Tuesday, November 23, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग शेवटचा (LAST PART)

हरि ॐ
अनिरुद्ध पथक सावधान....अनिरुद्ध पथक बाये से तेज चल........
चिफ परेड कंन्सलटण्ट बांगर सर यांनी ही कमांड दिली...आणि घोषपथकाने व सर्व परेड डीएमव्ही ठेका धरला...एक दो एक....तेज चल करीत स्टेजच्या उजवीकडून डावीकडे परेड सुरु झाली. स्टेजवर बापू उभे होते...तिरंगा आणि संस्थेचा ध्वज घेऊन पहिले परेड डीएमव्ही पुढे आल्याबरोबर बापूंनी सलामी दिली...नंतर मागाहून येणार्या प्रत्येक प्लाटूनने बापूंना सलामी दिली...

आम्ही सलामी देताना आणि बापू सलामी स्विकारतानाचे चित्र......हेच परेडचे शिखर...

ह्यावेळी काय वाटत हे तिथे परेड केल्याशिवाय खरच कळणार नाही...पण बापूंना त्यांच्या चिल्ल्यापिल्यांना सलामी देताना नक्कीच अभिमानाने उर भरुन येत असणार...बापूंना सलामी देताना पाहून परेड डीएमव्ही म्हणून माझ्यावर त्याने सोपविलेल्या जबाबदारीची जाणिव झाली...किती विश्वास ठेवतोय बापू माझ्यावर...किती कौतुक करतोय हा बापूराया माझ....अस वाटत..आणि सहज मनातून एकच शब्द उमटतो श्री राम!! आणि पुढचा प्रवास सुरु होतो....

सुमारे ८०० हून अधिक परेड डीएमव्ही एका तालात परेड करीत होते...ही परेड पाहताना...अनेकांचे डोळे भरुन आले....अंगावर शहारे आले...ही परेड कशी झाली हे खरच मी नाही सांगू शकत...कारण त्या परेडचा मी एक भाग होते...ज्यांनी ती पाहिली ते खूप चांगले सांगू शकतात...माझ्यासाठी ही परेड म्हणजे अविस्मरणीय सोहळा होता....या पलिकडे मी काही सांगू शकत नाही....

मला सांगायला खुप आनंद होतोय की अखेर परेड एक अविस्मरणीय अनुभव हा या अनिरुद्ध पौर्णिमेच्या परेड अनुभवापाशी "थांब"तोय...खर तर आता जो काय परेडचा अनुभव आहे तो शब्दांपलिकडचा आहे...आणि खर सांगू मला आता फार रिकामे रिकामे वाटतेय...आणि खूप बरे वाटत आहे...त्यामुळे आता या पूढे मी तुम्हाला पिडणार नाही....
BACK IN ACTION

परेड अविस्मरणीय अनुभवांची मालिका निरोप घेत आहे...काय करणार जे काही अनुभवले ते सर्व तुम्हाला सांगितले....आता माझा परेडचा नव्याने प्रवास सुरु झालाय...आता नवीन अनुभव येणार....त्यामुळे अनुभव म्हणून लिहण्यासारखे माझ्याकडे काही उरलेले नाही...

पण एक गोष्ट नक्कीच आहे.....मला समजलेली अनिरुद्ध परेड....आणि यापूढे मी तुमच्याशी हीच समज शेअर करणार आहे....पण त्याआधी....यंदा काही परेड डीएमव्हींनी माझे लक्ष वेधून घेतले..त्यांच्याबद्द्ल मीपुढील भागात माहीती देणार आहे....सो...जस्ट वेट..फॉर दी नेक्ट

5 comments:

swapnilsinh said...

Hari Om Reshmaveera

परेड - अविस्मरणीय अनुभव all parts were awesome, superb.

Keep it up.

veerangana said...

हरी ओम
'शेवटचा भाग' हे शब्द काही रुचले नाहीत. हवे तर end of season 1 असे म्हण कारण ह्या अनिरुद्ध पौर्णिमेला आणि त्या पुढे परेड ची घोडदौड सुरु होणार आहे त्या बद्दल आम्हाला नक्कीच तुझ्या कडून ऐकायला आवडेल. आणि तेव्हा त्यात जरा सुद्धा तुला भाग घ्यायला नाही मिळाला हा विषाद नसेल कारण तू आता एक active dmv म्हणून परेड मध्ये असणार आहेस आणि ते अनुभव, त्यातल्या गोष्टी ह्या एकदम live from ground असतील. तेव्हा waiting again for season 2 .

veerangana said...

हरी ओम
'शेवटचा भाग' हे शब्द काही रुचले नाहीत. हवे तर end of season 1 असे म्हण कारण ह्या अनिरुद्ध पौर्णिमेला आणि त्या पुढे परेड ची घोडदौड सुरु होणार आहे त्या बद्दल आम्हाला नक्कीच तुझ्या कडून ऐकायला आवडेल. आणि तेव्हा त्यात जरा सुद्धा तुला भाग घ्यायला नाही मिळाला हा विषाद नसेल कारण तू आता एक active dmv म्हणून परेड मध्ये असणार आहेस आणि ते अनुभव, त्यातल्या गोष्टी ह्या एकदम live from ground असतील. तेव्हा waiting again for season 2 .

Gauri Kulkarni said...

hari om...
excellent job dear...i missed baapa's utsav this year..but after reading this i cud really imagine and feel it the way we used to experience this moment every year.....
shri ram..

Varsha said...

hari om reshma,
khup chhan anubhav aahe tuza. agdi manala sparshch karun gela. asech chhan chhan anushav share kar. keep it up!
hari om