल्यांना सलामी देताना नक्कीच अभिमानाने उर भरुन येत असणार...बापूंना सलामी देताना पाहून परेड डीएमव्ही म्हणून माझ्यावर त्याने सोपविलेल्या जबाबदारीची जाणिव झाली...किती विश्वास ठेवतोय बापू माझ्यावर...किती कौतुक करतोय हा बापूराया माझ....अस वाटत..आणि सहज मनातून एकच शब्द उमटतो श्री राम!! आणि पुढचा प्रवास सुरु होतो....

सुमारे ८०० हून अधिक परेड डीएमव्ही एका तालात परेड करीत होते...ही परेड पाहताना...अनेकांचे डोळे भरुन आले....अंगावर शहारे आले...ही परेड कशी झाली हे खरच मी नाही सांगू शकत...कारण त्या परेडचा मी एक भाग होते...ज्यांनी ती पाहिली ते खूप चांगले सांगू शकतात...माझ्यासाठी ही परेड म्हणजे अविस्मरणीय सोहळा होता....या पलिकडे मी काही सांगू शकत नाही....

मला सांगायला खुप आनंद होतोय की अखेर परेड एक अविस्मरणीय अनुभव हा या अनिरुद्ध पौर्णिमेच्या परेड अनुभवापाशी "थांब"तोय...खर तर आता जो काय परेडचा अनुभव आहे तो शब्दांपलिकडचा आहे...आणि खर सांगू मला आता फार रिकामे रिकामे वाटतेय...आणि खूप बरे वाटत आहे...त्यामुळे आता या पूढे मी तुम्हाला पिडणार नाही....
BACK IN ACTION

परेड अविस्मरणीय अनुभवांची मालिका निरोप घेत आहे...काय करणार जे काही अनुभवले ते सर्व तुम्हाला सांगितले....आता माझा परेडचा नव्याने प्रवास सुरु झालाय...आता नवीन अनुभव येणार....त्यामुळे अनुभव म्हणून लिहण्यासारखे माझ्याकडे काही उरलेले नाही...

पण एक गोष्ट नक्कीच आहे.....मला समजलेली अनिरुद्ध परेड....आणि यापूढे मी तुमच्याशी हीच समज शेअर करणार आहे....पण त्याआधी....यंदा काही परेड डीएमव्हींनी माझे लक्ष वेधून घेतले..त्यांच्याबद्द्ल मीपुढील भागात माहीती देणार आहे....सो...जस्ट वेट..फॉर दी नेक्ट

Thursday, November 4, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग ६ (PARADE - 6)

नालासोपारा परेड केंद्रावर परेड कमांडर म्हणून पाऊल ठेवले आणि एकदम मोठ झाल्यासारख झाल. मोठ म्हणजे अंहकाराने येणारे मोठेपण नाही तर जबाबदारीने येणार मोठेपण...

चाळीस एक मुली आणि पंचवीस एक मुले इतक्या जणांचे पालकत्व बापूंनी दिले होते...परेड ग्राउंडचा हिटलर अशी माझी ख्याती तेव्हा होती. हे नुकताच मला कळले. बापाची कडक शिस्त आणि आईचा मायेचा ओलावा हीच वृत्ती मी ठेवली होती आणि त्यामुळे परेड ग्राऊंडवर येणार्या प्रत्येक मुलीशी अगदी जवळचे नाते निर्माण झाले. जेव्हा मी परेड सोडली होती...तेव्हा मीच नाही तर माझ्या मुलींच्या डोळ्यात देखील पाणी होत...आणि हेच माझ्याकडून झालेली सेवा ही उचित दिशेला असल्याची पोचपावती होती....

नालासोपाराला येणार्या परेडच्या मुलींशी माझे अगदी जवळचे नाते निर्माण झाले होते. आजही आहे.. प्रत्येकजणीच्या समस्या सोडविण्याची संधी मला मिळाली होती आणि बापूकृपेने मला त्यात यश ही आले...मी ग्राऊंडवर नसताना मला सर्वजण मिस करायचे हेच माझे मेडल होते..येथे मला खूप काही शिकायला मिळाले...
मला फार काही आठवत नाही पण चांगला परेड कमांडर होण्यासाठी मी स्वतःवर फार मेहनत घेतली होती..बाहेरील कुठलाही बदल करणे सोप असत...पण मानसिकता बदलणे अत्यंत कठीण असते...पण या पदावर सेवा करताना....मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक होते...सतत आपल्या परेडचे डीएमव्ही कसे अधिकाधिक सक्षम होतील याचा विचार डोक्यात असायचा...यासाठी काही वेगवेगळे प्रयोग केले होते.

ए ए डी एमवर छोटे छोटे प्रोजेक्ट केले...जसे की पूर, आग वैगरे...चर्चा केल्या....सूर्यनमस्कार...व्यायाम....आणि महत्त्वाचे म्हणजे रेस्क्यु सराव...तेही अनोख्या पद्धतीने....

प्रत्येक परेड डीएमव्हीचा प्रोग्रेस रिपोर्ट तयार केला होता....त्यात त्याचे प्रोग्रेस लिहला जात असे...तो किती सरावाला येतो...त्याची रेस्क्युची प्रगती किती आहे....तो किती सेवेला जातो...
हा रिपोर्ट केवळ माझ्या माहितीसाठी मी केला होता. जेणे करुन मला सर्व डीएमव्हीची माहिती कायम तोंडपाठ राहील. हा माझा छोटासा प्रयत्न होता आणखी काही नाही...

मला परेड सेंटरवर येणार्या प्रत्येकाची घरची दारची परिस्थीती तेव्हा माहीत होती...त्यामुळे त्या त्या डीएमव्हीला संभाळणे शक्य होत असे. प्रत्येकाच्या स्वभावाचे निरिक्षण आणि परिक्षण मी केले होते...त्यामुळे योग्य व्यक्तीवर योग्य ती जबाबदारी  देता आली...पुढे जाण्याची संधी प्रत्येकाला दिली...त्यामुळे आमच्यात कधीच भांडणे झाली नाहीत...किंवा राग रुसवे झाली नाहीत...माणसे जोडण्याचे काम बापूंनी इथे उत्तमरित्या करवून घेतल...

मला आठवत....दर रविवारी नालासोपारा परेड सेंटरच्या ग्राऊंडला किमान ३५ मुली हजर असायच्या....२० च्या खाली आकडा कधीच गेला नाही...हो परिक्षेदरम्यान कमी असायचे...पण परिक्षा संपली रे संपली की पुन्हा परेड ग्राऊंडवर हजर...या सर्व मुला-मुलींना कायम मी "मेरे बच्चे" म्हणूनच संबोधले...या बच्च्यांसाठी सिनियरशी अनेकदा भांडणे देखील केली...

मेरे बच्चे आगे आने चाहिये...या एका ध्येयाने प्रेरीत होऊन त्यांच्याकडून कडक सराव करुन घेतला...पण त्यांनी देखील उत्तम साथ दिली...हे अत्यंत महत्त्वाचे आहे...

सकाळी मुल नाश्ता न करता यायची...साधा परेडचा ड्रेस शिवायला ही पैसे नव्हते काहींकडे....रिक्शा परवडत नाही म्हणून परेड सेंटरला चालत यायचे....घरातून विरोध तरीही यायचे...तोंडावर परिक्षा तरीही यायचे...आजारी असो किंवा काहीही असो...कधी कुठलही कारण दिले नाही...मग अशा मुलांसाठी का नाही मला माझे १०८ टक्के परिश्रम द्यावेसे वाटणार....ही तर मला बापूंनी दिलेली सेवेची सुवर्णसंधी होती...आणि तीचे मी सोनेच केले अस मला वाटते.

प्रवासाला पैसे नाहीत म्हणून अनेकांना सेवेला जाता यायचे नाही...त्यामुळे आम्ही आयडिया केली होती...दहा दहा जणांचे ग्रुप केले होते...कुठलीही सेवा आली की एक ग्रुप जायचा...अलटरनेट...त्यामुळे कुठल्याही सेवेला नालासोपार्याच्या १० जण फिक्स...यात कोणाला वेळेचा प्रोब्लेम असेल तर अलटरनेट तयार असायचाच...जर कुणाकडे पैसे नसतील तर त्याचा खर्च आम्ही एकत्र मिळून करायचो...

जेव्हा परेडचा ड्रेस शिवायचा होता...तेव्हा एक ड्रेसची किंमत ३०० पर्यंत जात होती. माझी मुले केवळ १०० ते १५० रुपये देऊ शकत होती...त्यामुळे काय करायचे हा प्रश्न होता...कारण बुट आणि बॅरेचाही खर्च होताच...म्हणून आम्ही जे थोडेफार सधन मुले होतो...त्यांनी जास्त पैसे काढण्याचा विचार केला. त्याप्रमाणे मुलांचे शुज आणि बॅरेचे प्रश्न सोडवले...पण ड्रेसचे काय?

यासाठी आम्ही स्वस्त्यात कपडा पूरवू शकणारा डिलर शोधायला वसई पालथी घातली...आणि स्वस्त्यात ड्रेस शिवून देणारा टेलर शोधला... अथक प्रयत्नाने आम्हा सर्वांचा पूर्ण ड्रेस १५० रुपयांच्या आतच तयार झाला...ही बापूंचीच किमया...हा हिशेब आजही माझ्याकडे जपून  ठेवलाय...कारण पहिल्यांदाच इतका मोठा व्यवहार केला होता...सगळा हिशेब पूर्ण झाल्यावर जेव्हा पुन्हा माझी जास्तीचे पैसे ज्याचे त्याचे द्यायची वेळ आली. तेव्हा कुणीही ते पैसे घेतले नाही...सर्व पैसे स्वेच्छा निधीत देण्याची त्यांनी मला आदेश दिला..आणि तो मी मानला.

या परेडला एक जण यायची...वयाने मोठी होती....तिच्या घरुन बापूंना विरोध होता. तरीही ती यायची...कामाला जाते अस खोट सांगून..पंजाबी ड्रेस घालून यायची आणि ग्राऊंडवरील शाळेत चेंज करायची..पुन्हा घरी जाताना पंजाबी ड्रेस घालून जायची...खुप कष्ट घेतले तीने....तिला मी खूप ओरडायचे....वाट्टेल ते बोलायचे...पण तीने कधी वाईट वाटून नाही घेतले...उलट स्वतःमध्ये बदल केले....आज तिच्याकडे पाहताना माझा उर अभिमानाने भरुन येतो...आज तिच्याकडचे सगळे बापूंकडे येतात...काहीच प्रोब्लेम नाही...मी परेड सोडल्यानंतरही ती परेडला होती...आणि दिमाखात घरुन परेडचा ड्रेस घालून बाहेर पडायची....

अश्याच अजून काही मुली होत्या ज्यांनी स्वतःवर फार मेहनत घेतली....आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे..आज सगळ्या आपापल्या संसारात रमल्या आहेत...पण परेडच्या आठवणी काढल्यावर त्यांच्या डोळ्यातही चटकन पाणी येत...

२००५ मध्ये मी परेड सोडली...कारण तसा आदेश होता..."प्रत्यक्ष" जॉईन केल....याचवर्षी माझी परेडची तीन वर्षे पूर्ण झाली होती...ऑक्टोबर २००५ अनिरुद्ध पौर्णिमा...ही शेवटची परेड....अनिरुद्ध पौर्णिमेला पहिल्यांदाच रेस्क्यु पथक....याच वर्षी पहिल्यांदा बापूंनी उठून सलामी दिली होती...आणि पहिल्यांदाच रेस्क्यु पथकाचे कमांडर म्हणून मला कमांड देण्याची संधी मिळाली होती....बापूंनी मला मानाने निवृत्त केल....

त्या दिवशी परेडचा पहिला दिवस आठवला.....पहिली हॅपी होमची परेड आठवली...आणि पहिली अनिरुद्ध पौर्णिमेची परेड आठवली.....एका प्लाटूनच्या एका कोपर्यापासून झालेला आरंभ....आणि त्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या प्लाटूनच्या कमांडरपदी झालेला शेवट....

ह्यावेळी काय वाटल ते मी नाही शब्दात नाही सांगू शकत.....पण मी एक सैनिक  आहे.....तो आब...तो मान... शेवटपर्यंत राखला बस्स!!!!

सैनिक म्हणून जॉईन केलेल्या परेडमधून वानरसैनिक म्हणून निवृत्ती घेतली...आणखीन काय हवं....
कुठलही मेडल...किंवा काहीही मला मिळाले नाही...मिळाला फक्त बापू...त्याचे चरण.....आणखीन काय हवं....
परेड सोडली पण खरी प्रगती तिथूनच झाली....आणखीन काय हवं
जेव्हा मी परेड कमांडर होती....तेव्हा मी काही जणांना म्हटल होत....की परेड मधूनच डीएमव्हीचा सर्वांगीण विकास होतो....आणि येथूनच खरी प्रगतीला गती मिळते....तेव्हा मला वेड्यात काढण्यात आल होत....

पण हीच गोष्ट आता सिद्ध झाली आहे.........अनेक परेड डीएमव्हीने हे सिद्ध केले आहे.... असो

आता चक्र पुन्हा सुरु होतेय.....पाच वर्षांनी पुन्हा एकदा परेड जॉईन केली आहे...आणि पुन्हा एकदा एका कोपर्यापासून सुरुवात करणार आहे....ती ही अनिरुद्ध पौर्णिमेपासून...
पण आता काही मिळविण्यासाठीसाठी नाही...कुठल्याही ध्येयाने प्रेरीत होऊन नाही तर.....
फक्त आणि फक्त परेडसाठी परेड जॉईन केली आहे.......
परेडने जे मला दिले आहे...ते परत देण्यासाठी.....
आणि माझी ही परेड असेल अनिरुद्धाच्या दिशेने जाणारी....रामराज्याच्या दिशेने जाणारी.....श्री राम!!!

Tuesday, October 26, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग ५ (PARADE - 5)

हरी ॐ
खुप दिवस झाले ब्लॉगवर काही अपडेट माहिती द्यायला वेळच मिळाला नाही. गणपती गेले...नवरात्र गेली आणि आता दिवाळी आली...पण कामाच्या गडबडीत ब्लॉगकडे जरा दुर्लक्ष झाले. म्हणून आज जरा जबरदस्तीने लिहायला बसले...मी प्रोमिस केले होते की परेडचा अविस्मरणीय प्रवास पुढे पण लिहीत राहीन..आता तोच धागा पकडून पुढचा प्रवास सुरु करुया...

तर चौथ्याभागात तुम्हाला मी सांगितले की परेड रेस्क्युची धम्माल आता सांगणार आहे...पण मुहूर्त नाही मिळाला..तर आता ऐका...

रेस्क्यु
परेड हा ए ए डी एमचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सगळ्या परेडच्या मुलांनी रेस्क्युमध्ये सहभागी हॊणे तर क्रमप्राप्त होते..हो पण रेस्क्युच्या टीममध्ये माझी निवड कशी झाली हेच मला कळले नाही...हो पण तेव्हा आम्ही केवळ पाचच मुली होतो...बाकी सगळी मुले होती...कुठे कुठे सराव करायचो...खर तर सराव करायला जागाच नसायची...पण तरी देखील जागा मिळेल तसा सराव करायचो...अगदी झोकून देऊन...


तिसर्या माळ्यावरुन उडी मारलेली...
रेस्क्युच्या लेक्चरमध्ये  सगळ्या मेथड तर शिकलो...पण प्रात्यक्षिकाचे काय? याचा सराव कुठे करायचा....
तर आम्ही सगळे बांद्राला आपल्या हरीगुरुग्रामच्या मागे एक मैदान होते...तिथे एक मोठे होर्डींग होते. त्या होर्डींगवर म्हणजे त्या होर्डींगच्या पिलर्सवर सराव करायचे ठरविले.  आधीतर ती उंची बघून माझ्या काळाजात धस्स झाले...पण आता ही भिती गेली पाहिजे. म्हणून पुढे पाऊल टाकायचे ठरविले. तेव्हा आमच्या बरोबर वैभव कुलकर्णी, अजय भिसे, प्रसाद धुवाळी ही सगळी मंडळी होती..

Rescue
साधारण वीस एक फुटावरुन शिडीचा दोर सोडलेला असायचा. त्याच्यावर चढून वर जायचे...शिकलेले प्रत्यक्षात आणणे वाटते तितके सोपे नाही. शिडी गाठेवरुन वर चढण्यासाठी विशीष्ट टेक्नीकचा वापर करावा लागायचा.. त्यामुळे गोल गोल न फिरता सलग वर चढता येत होते..शिडी गाठीवर चढण्यासाठी हातात खूप जोर असणे आवश्यक आहे..आणि तोच नेमका नव्हता. म्हणून पूल अप्स.सूर्यनमस्कार मारायचो..शिडी गाठीवर चढून अंगठा आणि त्याबाजूचे बोट हे कायम दुखापतीत असायचे...पण पर्वा केली कुणी...बॅंडेज बांधून पुन्हा सराव करु लागायचो...म्हणूनच बहुतेक आजही शिडी गाठीवर चढण्याचा आत्मविश्वास आहे...

वरती चढलो की त्या होर्डींगच्या पट्ट्यांवर जाऊन बसायचो..उंच टॉप ऑफ दी वर्ल्ड वाटायचे...तिथे बसून आम्ही हॅपी होम दिसतेय का? ते पाहायचो...हो पण आम्ही आमच्या सुरक्षीततेची पूर्ण काळ्जी घ्यायचो बर का!!!

बैल गाठ बांधून बसायचो...म्हणजे खाली पडणार नाही. मग एक आम्हाला दिव्य शिकवल...ते म्हणजे स्लायडींग....बापरे..म्हणजे त्या उंचावरुन उडी मारायची...दोरीवर टाकलेल्या लूप ला पकडून उडी मारायची आणी खाली घसरत यायचे...पहिल्यांदा केले...तेव्हा पोटात असला गोळा आला काय सांगु...वाटल मेलो!!! पण नंतर सवय झाली....अगदी डाव्या हातचा मळ जणू काही....

बरच काही शिकलो...खुर्ची गाठने कस सोडायचे....कस उतरायचे....मंकी क्रॉअल...इत्यादी...
मग या रेस्क्यु टीम तर्फे अनेक ठीकाणी डेमो झाले...अनेक ठीकाणी आम्ही शिकवायला गेलो...चांगलेच लक्षात राहणारे डेमो म्हणजे...बांद्रा पी एफ ऑफीसला झालेला डेमो आणि हरिगुरुग्रामला अहिल्या आणि बलच्या विद्यार्थ्यांसाठी झालेला डेमो...

चढण्याच्या तयारीत मी
बांद्रा पी एफ ऑफीसला डेमो जोरात सुरु होता. तेव्हा कळल की रेक्लमेशन जवळच्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे...आम्ही तसेच पळालो...मला जीवरक्षक गाठ बांधण्यात आली होती. मी तशीच पळाले...ती  गाठ धावता धावता सोडवली. एका टॅक्सीवाल्या थांबवून आम्ही त्याच्या टॅक्सीत घुसलो आणि अपघात स्थळी गेलो. त्या पुलावरुन खाली धगधगती आग पाहिली...अत्यंत भीती वाटली...पण खाली गेलो आणि क्राऊड मॅनेजमेंटला सुरुवात केली...त्यानंतर हरीगुरुग्रामला झालेला डेमो भन्नाट होता...हरीगुरुग्रामच्या तीसर्या माळ्यावर रॅपलींग करत चढत जायचे...मग वरुन खाली उडी मारायची...खरच हा अनुभव भारी होता...


हरीगुरुग्रामच्या भिंतींवर चढताना मी
या सरावामुळे इतका आत्मविश्वास मिळाला की पुढील आयुष्यात कराव्या लागणार्या उचापत्यांसाठी पक्की तयारी झाली...ते कसे ते पुढील काही भागात पाहू. या रेस्क्यु सरावा दरम्यान जी काही भीती होती..ती बापूंनी मनातून काढली. उंचीची भीती, पाण्याची भीती, उडी मारण्याची भीती, आगीची भीती, सापाची भीती, रक्ताची भीती सगळ्या प्रकारच्य़ा भीती मनातून बापूंनी काढल्या.

नेरुळला, डहाणूला डेमोला जाण्याची संधी मिळाली होती. या दरम्यान भरपूर काही शिकता आले..खरचं बापू आपल्याला काय काय शिकण्याची संधी देत आहे. याची जाणीव झाली..एक समर्थ डीएमव्ही बनण्यासाठी बापू घेत असलेली मेहनत शब्दात वर्णूच शकत नाही. केवळ शरीरानेच नाही तर मानसिक आणि बौधिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी बापू सर्व त्याच्या डीएमव्हीव मेहनत घेतात..प्रश्न आपला आहे...मी किती करतो? असो...
डहाणू डेमो..सापाला हाताळताना....

या कणखर प्रशिक्षणामुळे भविष्यात फोटोग्राफर म्हणून एका पुरुष फोटोग्राफर सारखेच किंबुहना त्याच्याहून जरा जास्तच कष्ट आणि उचापत्या करण्याचे बळ या प्रक्षिणातून मिळाले.
आता पुढील भागात नालासोपारा परेड केंद्राची जडण घडण पाहू...जिथे मी माझे प्राण ओतले होते....नालासोपारा परेड केंद्राचे परेड कमांडर म्हणून सेवा करताना माझ्यात होणारा बदल हा विलक्षण होता.. अवघ्या २१ वयाची असताना परेड केंद्रावर येणार्या सर्व मुला मुलींची मी पालक झाले होते...आणि हा अनुभव खूप काही शिकविणारा होता...अंतर्मूख करणारा होता. लहान वयातच जबाबदारींची जाणिव परेड कशी काय करुन देऊ शकते हे तुम्हालाही कळेल..

परेड - अविस्मरणीय अनुभव - धम्माल,सोहळा, भाग ४,भाग ३,भाग २, भाग १

Monday, October 4, 2010

परेड एक अविस्मरणीय सोहळा - PARADE FOUNDATION DAY

हरी ॐ,
परेड एक अविस्मरणिय अनुभवाचे चार भाग लिहून झाले......आणि पुढच लिहायचे राहिले....पण आता पुन्हा ही सिरिज सुरु करणार........पण सुरु करणार ते एका अविस्मरणिय सोहळ्यापासून...परेड फाऊंडेशन डेच्या सोहळ्यापासून........जो ३ ऑक्टोबर २०१० रोजी श्री हरीगुरुग्राम येथे पार पडला....काय झाल या सोहळ्यात? अहो तर, विचारा काय नाही झाले.....गेल्या सात वर्षात परेड डीएमव्हींनी विचारही केला नसेल. ते सर्व झाले...मला तर खर शब्दात मांडणे ही कठीण होतेय....एकच शब्द "भन्नाट"

२३ सप्टेंबर हा परेडचा फाऊंडेशन डे. ह्या दिवसाचा सोहळा रविवारी ३ ऑक्टोबरला परेड डीएमव्ही ने आयोजित केला होता. दिंडी, पादुकापूजन, पठण, सत्संग असा दिवसभरात कार्यक्रम आखला होता. सर्व परेड डीएमव्हींनी या कार्यक्रम करण्यासाठी चांगलीच कंबर कसलेली दिसत होती.

प्रवेशद्वारा जवळ भव्य रांगोळी....मग आतमध्ये साईबाबा आणि बापूंची सुंदर रांगोळी...स्टेजवर सुंदर डेकोरेशन...बापू, आई, दादा, आद्यपिपा, दत्तबाप्पा या सर्वांना लड्यांचे हार घातले होते..अत्यंत सुंदर आणि सुबक हार बनविले होते....माहीती कक्षामध्ये परेड प्रोजेक्टची माहीती देणारे बॅनर्स होते.. एका बाजूला चरखे सुरु होते...सकाळी दिंडीतून बाप्पाच्या पादुकांचे आगमन झाले...खर तर मी सोहळ्याला फार वेळ उपस्थित नव्हते. त्यामुळे माझ्या मित्र मैत्रिणींनी शेअर केलेली मज्जा तुम्हाला सांगतेय....

सगळे मुले-मुली दिंडीत तुफान नाचले...सकाळी स्वप्निलसिंह, पौरससिंह आणि समीरदादा ही होते...मी दुपारी अडीचच्या सुमारास पोहोचले. दत्तबावनी, हनुमानचालिसा अटेंड केली. दर्शन घेऊन....सगळ्यांना भेटले...जुने नवीन डीएमव्ही भेटले....खूप छान वाटले... तीन वाजता मी ऑफीसला जायला निघाले...खर तर जावेसे वाटत नव्हते....पण नाईलाज होता..जड अंतःकरणाने निघाले...आणि काहीही झाले तरी रात्री परत यायचे अस ठरवले.. दरम्यान फोनवर फोन सुरु होते...नंदाई आणि सुचितदादा सोहळ्याला आल्याचे कळले...ऐकूनच मला खूप भरुन आले...आईने सगळे डेकोरेशन पाहीले. खूप कौतुक केले सगळ्यांचे...लड्यांचे हार आणि पादुकांखाली केलेली गादी हात लावून पाहीली...तीला खूप आवडले..असे एका मैत्रिणीने सांगितले...एका मुलीने आईला निघताना म्हटले, "आई आणखी थोडा वेळ थांब ना." तेव्हा आई म्हणाली, "बाळांनो, मी तुमच्यासाठीच आलेली आहे." अस मला एका मुलीने सांगितले..

दिवसभर तर सर्व डीएमव्हींनी मज्जा केली...पण संध्याकाळी लवकर ये अस....प्रितीवीरा, नेहावीरा, प्रणालीवीरा या सगळ्यांनी सांगितले...त्यामुळे मला ही कधी पोहोचतेय अस झाल...चार वाजता मी गुरुक्षेत्रमला काही कामानिमित्त गेले तेव्हा बापू हॅपी होम मधून निघाले..मस्त दर्शन झाले....बापू मिटींगला जात असावेत असा अंदाज बांधला...पण बापू परेड सोहळ्यासाठी जातील का? असा प्रश्न मला पडला...बापू सोहळ्याला जावेत अस मला खूप वाटत होते...आणि ते जाणारच असा मला विश्वास वाटतच होते..आणि तेव्हा बापूंना म्हटले काहीही झाले तरी मला आता तूम्ही वेळेत पोहचवा हरीगुरुग्रामला...आणि तसेच झाले....

खार एस. व्ही. रोड वरुन हरीगुरुग्रामला जायला रिक्षा मिळत नाही एरव्ही..पण त्या रात्री पटकन रिक्षा मिळाली...आणि १५ मिनिटांच्या आत ८.३५ ला मी हरीगुरुग्रामला पोहचले...मी वेळेत पोहोचल्याचा आनंद माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणी नेहा आणि प्रितीलाच झाल्याचे त्यांच्या चेहर्यावर दिसत होते. मी गेले हॉलमध्ये बसले...परेडचे डीएमव्ही गात होते...बापू बसले होते....सगळेच गात होते.....मी पोहोचले तेव्हा....ओंकार व्यापका अनिरुद्ध नाथा हा अभंग सुरु होता....मग हरी हरा हा अभंग सुरु झाला...मग ए ए डी एमचे गाणे सुरु झाले...दे मनःसार्मथ्यदाता....शहारे आले अंगावर....

सगळे जण प्रत्येक गाण्यानंतर ललकारी देत होते...तेव्हा बापू म्हणाले "आता प्रत्येक गाण्यानंतर ललकारी देत राहीलात तर कार्यक्रम वाढेल आता...तर ललकारी सगळ्यात शेवटी द्या. आता ओरडायचे नाही आणि रडायचेही नाही...मात्र गायचे सर्वांनी"

त्यानंतर पुढच्या गाण्याला सगळे नाचायला उठले....याचा फायदा घेत मी आणि सर्व मागे असलेले डीएमव्ही पुढे गेले...थेट स्टेज समोर....आणि तूफान नाचलो....अरे सगळ वेगळच होते.....काय एनर्जी होती बापूंमध्ये आणि सर्व डीएमव्ही मध्ये... सगळे उड्या मारत होते उंच उंच...मुलांची डोकी तर वरच्या भिंतींना आपटतील की काय अस वाटले!!!

बापूंचे नाचायच्या एक एक स्टेप तर भारी होत्या...आणि एक्सप्रेशन तर लई भारी...जोगवा, गोंधळ, घरबा...सहीच

 एक गाणे झाले माखन की चोरी...ते तर भारी होते...त्या गाण्याच्या प्रत्येक वाक्याला तसेच हावभाव बापू करत होते....
बापू के संग करो माखन की चोरी
चोरो की पूरी हो गई तय्यारी
पकडे गये तो बापू मारेगी आई
आई का गुस्सा बापू तुझसे भी भारी
दाऊ को भी ना ये चोरी है प्यारी
अरे भाग मत रे.
माखन लिए
चखवा दे अपनेही ऊंगली से....

ह्या गाण्यांच्या ओळीप्रमाणेच बापू नाचत होते...आई का गुस्सा म्हटल्यावर दोन्ही हात गालावर ठेवून "बापरे" अस करतात ना तसेच केले. अरे भाग मत रे....ला धावतोय अशी ऍक्टींग केली..अरे लई भारी...

नंतर सलग गजर अभंग...धम्माल.....शेवट्च्या गजर नंतर....बापूंनी एक ऍक्शन केली. आपण एखादी गोष्ट जिंकल्यावर कस दोन्ही हाताच्या मुठी वळून "येस" अस करतो...तस केले... अरे काय काय सांगू...मला सांगता पण येत नाही....

शेवटी बापू बोलायला लागले...

कधीही दमलात , कंटाळलात , नाराज झालात ,डीपरेशन
येतंय असं वाटलं, तर माझ फक्त एक वाक्य ऐकायचं , परत परत स्वत:च्याच
कानांनी स्वत:च्याच मनात ऐकायचे , हे वाक्य कधीही विसरू नका
"I LOVE YOU"

हे बापू बोलल्यावर आम्ही देखील "I LOVE YOU" "I LOVE YOU" ओरडलो. आणि श्रीराम श्रीराम ओरडलो...

त्यावेळी काय वाटल हे याचे वर्णन शब्दात करताच येणार नाही.....नंतर बापूंनी परेडच्या सर्व डीएमव्हींना जे सकाळ पासून होते त्यांना आत बोलवल...आणि त्यांच्याशी बोलले...नंतर बापूंनी माहिती कक्षात परेड बद्दलची माहिती घेतली..सगळे जण खूप खूष झालेत....

सगळे परेड डीएमव्हींनी बापू आई दादांना खूप जवळून अनुभवल....कधी विचार ही केला नसेल...इतक प्रत्येकाला मिळाले....२५० हून अधिक जण होते...त्या प्रत्येकाचा वेगळा आनंद वेगळा अनुभव.....

त्या हॉलमध्ये आनंदाचा उत्साहाचा नुसता स्फोट झाला होता....काय सांगू? त्याच्या प्रेमाच्या वर्षावात सगळे ओले चिंब....संपूर्ण वातावरणात तारुण्य, चैतन्य सळसळत होत.....कालच्या सोहळ्याने नवीन उमेद आणि आत्मविश्वास मिळाला आहे प्रत्येकाला...खरच काल खूप बर वाटल...

गेली सात वर्षे परेड डीएमव्ही बापूंच्या हृदयापर्यंत त्यांच्या चरणापर्यंत पोहचण्यासाठी सेतू बांधत होते..जेव्हा बापू I Love You  बोलले...तेव्हा सगळ्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. ही मेहनत एका दिवसाची तर एका महिन्याची नव्हती. ही मेहनत गेल्या सात वर्षांची होती..परेड डीएमव्हींनी घेतलेल्या शारिरीक, मानसिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक कष्टांचे चीज झाले आणि ते ही त्यांनीच करवून घेतले...देता है तो छप्पर फाड के....असच झाल... हा सेतू बांधण्यासाठी समिरदादा, पौरससिंह आणि स्वप्निलसिंह यांचे सातत्याने मिळालेले प्रोत्साहन आणि पाठबळ अत्यंत महत्त्वाचे आहे.

कालचा सोहळा म्हणजे मधुफलवाटीकाच वाटला मला....मेहनतीनंतर श्रमपरिहारासाठी असलेली मधुफलवाटीका....

आता पुढील रामराज्याच्या प्रवासासाठी नवीन उत्साह, चैतन्य आणि आत्मविश्वास मिळाला....प्रत्येक परेड डीएमव्हींनी बापूंना चांगला डीएमव्ही बनण्याचे, नेहमी तरुण राहण्याचे वचन दिले आहे आणि ते आता पूर्ण करायचे आहे...आणि तोच करवून घेणार...नक्की १०८ टक्के....

मला एका गोष्टीचे अत्यंत वाईट वाटले...ते म्हणजे माझ्या नावाच्या सुरुवातीला असलेल्या "EX"  या शब्दाचे...एक्स परेड डीएमव्ही रेश्मावीरा हरचेकर....या "एक्स" चा खून करणार आहे मी. हा एक्स काढून, फाडून, त्याचा चोळामोळा करुन, जाळून टाकायचा आहे मला.....एकच प्रार्थना.....हा एक्स पुन्हा माझ्या वाट्याला आणू नकोस....आणि कायम ऍक्टीव्ह डिएमव्ही ठेव...जशी जाणिव तू रविवारी दुपारी करुन दिलीस..

(रविवारी दुपारी वसई स्टेशन वर एक म्हातार्या बाईंना चक्कर आली..तेथे मी माझे डीएमव्हीचे कर्तव्य पार पाडले.. बापूंनी जाणिव करुन दिली की मी अजूनही परेड डीएमव्ही आहे...)

कदमताल करणार्यांच्या
हृदयाचा ताल तू केव्हा धरलास
कळलेच नाही

तुझ्या बरोबर नाचताना
दमलेल्या मनाचा क्षीण कधी संपला
कळलेच नाही

तुझ्याकडे पाहत असताना
आम्ही कधी संपलो कधी ते
कळलेच नाही

तुझ्या रंगात रंगताना
आम्ही कधी असे बदललो
कळलेच नाही

तुझ्यासाठी झिजताना
आम्ही कधी घडलो
कळलेच नाही

"आय लव्ह यू" म्हणालास
तेव्हाआम्ही रडलो की हसलो
कळलेच नाही

- रेश्मा हरचेकर ४/१०/१०

Sunday, August 22, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग ४ (PARADE)

हरि ओम,
धपा धप तीन भाग लिहून झाले....जरा चौथ्या भागासाठी वेळ घेतला...मुद्दामूनच घेतला...कारण आता परेडसारख्याच अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी वळणार आहे....रेस्क्यु प्रॅक्टीस...
परेड काय आहे....आणि  रेस्क्यु प्रॅक्टीस काय? याचा मी नेहमी विचार करायचे...यातील जास्त महत्त्वाचे काय? .हा प्रश्न मला एकाने विचारला होता..मला उत्तर तेव्हा देता आले नाही...पण आज मी हे उत्तर देते...माझ्यामते, परेड आणि रेस्क्यू प्रॅक्टीस ही दोन्ही ए ए डी एमची विभक्त नसलेली जुळी बाळे आहेत...एकाशिवाय दुसरे राहू शकत नाही...दोघेही एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी एका डीएमव्हीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फक्त थॊडासा फरक जर करायचा झाला तर परेड हे साध्य नाही...साधन आहे...तर रेस्क्यु प्रॅक्टीस किंवा रेस्क्यु हे साध्य आहे...मी परेड का करायची तर....रेस्क्यु ऑपरेशनसाठी सदैव फिट रहावे म्हणून....म्हणजे जस आपल्या देशाचे सैनिक सीमेवर लढतात...ते त्यांचे कार्य असते...अगदी तसच...DMV चे आहे...अस मला वाटत...ते सीमेवरील आपत्तीशी लढतात....आपले काम सीमेआत येणार्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीशी लढणे आहे...आता लढणे म्हणजे आगाऊपणा करत पुढे पुढे करण आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणं नाही...तर आपल्या सरकारी यंत्रणांना (पोलीस द्ल, अग्नीशामक दल इत्यादी) त्यांच्या कामात पूर्ण सहकार्य करणं...कोणतीही आपत्ती उदभवू नये याची दक्षता घेणं...हे सगळ मी या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून करायच...आणि ते उचित पद्धतीने करता याव...यासाठी ए ए डी एमचा डी एम व्ही होण गरजेच आहे....नाही तर काही तरी वेड्यासारख करायच आणि आपत्ती निवारण करण्या ऐवजी आपत्ती वाढवून ठेवायची...याच सगळ्यात मोठ्ठ आणि तापदायक उदाहरण म्हणजे "अफवा" पसरविणे....असो...मला काय म्हणायचे ते कळलेच असेल तुम्हाला...नसेल तर यावर आपण पुन्हा कधी तरी सविस्तर बोलू...आता वळूया आमच्या भन्नाट रेस्क्यू प्रॅक्टीसकडे....

तर परेडच्या रेस्क्यु प्रॅक्टीसकडे वळण्याआधी केंद्रावरील रेस्क्यु सरावाची थोडीशी मज्जा सांगते...केंद्रावर आमचा ए ए डी एम चा मस्त ग्रुप होता...मला अजूनही आठवतय...सगळे झपाटलेले होतो तेव्हा...मी, आशिष भाई, सुनि ताई, प्रसाद, प्रतिभा, भक्ती, निलेश, पराग इत्यादी...वेड लागल्यासारखा सराव करायचो...हीच आमची वसईची रेस्क्यु मेन टीम होती...आशिष भाई म्हणजे आशिष सोलंकी याने आम्हा सर्वांना बांधून ठेवलेले...अरे बांधून ठेवलेले म्हणजे एकत्र बांधून ठेवलेले...आज सगळे वेगवेगळ्या सेवेत सहभागी झालेले असलो तरिही त्या आठवणि ताज्या आहेत... खूप प्रॅक्टीस करायचो...मी तेव्हा अत्यंत बारीक होते आणि वजनाने तर एकदम फूलच होते...त्यामुळे प्रत्येक प्रॅक्टीसला माझा हमखास बळी जायचा...म्हणजे सर्व जण मला कॅज्युलटी म्हणून वापरायचे...ही झाली केंद्राची रेस्क्यु टीम..दुसरी अजून एक टीम होती...बोरीवली ते विरारमधील अती ऍक्टीव्ह डीएमव्हींची..यामध्ये मला फारशी नावे आठवत नाहीत पण मी, सुनी ताई, प्रसाद, शैलेश धुरी, अनिकेत कोळंबकर, सचिन सरैय्या, निलेश पोवळे असे बरेच जण होतो...अरे काय धम्माल केली आहे आम्ही...बोरीवली ते बोईसर दरम्यान कुठेही ए ए डी एम चा कोर्स असला की जायचो आम्ही...सोबत...अरविंदसिंह नातू (नातू काका), जाधव काका, अशोकसिंह वर्तक हे कधीतरी असायचे मार्गदर्शन द्यायला...सगळे जण या तिघांना जाम टरकायचे..पण हे तिनही काका आम्हाला छान मार्गदर्शन करायचे...खूप शिकायला मिळाले यांच्याकडून...खूप छान मोटीव्हेशन द्यायचे...मला सगळ्यात जास्त भिती नातू काका आणि वर्तक काकांची वाटायची...ते गुगली प्रश्न विचारायचे...ते दिसले की मी लांब पळायची...पण आता नाही घाबरत :). एकदा नातू काकांनी मला विरारला चालेल्या प्रॅक्टीस दरम्यान प्रश्न विचारला..मी त्याचे उत्तर दिले तर त्या उत्तरावर पुन्हा प्रश्न विचारला..बापरे मी नंतर उत्तरच दिले नाही पुढचा प्रश्न येईल या भितीने...प्रश्न नेमका आठवत नाही पण तेव्हा ते म्हणाले होते की एका डीएमव्हीचे G K  पक्के पाहीजे...त्याला सगळ्या चालू घडामोडींची माहीती पाहीजे. तेव्हा पासून मी तस स्वतःला शक्य तितके अपडेटेड ठेवायला लागले...आणि त्याचा आत्ता खूप फायद झाला...Thank You Very Much Natu Kaka...त्यानंतर वर्तक काकांनी मला पाणजू येथे झालेल्या कोर्सला प्रश्न विचारला सगळ्यांसमोर...रेश्मा आता तू इतक करतेस सेवा आणि AADM  पुढे लग्न झाल्यावर काय करणार? तुझ्या नवर्याने नाही पाठवल मग? तेव्हा मला खूप भिती वाटली. खरच अस झाल तर...पण मी ठामपणे उत्तर दिले...नवरा सोडेन बापूंची सेवा नाही....यावर त्यांनी माझ्याशी खूप वाद घातला..(हा वाद माझ्या भल्यासाठीच होता हे मला पक्के ठाऊक होते) पण मी ठाम होते...आजही आहे...पण खरच त्यांनी त्या दिवशी विचारलेल्या प्रश्नाने माझे विचार बदलू लागले...आणि खरच मला काय हवय...आणि काय नकोय याची एक चौकट बनू लागली...पण ही चौकट माझे बंधन नाही बनली...आणि या मर्यादेच्या चौकटीत राहूनच प्रगतीच्या दिशेने माझा जोमाने प्रवास सुरु झाला...जो आजही सुरु आहे..तेव्हा माझे वय १९/२० असेल..हे सगळ सांगायचा मुद्दा असा की, ए ए डी एम आणि परेड या सारख्या सेवांमध्ये फक्त मी सहभागी नाही झाले..तर या सेवा करताना अनेक बाबींतून मी घडत गेले...या सेवे दरम्यान संपर्कात आलेल्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखे होते..ते मी शिकले...त्यामुळे या बापूंच्या कार्यात झोकून दिल्याने माझ कुठही नुकसान झाले नाही. अनेकांनी मला वेड्यात काढले...अगदी नातेवाईकांनी सुद्धा...बापूंच्या सेवेत आणि या नसत्या उद्योगात सहभागी होऊन तुला काय मिळणार आहे? काय उपयोग याचा? अशा प्रश्नांचा भडीमार व्हायचा...पण असे प्रश्न झेलण्याची ताकद बापूंनी दिली. तेव्हा त्यांना मी उत्तरे दिली नाहीत...आणि आज पुन्हा त्यांच्यात हे प्रश्न विचारण्याची हिम्मत नाही...ह्यालाच म्हणतात खरा "बापूंचा चमत्कार"

तर असो,

आम्ही मचाण बांधण्यापासून ते मोडण्यापर्यंतचे आणि या दरम्यान डेमॊ दाखविण्याचे सर्व उद्योग करायचो..सचिन सरैय्या, निलेश, शैलेश, प्रसाद हे सगळे मचाण बांधण्यात पुढे असायचे..एकदा तर सगळे मचाणावर चढलो...आणि पडतय की काय अस झालेल...पण बापू कृपेने नाही पडले...आणि आम्ही सगळे सुखरुप होतो...वसईलाच झालेले हे बहुतेक...आम्ही रेस्क्युच्या काही नविन पद्धती देखील शोधून काढल्या होत्या..अभ्यासक्रमाच्या बाहेरील....हा हा हा....काय भन्नाट डोकी चालायची आमची..केंद्रावर रेस्क्यु प्रॅक्टीस जोरदार चालली होती...मध्येच आम्ही कांदीवलीला एका शाळेत सरावाला जायचो...तिथे त्या बैठ्या शाळेच्या छपरावर जायचो आणि तिथून सेफ जंपचा सराव करायचो...मी एकदाच मारली जंप..बाबारे!!!...लय भिती वाटायची जंप ला...लॅडरने चढणे उतरणे वैगरे...त्यानंतर दहिसरच्या मैदानात सराव सुरु झाला...येथे तर धम्माल यायची..प्रसाद धुमाळी, सत्या..वैगरे दहिसरचे डीएमव्ही येथे एकत्र सराव करायचो...

इकडची एक गम्मत आठवतेय...दहिसरचे हे ग्राऊंड जरा गवताळ होत...त्यामुळे इथे सराव करताना फार प्रसन्न वाटायच...रात्री ७ / ७:३० नंतर सराव चालायचा. आम्ही इथे कॅज्युलटीला स्ट्रेचरवर घ्यायचो त्या ग्राऊंडला चक्कर मारायचो. एक किंवा दोन..मला हे सगळे सारखे कॅज्युलटी बनवायचे...त्यामुळे इथे माझा सराव कमीच व्हायचा...खर सांगू मी कुणाला उचलू शकेन अस कुणीच नव्हत तिथे...आणि मी परेफेक्ट कॅज्युल्टी असायची....डीएमव्हीला अजिबात सहकार्य न करणारी...अंगच टाकून द्यायची मी मला हॅण्डल करणार्या डीएमव्हीवर...मग मज्जा यायची त्यांची...असो...तर एकदा सगळ्या मुलींनी मला रोप स्ट्रेचरवर उचलले. त्यांनी बरोबर उचलले नव्हते...एक राऊंड झाल्यानंतर त्यांनी मला खाली ठेवले. खाली ठेवताना माझ डोक आपटले...माझा श्वासोच्छावास बंद होता..अंग थंड पडले होते...डोळे वर गेले होते...ठेवल्यानंतर मी उठेनाच...सगळे घाबरले...भक्ती हरचेकर माझी चुलत चुलत बहीण ही माझ्या डोक्याजवळ होती स्ट्रेचर धरायला. ती घाबरली. तीने मला गदा गदा हलविले मी उठली नाही...बाकीच्यांनी हात पाय चोळायला घेतले..भक्ती खूप घाबरली..शेवटी तिने थोबाडीत मारायला सुरुवात केली मला. एक...दोन...तीन..फटाफट...दहा तरी मारल्या असतील तिने...शेवटी मला सहन नाही झाले....आणि मी म्हटल बस!!!! आले मी शुद्धीवर...आणि हसायला लागले..हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
मी नाटक करीत होते..पाचच मिनिटाचे होते...पण सगळ्यांचे धाबे दणाणले होते...मी मस्त त्या गवतावर पहडून सगळ्यांकडे पाहत होते हसत...सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते..भक्तीचे पाण्याने डबडबले डोळे पाहून मला हसूच आवरेना...मग माझी वाट लागली...सगळ्यांनी असले धुतलय मला!!!...भक्तीने तर गळाच धरला..सुनिताईने चांगलेच धपाटे घातले...मुलांनी तर त्यांच्या वतीने माझ्या कमरेत लाथ घालायला सांगितली..तुडव तुडव तुडवला मला..आणि वॉर्निंग दिली..पुन्हा अस करायच नाही...सगळ्या डीएमव्हींची..हुशार डीएमव्हीची तेव्हा फाटली होती..मला जाम हसू येत होत..मग सगळे शांत झाल्यावर मी त्यांना म्हटल तुम्ही सगळ्यांनी चुकीच्या पद्धतीने मला उचलल होत...त्यामुळे माझा पाठीचा कणा कामातून गेला असता..शिवाय माझ डोक ही आपटल...कितीला पडल असत हे एका कॅज्युलटीला...म्हणून मी मुद्दामुनच नाटक केले...हा हा हा हा...
त्यांना पण हे लक्षात आल...पण पुन्हा मी अस करणार नाही अस वचन दिल्यानंतरच त्यांनी मला माफ केल..मी पण अस पुन्हा कधी केल नाही...नाहीतर लांडगा आला रे आला झाल असत माझ..आणि माझ्याही चुका होतच होत्या की...पण एक गोष्ट यानंतर छान झाली ती म्हणजे मी कॅज्युलटी म्हणून नाकारले जाऊ लागले झाले...कुणीही चालेल रेश्मा नको....हा हा हा....
असो तर अशी धम्माल करीत चालायचा आमचा रेस्क्यु सराव...त्यानंतर माझी निवड परेडच्या रेस्क्यु टीममध्ये झाली...आणि इथे तर सगळ भन्नाटच होत....आहा हा काय दिवस होते ते...अगदी मंतरलेले....Top of the World.. ते पाहू आपण पुढच्या भागात...सावधान होऊन ऐका बर का!!!! तूर्तास अनिरुद्ध पथक विश्राम

Saturday, August 21, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - विशे़ष

अरे तीन दिवसात ३ भाग लिहून झाले...आता चौथा भाग....या भागात रेस्क्युची मजा सांगणार होती ना मी?? हो सांगणारच आहे..पण या भागात नाही....जरा उत्सुकता ताणून धरुया आणखीन...कारण मी येथे बुफे नाही ठेवलाय...ही पंगत आहे..ज्यात भात वाढल्यानंतरच वरण येणार...स्वतःच्या मर्जीने कुणालाही आधी वरण मी घेऊ देणार नाही....पण मी जे काही वाढणार ते अगदी प्रेमाने आणि बापूंवरील निष्ठेनेच...मग बसणार या परेडच्या पंगतीला? छे!!! मी पण बावळट आहे. काय विचारतेय...तुम्ही बसलातच की....भात, वरण, भाजी घेतलीच की तुम्ही आधीच्या तीन भागात...आता पोळीची वेळ. नाही...पण आता तुम्हाला मी पोळी देणार नाही तर मिरचीचा ठेचा देणार आहे....झोंबला तर माफ करा!! पण माझा नाईलाज आहे...कारण आधीच सांगितले हा बुफे नाही जिथे तुम्हाला हवे ते मिळेल... ही पंगत आहे...माझ्या बापूंवरील प्रेमाची, परेडवरील निष्ठेची...आणि मी आणि माझ्या बापूंनीच ठरवलय...की आता या भागात ठेचाच द्यायचा....

जरा चक्रावलात ना!! चायला ही कोण कुठली रेश्मा आम्हाला ठेचा देतेय...हीलाच ठेचू...असे विचार पण मनात आले असतील तुमच्या...असो...तुम्ही मला ठेचा नाहीतर ठोका....मला काही फरक पडत नाही....पण हा ठेचा द्यावसा वाटला तो स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये यांनी तिसर्या भागावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ... या प्रतिक्रीयेमध्ये स्वप्निलसिंह म्हणतात, "तुझ्या लेखाबरोबरच मी बाकीच्यांचे प्रतिसाद सुध्दा वाचले पण खर सांगू का लेख जेवढा अप्रतिम जिवंत वाटला, प्रतिसाद तेवढेच शुष्क वाटले. उत्साह आणि चैतन्याने भरलेली परेड, तेवढाच जिवंत त्यावरचा लेख, तोही एका DMV ने लिहलेला. पण प्रतिसाद देणारे परेड DMV, आणि बाकीचे मात्र अतिशय अनुत्साही वाटले. खरतर मला वाटले की कोणीतरी आपलाही अनुभव येथे देईल, त्यांच्या वेळेसची मजा शेअर करेल, उत्साहात स्वतःचा ब्लॉग सुरु करेल. पण ती जादू काही घडली नाही. दुसर्‍याला छान म्हणण्याबरोबरच माझे काहीतरी सुध्दा त्याच्या बरोबर शेअर करणे महत्वाचे असते."

त्यामुळेच

ही घ्या ह्या ठेच्यातील पहिली मिरची :
तीन भाग लिहून झाले...सगळ्यांनी माझे कौतुक केले...पण मला या कौतुकाची अपेक्षा नव्हती...कारण मला जे काय मिळवायचे होते ते मिळवले आणि जे काही मिळवायचे आहे ते मिळविण्यास मी आणि माझा बापू समर्थ आहोत...पण यामागची खरी तळमळ काय? तर हेच जे स्वप्निलसिंहनी सांगितले..खरचं मला अपेक्षा होती...ती ह्या अनुभवांच्या वाचकांकडून उत्स्फुर्त प्रतिसादाची...जो "छान, व्हेरी गुड, अप्रतिम आणि ग्रेट या शब्दांच्या पलिकडला असेल...पण छे मी हरले....तुमची गाडी याच्या पुढे गेलीच नाही....पोपटच केला माझा...त्यामुळे मला खर तर प्रश्न पडलाय पुढचे अनुभव देऊ की नको....पण मी देणार आहे....कारण मला कमेंटची पर्वा नाही तर कृतीची आहे....जी परेड ग्राऊंडवर किंवा परेडमध्ये दिसणे आवश्यक आहे.

ही घ्या ह्या ठेच्यातील दुसरी मिरची :
लेख जेवढा अप्रतिम जिवंत वाटला, प्रतिसाद तेवढेच शुष्क वाटले. असे स्वप्निलसिंह म्हणतात...खरचं प्रतिसाद शुष्क आहेत...बापूंचा एक अनुभव मांडता येत नाही...आपल्याला...लाज वाटायला पाहिजे...बापूंबद्द्ल दोन ओळीपण लिहता येत नाही....आपल्याला....अरे/अग इतक कठीण काय असत त्यात...वेडु वाकूडे सगळे शब्द त्याला समजतात...अरे/अग मग काय हरकत आहे...कुणी सांगितलय अलंकारिक भाषा वापरायला...ही काय ब्लॉग स्पर्धा आहे...की निंबध लेखन आहे....ही तर आपल्या बापूंच्या कौतुकांची स्लॅम बुक आहे...यात मला अती सामान्य भाषेत बापूंबद्दल लिहता येईल की...कशाला घाबरत आहात...मी तरी कुठली सभ्य भाषा वापरली आहे...चायला मायला शब्द (सो कॉल्ड शिव्या) कितीदा आले असतील लिखाणात...पण त्या सुद्धा तुम्ही सहज वाचल्या की...त्यातला भाव तुम्हाला कळतो...की...मग जस बोलता तस लिहा. हो! पण जास्त शिव्यापण वापरु नका....तस इकडे कुणाला भाषेची पडलेली नाही...हा माझा आणि माझ्या बापूचा ब्लॉग आहे येथे भाषेपेक्षा भावाला जास्त महत्त्व आहे..येऊ देत ना तुमचे जीवंत प्रतिसाद...माझ्या या जिवंत अनुभवाला....प्रतिसादच कशाला तुमचेच जिवंत अनुभवच येऊ द्या....अनुभवच कशाला....तुमचा जीवंत ब्लॉगच होऊन जाऊ दे ना!!!!

ही घ्या ह्या ठेच्यातील तिसरी मिरची :

"काय आहे रेश्मा तू खूप छान लिहलयस...या तोडीच आम्हाला लिहता येत नाही...आणि खर सांगू वेळ नाही मिळत...तुला काय तू पडीक असतेस इंटरनेटवर...तुला कोण घरी विचारणार...आम्हाला संसार आहे..मुले बाळे आहेत....तुला काय? आम्हाला वेळ नाही मिळत..." सॉरी बॉस मला कारण देऊ नका...स्वतःचा डीफेन्सही मांडू नका..मला लिहता येत नाही अस जो म्हणणारा आहे ना!! त्याला कधीच लिहता येणार नाही...कारण जो पर्यंत लिहून घेणार्याची जागा मी माझ्या बापूला देत नाही तोपर्यंत लिहताच येणार नाही त्या व्यक्तीला...सॉरी कठोर बोलतेय...पण खर तेच आहे....आणि माझ्या अनुभवाचेच बोल आहेत....
दुसर म्हणजे वेळ नाही....प्लीज डोन्ट से धीस....अगेन टू मी....कारण वेळ काढला तर मिळतो....आणि वेळ काढता येतो....मला माहित आहे....खरच काही जणांना वेळ नसतोच...पण जे काढू शकतात...त्यांनी तो काढावा...आणि तुम्हाला तो नक्की मिळेल याची मला खात्री आहे...खर सांगू माझ्या ब्लॉगवर तसेच...इतरांच्या ब्लॉगवर वेळात वेळ काढून जर स्वप्निलसिंह कमेंट देऊ शकतात...तर नक्कीच आपण कुणीही देऊ शकतो...
आणि राहिली गोष्ट मी इंटरनेटवर पडीक असण्याची...तर मित्र-मैत्रींणींनो मला शेंड्या लावू नका...कोण कोण कुठल्या कुठल्या सोशल नेटवर्कींग साईट्वर काय काय खयाली पुलाव पकवत असतात. ते मला चांगलेच ठाऊक आहे....हे सगळ करत असताना पाच मिनिटाचा वेळ काढून तुम्हाला तुमच्या बापूंचे गुणसंकिर्तन करावेसे वाटत नाही?...का त्याची गरज वाटत नाही...की बापूंचा अनुभव शेअर करायला लाज वाटते? होय मी इंटरनेटवर पडीक आहे...रात्र रात्र घालवते मी यावर....पण कशासाठी....उत्तर तुमच्या समोर आहे....तुमच्या पेक्षा अधिक चांगले खयाली पुलाव ही पकवत असते....पण त्यातही माझा बापू हा असतोच...शोधाल तर सापडेल...सांगायचा मुद्दा असा....की दहशतवादी देखिल त्यांच्या प्रचार प्रसारासाठी इंटरनेट, ब्लॉगचा वापर करत आहेत....म्हणजे हा किति प्रभावी मिडीया आहे ते समजून घ्या....आणि किमान दोन ओळींचे बापूंचे गुणसंकिर्तन करा...प्लीज हरी ओम, आणि श्रीराम, अथवा राम अस हजारदा कॉपीपेस्ट करु नका...नाहीतर तुम्ही म्हणाल हे देखिल नामसंकिर्तन आहे..चालेल की....नाही चालणार....मला माझ्या बापूंचे प्रेम शब्दात व्यक्त करण्यास जमणे म्हणजेच त्याचे गुणसंकिर्तन करणे होय...अस मला वाटते...आणि हे देखिल तोच आपल्याकडून करवून घेतो...कारण त्याला हे आवडते...नाही का?
उरला प्रश्न संसाराचा मग तुमचा असो की माझा..तर एक गोष्ट सांगते...की बापू आईंना देखिल संसार आहे आणि तो व्यापक आहे....त्यांच्या मुला-मुलींचेही संसार आहेत...तरीही ते सगळ व्यवस्थित मॅनेज करतात...कारण ते त्यांच्या देवाला कारणे देत नाही....आणि नेमून दिलेले कार्य करतात...आपली त्यांच्याशी तुलना कधीच नाही पण त्यांच्याकडून हे नक्कीच शिकू शकतो आणि प्रयास करु शकतो ......तुमच माहीत नाही बुवा पण मी तरी शिकते बाबा...

अरे काय म्हणता तुमच्याकडे कॉम्प्युटर नाही, आणि तुमच्याकडे कॉम्प्युटर असून चालविता येत नाही..इंटरनेट वापरता येत नाही...अहो तुम्हाला आठवत नाही का?...बापू प्रवचनातून कित्येकदा बोलले होते की ज्याला कॉम्प्युटर, इंटरनेट वापरता येत नाही तो २१ व्या शतकात अडाणी ठरेल...मग अडाणी ठरायच आहे का आपल्याला...नाही ना!! मग ज्यांना शक्य आहे त्यांनी शिकायला नको का? मग शिका....
ठीक आहे ज्यांना नाही शिकता येणार किंवा ज्यांना सायबरचा खर्च नाही परवडणार...त्यांनी त्यांचे अनुभव हाताने लिहुन द्या ना....इंटरनेटवर टाकायची जबाबदारी माझी आणि माझ्यासारख्या पडीक इंटरनेटकरांची....अरे किती ब्लॉगर्स आहेत....द्या त्यांच्याकडे लिहून....मलाच दिला पाहिजे अस ही नाही....शिवाय इंटरनेटवर अनुभव द्यायला आपली हक्काची जागा पण आपल्याला लवकरच मिळणार आहे....बरं का!!! हे लक्षात ठेवा....

अरे बापरे खुप झोंबला का हो ठेचा? नाही झोंबला ना!!!! मला माहीतच होत नाही झोंबणार....आणि ज्याने माझी "साद" ओळखून "अपेक्षीत" तो "प्रतिसाद" दिला आहे...त्याला हा ठेचा नाही झॊंबणार...पण तरीही प्रत्येकाला नावाला ठेचा लागतोच नाही का? तेच तेच गोड...मुळमुळीत रोज कोण खाणार...म्हणून जरा हा झटका....

परेडबद्दल मी लाखो अनुभव लिहीन पण शेवटी परेड ग्राऊंड हे ओसाड आणि परेड डीएमव्ही, डीएमव्ही हे शुष्क, राहणार असतील...तर काय उपयोग ना!....आणि मग ठेचाही फुकट गेला म्हणायचा....असो....ठेचा उपयोगी पडो अथवा फुकट जावो....रेस्क्यु अनुभवाची पोळी तुमच्या घशात मी आणि बापू घालणारच आहोत...आणि ती तुम्ही प्रेमाने खाणार याची मला खात्री आहे....जास्तच झोंबणारे लिहले असेल...तर शंभरदा माफी मागते....कारण "ठेचा देण्याचा" माझा अधिकार नाही. याचे मला भान आहे....पण हा ठेचा मित्र मैत्रीणींना वाटण्याचा अधिकार नक्कीच आहे...कारण तुम्हाला देण्याआधी तो मी खाल्ला आहे...आणि त्याचा मला उपयोग झाला आहे....


तर भेटू रविवारी, रिपोर्टींग टायमिंग ७:३०, ग्राऊंड "साद" ..नक्की या! पण कोरडे नका येऊ....तुमच्या प्रतिसादाची "ढगफूटी" होऊ दे....महापूराची वाट पाहतेय....हरि ओम!! श्री राम.....

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग १
परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग २
परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग ३

Thursday, August 19, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग 3 (PARADE)

हरि ओम

परेडचे दोन भाग सगळ्यांनी आनंदाने वाचले...उत्तम प्रतिसाद ही दिला. यासाठी शतशः श्री राम!!!. प्रत्येकाने मला म्हटलं तू ग्रेट आहेस...सही आहेस...खूप कौतुक केल. धन्यवाद श्रीराम...पण हे सर्व स्वतःचे कौतुक करुन घेण्यासाठी नाही लिहले. तस करायच असत तर याआधी ही हे केल असत. पण माझा तो उद्देश नाही. परेडची जी ओळख मला झाली आणि परेडमुळे माझी जी ओळख झाली ते तुम्हाला सांगायच होत...हे सगळ वाचून एक जरी परेडला याच निष्ठेने जॉईन किंवा रिजॉईन झाला तर हे सगळ लिहण्याचे सार्थक झाले अस मी समजेन. असो...
हा फोटो मी परेड सोडल्यानंतरचा आहे..यामध्ये पहिल्या प्लाटूनमध्ये काही माझ्या बॅचच्यामुली आहेत. दहिना दर्शक म्हणून शर्वरी आहे. संस्थेचा ध्वज धरुन रश्मी मर्चंट आहे.
तर मागच्या भागात १५ ऑगस्टच्या परेडचा अनुभव सांगितला. यानंतर परेडमध्ये आणि परेडमार्फत घेण्यात येणार्या सेवांमध्ये स्वतःला पूर्ण झोकून दिले.
मागच्या दोन भागांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने मी सांगितली की घरातून विरोध होता. पण त्यालाही मीच जबाबदार होते..करीयर वार्यावर सोडून "परेड....परेड" केल तर घरचे विरोध करणार नाही तर काय करणार याची जाणिव परेडमध्येच झाली. कशी? तर एकदा असचं आम्हाला एका सरांनी लेक्चर दिले होते. त्यामध्ये त्यांनी हलकासा उल्लेख केला होता की "अपने करीयर पे भी ध्यान देना चाहिए. सब छोड छाड के परेड के लिए भागोगे तो बापू को अच्छा नही लगेगा" हे वाक्य खूप मनाला लागले...कारण मी नेमके तेच करीत होते.
मी जेव्हा परेडला आले ते बारावी सायन्स "नापास" असा शिक्का घेऊनच. खूप प्रयत्न केला पण माझी गाडी पुढे सरकेनाच..फिजिक्स म्हणजे मला यमदूत वाटायचा...त्यामुळे पुढे शिकायचेच नाही अस ठरवल होत. जेव्हा मला आपल्या चुकीची जाणिव झाली तेव्हा मी जोमाने अभ्यासाला लागले आणि त्यावर्षी बारावी पास झाले. तरी पुढे नवा प्रश्न...आता पुढे काय? खर तर पुढे शिकायची तयारीच नव्हती...पण करीयर केले पाहिजे...नाहीतर बापूंना आवडणार नाही....आणि परेड ला ही विरोध होईल. म्हणून दहावीच्या मार्क्सवर रेल्वेमध्ये बेसिक ट्रेनिंग कोर्सला (बीटीसी) प्रवेश घेतला. दहावीला चांगले टक्के असल्याने मला तिथे सहज प्रवेश मिळाला. तिथे मी इलेक्ट्रीशीयनचा कोर्स करुन पुढे रेल्वेतच जॉब करायच ठरवल. साईड बाय साईड परेड सुरु होती. रेल्वे मधून स्टायपेंड मिळत होता. त्याचा पूरेपूर वापर परेडच्या गरजा भागविण्यासाठी केला.
आता तुम्हाला हे सगळ सांगायची गरज का? असा प्रश्न पडला असेल ना? तर मग ऐका,
बीटीसीमध्ये आम्हाला सगळ काही शिकवल जात होत. तिथे परेड ही शिकविली जात होती. आम्ही सहा मुली होतो..बाकी सगळी मुले होती. महाराष्ट्राच्या कान्याकोपर्यातून या कोर्ससाठी मुले आली होती. आम्हाला २६ जानेवारीसाठी परेडला घेतल होत. सगळ्यांनाच. पण कुणालाही करायची इच्छा नव्हती..मला काय!! मी तर जाम खुशीत होते...कारण आठवड्यातून तीनदा माझी प्रॅक्टीस होणार होती. तिथेही माझी परेड जोरदार सुरु होती. तिथल्या सरांना माझी परेड आणि ऍटीट्युड आवडले. त्यांनी मला त्या बीटीसी प्लाटूनचा कमांडर नेमला. मी नको नको म्हणत असताना देखील. मी नको म्हणायच कारण म्हणजे मला देवाच्या दारात परेड करायची होती. रेल्वेत जरी मी कमांडर असले तरी मला देवाच्या दारातच परेड करायची होती. मग मी कोणत्याही कोपर्यात का असेना!!
सर माझ्याच मागे लागले की तूच व्हायचच कमांडर...मग तेव्हा मी त्यांना सरळ उत्तर दिल...जमणार नाही...कारण ही सांगितल.."ज्या अनिरुद्ध पथकात जाऊन मी परेड शिकले, आणि तुम्ही ज्या माझ्या परेडच कौतुक करत आहात...ती परेड मला या २६ जानेवारीला अनिरुद्ध पथकातूनच करायची आहे..मला माफ करा आणि तूम्ही दुसर्या कोणाची तरी नेमणूक करा. मी नाही येणार." माझ्या या उत्तराने बहुतेक सरांचा इगो हर्ट झाला किंवा आणखीन काही तरी प्रोब्लेम झाला असावा...कारण त्यानंतर मला बीटीसीमध्ये प्रचंड त्रास झाला. त्यावर्षी मी कमांडर झाले असते तर बीटीसीची मी बहुतेक पहिली महिला कमांडर ठरली असते..असो...त्यानंतर मात्र मला प्रचंड त्रास झाला.
पहिले म्हणजे मला त्यांनी इलेक्ट्रीशीयनच्या कोर्सला न घालता एसी वाईंडींगला घातले..दुसरे म्हणजे साफ सफाई तर इतकी करुन घेतली की जर साफ सफाईची ती स्पर्धा असती तर गोल्ड मेडल मिळाले असते मला. माझा कुठलाही जॉब त्यांना पटतच नव्हता. ना फायलिंग, ना वेल्डींग, ना कटींग...शेवटी तिकडचे मित्र मला हे सगळ करुन देत होते. एकदा तर सरांनी मला ते रेल्वेचे अवजड भले मोठे बाबाआझमच्या काळातले पंखे पुसायला सांगितले...एक दोन नव्हेत चांगले २५ होते...त्या दिवशी खरोखर मला रडायला आले आणि मी ठरवल गेली चुलीत रेल्वेची नोकरी..आणि मी बीटीसी सोडून पुढे पदवी शिक्षण घेण्याचे ठरविले. खर तर रेल्वेतील वातावरण माझ्या वृत्तीला पोषक नव्हते...रेल्वे सोडले आणि पुन्हा पुढे काय? हा प्रश्न आला...बापू घेतील पाहून पण मी स्वस्थ बसणार नाही अस ठरवलं...पुढे मी माझे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आणि आज मी माझ एम ए पूर्ण केले..त्याच दरम्यान फोटोग्राफी शिकले...फोटोग्राफी शिकण्याचे देखील परेड मार्फत आयोजित केलेल्या एका प्रदर्शनात क्लिक झाले..आणि प्रिया मिसने मला फोटोग्राफीसाठी मार्गदर्शन केले...ती जिथे शिकली तिथेच मी फोटोग्राफीसाठी ऍडमिशन घेतले...आणि नंतर म्हणजे धम्माल बापूंनी प्रत्यक्षमध्ये घेतले...हे सगळ परेडमुळे शक्य झाल. कारण प्रत्यक्षमध्ये लागले तेव्हा माझ्याकडे साधी पदवीपण नव्हती...फोटोग्राफीचे बेसिक माहिती होती..आणि बरे फोटो काढता येत होते..पुढे सगळ प्रत्यक्षमध्येच शिकले...धन्यवाद बापूंचे आणि सर्व सहकार्यांचे...परेडमध्ये नसते तर इथे पोहचूच शकले नसते...अस मला वाटते...असो...ही झाली पुढची गोष्ट...
त्याआधी म्हणजे रेल्वे सोडून प्रत्यक्षमध्ये लागण्याच्या दरम्यान परेड बोरीवली येथे शिफ्ट झाली होती. वसई - विक्रोळी हा प्रवास कमी झाला. खूप वाईट वाटल...तोडल्यासारख वाटल...पण विस्तार वाढतो तस विभाग करावेच लागतात ना!!! बोरीवलीला प्रिया मिस आणि तृप्ती मिस यांच्या हाताखाली पुढचे परेडचे प्रशिक्षण सुरु झाले...खर तर आम्ही सगळे एकाच बॅचचे...पण त्यांच्या कमांडखाली परेड करायला मज्जा आली. तृप्ती मिसचे शूट आऊट फार आवडायचे मला. कमरेच्यावर पाय जायचा तिचा...तिच्याकडून प्रेरणा घेऊन मी ही त्यासाठी सराव सुरु केला..घरी हाच सराव चालायचा...येथे एक गोष्ट शिकले की आपल्या बरोबरीची मंडळीपुढे गेली की त्यांना प्रोत्साहन द्यायचे आणि ते पुढे गेले म्हणून मनात असूया बाळगायची नाही...बापूंनी सांगितलेले प्रत्येकाची रांग वेगळी आहे...आणि प्रत्येकासाठी त्याने कार्य ठरविलेले आहे. ते बरोबर  आपल्याकडूनच करवून घेणार...याची प्रचिती आली ती म्हणजे पुढे जेव्हा नालासोपारा परेड केंद्राचे मला परेड कमांडर म्हणून नेमले तेव्हा...आणि ही गोष्ट मला पुढच्या आयुष्यात ही उपयोगी ठरली...नालासोपाराला जाणे म्हणजे अजून एक विभाग...वाईट वाटले...आपल्या लोकांना सोडणार....पण काय करणार...आदेश तो आदॆश....
हा आत्ताच्या १५ ऑगस्टचा  (२०१०) फोटो आहे..यामध्ये सर्व माजी परेड डीएमव्ही दिसत आहे..अपर्णा मिस, प्रिया मिस, रश्मी, रुपेश सर, तृप्ती मिस, प्रविण, कुणाल, निलेश हे दिसत आहेत. या सगळ्यांना एकाच फोटोमध्ये पकडण्याची संधी मला मिळाली आणि त्याचा मी पूरेपुर फायदा उठविला.
बोरीवलीला मध्येच दहिसरला परेड व्हायची....मज्जा यायची....येथूनच माझी परेड रेस्क्यु टीममध्ये निवड झाली आणि रेस्क्यु टीममध्ये  निवड झाल्यानंतर जी काय धम्माल केली ती म्हणजे या सर्व अनुभवांचा कळस आहे....
ते  सांगेन पुढील भागात....तुर्तास दहिने से आगे पढ!!!

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग १ (PARADE)

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग २ (PARADE)

 

Wednesday, August 18, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग 2 (PARADE)

हरी ओम,
पहिल्या भागाला सर्वांनी उचलून घेतला. त्यामुळे मलाही आता दुसरा भाग अर्थात पुढची कहाणी कधी सांगतेय अस झालेय. रहावलेच नाही. आणि लगेचच लिहायला सुरुवात केली. पहिल्या भागाला दिलेल्या प्रतिसादानंतर खर तर मला आता काय सांगू ते कळत नाही...कारण श्री राम म्हणण्याखेरीज माझ्याकडे शब्द नाहीत..परेडचा किंवा कुठलाही अनुभव देण्याचे कारण म्हणजे, मी आज पर्यंत जे काही शिकले ते दुसर्यांच्या अनुभवांवरुनच..दुसर्यांच्या (आप्त किंवा परके) आयुष्याचे निरिक्षण करता करता माझ्यावर संस्कार होत गेले. काय घ्यायचे काय वगळायचे ते कळले... आता मला हे ऋण फेडण्याची वेळ आली असल्याचे मी समजते...त्यामुळेच परेडने मला कस घडवलं याची संपूर्ण कथा मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाच टप्पा आहे. काहींना ही कथा काल्पनिक वाटली पण जे मला ओळखतात..ज्यांना मी माहीत आहे...त्यांना या कहाणीची सत्यता पटेल..
परेडच्या बाबतीतले हे झपाटलेलपण लहानपणापासूनच होत..शाळेत असताना स्काऊट गाईडला मला जायच होत. पण केवळ हुशार विद्यार्थ्यांना ती संधी दिली जात होती. अर्थातच मी हुशार नव्हती. त्या मुलांना परेड करताना पाहून मी जाम जळायचे...मला एनसीसीलाही जायचे होते. पण घरातून तेव्हा ही पाठींबा नव्हता.अभ्यास एके अभ्यास करायचा. नसते उद्योग नको. आई बाबांनी शिक्षकांची भेट घॆऊन मी interested असल्याचे सांगितले असते तर कदाचित मी स्काऊट गाईडमध्ये सहभागी झाले असते...पण नाही...चायला माझ नशीबच फुटक...असो...मनात ही गोष्ट दाबून टाकली. आपल्याला हे मिळणार नाही हे पटवले..पण नववीला असताना महाराष्ट्रा कॅडेट कोर्स (MCC) करायला मिळाला. काही नाही निदान हे तरी. यातही माझा performance उत्तम ठरला...मग दहावी नंतर सगळच सुटल.. अकरावीला सायन्सला प्रवेश घेतल्याने पुन्हा कॉलेजमधून मला परेडसाठी नाकारल...दुसर्यांदा हा नकार माझ्या वाट्याला आला होता. शेवटी हे डोक्यातूनच काढून टाकल. बारावीलाच असताना बापूंकडे ओढले गेले...अगदी चिडीच्या पायाला दोर बांधतात ना तसे...
जमेल तस सेवांमध्ये सहभागी होत होते...तेव्हाच AADM ची घोषणा झाली. कधी एकदा मी हा कोर्स करतेय अस झाल होत..कारण एमसीसी करीत असताना लायन्स क्लबतर्फे मी रेस्क्युअर म्हणून काम केले होते..वसईला यंगस्टार या तालुका पातळीवर होणार्या स्पर्धेसांठी मेडीकल काऊंटरला मी प्रथमोपचार देण्यासाठी होते एक वर्ष. हे सगळ पुन्हा करायला मिळणार आणि ते ही बापूंच्या कार्यासाठी म्हणून मी जाम उत्साहीत झाले होते...AADM चा कोर्स झाला आणि स्वतःला त्यात झोकून दिले...आणि मागच्या भागात तुम्हाला सांगितले की परेडला कशी आले ते....
आता तुम्ही म्हणाल हे शाळेतले सगळ मी का सांगितले...कारण हाच माझ्यासाठी सर्वात मोठा अनुभव होता..माझी शाळेतील इच्छा माझ्या बापूंनी पूर्ण केली. मला वाटायच माझ्या आई वडिलांनी मला सैनिक बनवाव...पण त्यांना जे शक्य नाही ते माझ्या बापू आईंनी केल. प्रत्येक इच्छा त्यांनी पूर्ण केली...सैनिक नाही तर  "वानरसैनिक" बनविण्याच्या शाळेत मला घातल. अर्थात परेडमध्ये
माझे पालक म्हणून सर्वच जबाबदारी माझ्या बापूंनी पार पाडली. हे मला आज स्वतःकडे, स्वतःच्या प्रगतीकडे पाहील्यावर कळते. यासाठी मला कधी बापूंची, आईंची वैयक्तिक भेट घ्यावीशी वाटली नाही आणि गरज ही नाही...कारण ते सतत माझ्याबरोबर होते...आहेत...बापूंनी स्वतः चे निर्णय स्वतः घेण्याचे शिकवले...यासाठी लागणारे धाडस प्रवचन आणि श्रीमद पुरुषार्थातून दिले आणि कृती अर्थातच परेडमधून करुन घेतली.

परेड ही माझी कार्यशाळा ठरली. केवळ परेडचे शिक्षणच नाही...तर व्यक्तीमत्त्व विकास देखिल परेडने घडविला..पुढच्या आयुष्यात ज्या संकटांना किंवा ज्या परस्थितीला सामोरे जावे लागणार होते त्याची जाणीव अथवा त्यासाठीची तयारी परेडमध्ये बापूंनी करुन घेतली. पुढे पुढे कळेलच ते...


पहिल्यांदा १५ ऑगस्टसाठी हॅपी होमला परेड होणार होती. यासाठीच माझी "अल्फा" प्लाटूनमध्ये निवड झाली होती. हॅपी होमच्या एका गेट पासून सुरु होऊन सध्याच्या गुरुक्षेत्रमच्या गेटमधून आम्ही बाहेर पडणार होतो. हा अनुभव थरारक होता..कारण देवाच्या दारात हा पहिलाच अनुभव...तेव्हा नेमक कोण आल होत झेंडावंदनाला हे आठवत नाही...पण जो रुबाब होता ना! परेडचा तो सॉलिडच होता. सगळे ज्या नजरेने आमच्याकडे पाहत होते त्यामुळे सहीच वाटत होते..इतका आदर मी त्याआधी कधीच अनुभवला नव्हता..तेव्हा मला कळल की हा आदर माझा नाही तर मी घातलेल्या परेड युनिफॉर्मचा आहे....त्या दिवशी त्या परेड युनिफॉर्मचे देखिल महत्त्व कळले..आणि ज्या आदराने तो चढविला त्याच आदराने तो घरी गेल्यावर उतरवून ठेवला. इतर कपडे इतस्त पसरले असतील, फेकले असतील...पण परेडचा युनिफॉर्म नाही...कधीच नाही...ती बॅरे...तो स्कार्फ आजही जपून ठेवला आहे..आणि तो प्रत्येक वेळी हातात घेताना परेडची तीन वर्षे डोळ्यासमोरुन झपकन जातात. जेव्हा कुणी या युनिफॉर्मचा अपमान करतात...कॊणत्याही पद्धतीने त्यावेळी माझी डोक्यात सणक जाते...जॊ परेडच्या गणवेशाचा मान ठेवू शकत नाही त्याला परेड कधीच आपलं म्हणू शकणार नाही...मी परेडला स्वीकारण्या पेक्षा मला परेडने स्वीकारण जास्त महत्त्वाच आहे...कारण तेव्हाच माझी प्रगती होऊ शकते अन्यथा मी परेडला आलो आणि गेलो...प्रगती शून्य...
तर असो, 
दुसर्या १५ ऑगस्टला नंदाई झेंडावंदनाला आली होती. तीला पाहण्यासाठी आमची चलबीचल सुरु होती. पण कस पाहणार..परेडची शिस्त मोडू शकत नव्हतो. डोळ्यांच्या कोन्यातून देखील पाहायच नव्हत. आईला पाहयच नाही..नाही म्हणजे नाही...नजर स्थिरच ठेवायची. नाकासमोर..अस ठरवल.
त्यावेळी मी दुसर्या प्लाटूनमध्ये होते...बहुतेक आधी मुलांचा प्लाटून होता. त्यामुळे आम्ही ध्वजस्तंभापासून खूप मागे येणार होतो..पण गम्मत अशी झाली की मुलांचा प्लाटून थोडा पुढे सरकला आणि आमचा प्लाटून पुढे आला..आमच्या प्लाटूनच्या पहिल्या दोन फाईल आणि मुलांच्या प्लाटूनच्या शेवटच्या दोन फाईल ह्या हॅपी होमच्या गेट समोर आल्या....गेट वर नंदाई उभी होती...अगदी माझ्या नाकासमोर,,,जिथे मी नजर स्थिर केलेली तिथेच...या सारख ग्रेट काहीच नव्हत...पूर्ण झेंडावंदन आणि प्रतिद्न्येला मी सरळ थेट म्हणजे माझ्या आईकडेच पाहत होती....(आईला पाहायची इच्छा आईनेच पूर्ण करुन घेतली तेही अगदी परेडच्या शिस्तीच्या चौकटीत...आई तू ग्रेट आहेस)
त्यात सगळ्यात भन्नाट होती ती प्रतिद्न्या...भारतमातेची प्रतिद्न्या घेताना साक्षात जगदमाता माझ्या समोर होती. या प्रतिद्न्येच्या शब्दाबरोबर तिच्या चेहर्याचे बदलत जाणारे भाव मी कधीच विसरु शकत नाही..जेव्हा जेव्हा मी ती प्रतिद्न्या ऐकते तेव्हा मला तीच्या चेहर्यावरचे भाव आठवतात..
प्रतिद्न्येला सुरुवात होते....प्रतिद्न्येतील स्वातंत्र्यपुत्रांनी केलेल्या बलिदानाचा उल्लेख होताच आईच्या चेहर्याचे भाव बदलले...दुःख तसच अभिमान एकाच वेळी तिच्या चेहर्यावर दिसत होता. परकीय शक्तींच्या अत्याचाराचा उल्लेख होताच आईचा चेहरा सात्वीक रागामुळे लालेलाल झालेला दिसला. इतक चिडलेल तिला नव्हत पाहिलेल कधी...शेवटी तिच्या या छोट्या बाळांनी सदैव भारतमातेच्या रक्षणासाठी सशक्त होण्याची शपथ घेतल्यावर कधी पाहिले नव्हते इतके समाधान तिच्या चेहर्यावर होते....
हे सर्व होताना डोळे भरुन आले होते....ऊर भरुन आला होता...पण परेडची शिस्त मोडायची नाही म्हणुन त्यावेळी स्वतःवर बंधने ठेवली. मात्र परेडचे विसर्जन झाल्यानंतर मी स्वतःचे अश्रु आवरु शकले नाही....आणि पुन्हा एकदा शपथ घेतली....माझे कर्म, धर्म आणि मर्म हे इथेच, याच तुझ्या चरणांशीच पूर्ण करणार. माझ जगण देखिल हे तुझ्याच साठी आणि मरणं देखिल तुझ्याचसाठी....आयुष्याची दिशा तूच ठरवायची....चालण्याचे काम माझे.....आणि त्यामुळे मी आज जे काय आहे ती अशी आहे....तुमच्यासमोर आहे..यात माझे काहीही नाही....आहे ती फक्त इच्छा जी बापू आई दादांनी पूर्ण केली...आणि पुढेही करणार हा माझा ठाम विश्वास आहे...मी वानरसैनिक बनणारच...कारण ही त्यांची इच्छा आहे. श्रीराम....
तुर्तास विसर्जन....पुढच रिपोर्टींग लवकरच...
परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग १ (PARADE)


Tuesday, August 17, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग १ (PARADE)

हरी ओम,
यंदाच्या १५ ऑगस्टला परेडच्या म्हणजेच अनिरुद्ध पथक परेडच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हाच ठरवल परेड पासून, परेडमुळेच प्रगतीच्या दिशेने झालेला माझा प्रवास तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा..या परेडसाठी मी किती काय केले? या पेक्षा या परेडने मला भरपूर काही दिले. आणि ते काय? ते सगळ तुम्हाला सांगणार आहे. जितकं आठवेल तितकं...


मला वाटत २००३ मध्ये मी परेडला सुरुवात केली. विक्रोळीच्या विकास हायस्कूल येथे चालायची ना तेव्हा पासून..या परेड बाबत मला कळले ते आमच्या सेंटरवरील दोन मुलांकडून. ते न दर रविवार सकाळी कुठ तरी जायचे. त्यासाठी शनिवारी त्यांच्या हळूच गप्पा चालायच्या..मला तेव्हा जाणवले हे काही तरी शिकायला जात आहेत...मी त्यांना खोदून खोदून विचारले पण ते सांगायला तयारच होईना.  मी ही त्यांच्या मागे हात धूवून लागली. शेवटी मला कंटाळून त्यांनी मला सांगितले की आम्ही परेडला जातो. मी त्यांना म्हटले की मी पण येणार. तर चक्क त्यांनी मला सांगितले, "रेश्मा तूला नाही झेपणार" मला राग आला. 
विक्रोळीला कुठ? काय? काहीच माहित नव्हत. कसा बसा पत्ता मिळवून मी परेड ग्राऊंड पोहोचले. तिथे भरपूर मुल मुली होते. सगळे ऐटीत होते. मी पण त्यांच्यात गेले. मला नवीन मुलींच्या पथकात ठेवण्यात आले आणि सरावाला सुरुवात झाली.
पहिल्याच दिवशीचा सराव करुन माझी हालत खराब. पूर्ण वाट. कारण ते खरच झेपणार नव्हत. पण खूप सही होत हे सैनिकी शिक्षण. दुसर्या रविवारी माझी दांडी झाली. घाबरले होते म्हणून नाही. तर सकाळची उठण्याची सवय नव्हती. तिसर्या रविवारी जाण्यासाठी मी रात्रभर झोपलेच नाही..कारण झॊपले तर सकाळी वेळेवर उठेन याची शाश्वती नव्हती..आणि मला कुणी उठवणार ही नव्हत...कुणी नाश्तापण देणार नव्हत...कारण ह्या सगळ्याला माझ्या घरातून विरोध होता. जेम तेम चहा आणि चार बिस्कीट कोंबून मी परेडला गेले. तिसर्या दिवशी परेड ग्राऊंडवर मला सराव करतान चक्कर आली. 
मला वाटल चक्कर आली तर कुणी सहानभूती दाखवतील. पण छे! पाणी प्यायला लावून  बांगर सरांनी मला चांगलाच दम भरला. "अभी फिरसे चक्कर आयी तो ग्राऊंड के चक्कर मारने पडगे..समझे" बापरे!!! बांगर सरची ती ताकीद ऐकून तेव्हा पासून परेडला असेपर्यंत कधीच चक्कर आली नाही. चक्कर पण घाबरली. कित्येकदा (नेहमीच) उपाशी पोटी परेडला जायचे. पण कधीच चक्कर आली नाही.  अशा रितीने मी परेडला नियमित जाऊ लागली.
मला पहाटे उठण्याची सवय नव्हती. परेडमुळे ती सवय लागली. सकाळी ७ वाजता परेडचे रिपोर्टींग करण्यासाठी मला सकाळी ४ वाजता उठावे लागत असे आणि पहाटे ५ ची वसईवरुन गाडी पकडून विक्रोळीला जात असे.
सुरुवातीच्या काळात मी काहीच कमवत नसल्याने माझ्याकडे परेडला जायला पैसे नसायचे..मग मी हे पैसे खूप झोल करुन जमवायचे..कारण घरुन विरोध होता. आजी द्यायची नाहीतर आई बाबांना खोट काय पण सांगून मिळवायचे...महिन्याला मिळणार्या पॉकेटमनी वाचवून त्याचा वापर करायची. कित्येक वेळेला एक फुटकी कवडीपण नसायची. तेव्हा विथ आऊट तिकीट विक्रोळी ला जाण्याचे धाडस केले होते..तेव्हा टीसी मला यमदूत वाटत असे...हे सगळ करताना वाईट वाटायच..हे चूकीच आहे...हे माहीत असायच...पण परेड शिवाय दुसर काही एक महत्त्वाच नव्हत मला. चूक केली की बापूंची माफी मागून या परिस्थीतीतून मला बाहेर काढ आणि विनासायास माझी परेड सुरु राहू देत अशी प्रार्थना करायची. त्याप्रमाणे बापूंनी माझी सोय ही केली. आपल्या साई समर्थ कॉस्मेटीक प्रोडक्सची एजन्सी घेतली आणि ते प्रोडक्स विकून जे काही कमिशन मिळत होत त्याचा वापर परेड आणि त्या तर्फे होणार्या सेवांसाठी केला. याच कमिशनमधून मला परेडचा युनिफॉर्म तयार करता आला..माझी उत्तम सोय बापूंनी केली...आता झोल करुन नाही तर स्वतःच्या मेहनतीने आणि त्याच्या आशीर्वादाने परेडमध्ये मी सहभागी झाले.
पैशाचे टेंशन बापूंनी घालविल्याने मुक्तपणे मी परेडमध्ये स्वतःला झोकून दिल. अगदी थोड्याच दिवसात माझी निवड त्यावेळेच्या बेस्ट असणार्या "अल्फा" प्लाटूनमध्ये झाली. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता. कारण नव्याने आलेल्या फार कमी मुली या प्लाटूनमध्ये होत्या. अपर्णा मिस तेव्हा कमांडर होती. ती तितकीच कडक आणि प्रेमळ होती. ती शिक्षा पण करायची आणि समजवून तरी सांगायची...
तेव्हा एक गोष्ट घडली...
माझे पाय परेड करताना गुडघ्यात वाकायचे...किती प्रयत्न केला तरी जमत नव्हते...तेव्हा तिथे जे सर होते त्यांनी अपर्णा मिसला माझ्या पायावर फटके मारायला सांगितले...तिने हळू मारले...तर तिला पण सर ओरडले...तरी मला जमेना...शेवटी ते सर मला म्हणाले, " ये लकडी तेरे घुटने पे बांधूगा...फीर जो परेड करते वक्त दर्द होगा ना वो महसूस करने के बाद ही तूम सिखोगी"  मी घाबरले..पण त्यांनी काय अस केल नाही..
मी म्हटल, " जमेगा सर"...त्यानंतर तो आठवडा मी घरी गुढग्याला मागे (पोटरी) आणि पूढे लाकडी पट्टी बांधून सराव केला.
खूप लागल...पण जमल बाबा एकदाच...पुढच्या रविवारी सरांनी मला फॉल आऊट व्हायला सांगितल आणि बहुत अच्छा परेड हुआ असे कौतुक ही केल...मला खुप बरं वाटल...त्यानंतर माझी परेड सुधरत गेली. फक्त परेडच नाही तर मी देखिल सुधरत गेले...ते कसे ते पुढच्या भागात पाहू...तूर्तास विसर्जन......
हरी ओम