Tuesday, March 8, 2016

वाटे रणांगणी जावे - सुचिता कोंडस्कर


जेव्हा समज आली तेव्हापासून आतापर्यंत खूप लाडाने वाढले. लहान असताना नवीन पैंजण आणली कि ती घालून छुम छुम आवाज करत घरभर नाचताना मला स्वताला होणार आनंद व ते पाहून घरातील इतरांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात वर्णन न करता येणारा. सना-समारंभाला ते नटन सजन त्यातील मज्जा तर औरच. त्यात आपण सुंदर दिसतोय अशी दाद मिळाली तर वरणभातावर सोनखडाच. बाबांच्या खांद्यावरून उतरून जसा दादाचा हाथ पकडायचा म्हणजेच एकंदरीत सुरक्षित आयुष्य जगात आले वेळोवेळी मिळणाऱ्या संव्रक्षनामुळे सगळा मस्त चालू होत....पण ....

पण आज अचनक रोज मस्त मस्त परीचे ड्रेस देणार्र्या आईने आज मला कराटेचा ड्रेस आणून दिला आणि म्हणाली माझ्या मातेप्रमाणे तुला सगळ्या प्रकारचे श्रुंगार करायला शिकवले पण तिच्यासारखा तुझ्या हातात शस्त्र देऊन तुला लढायला शिकवायचं राहून गेल....

ऐकून खूप नवल वाटत होत आज आईच्या बोलण्याचा रोख काही वेगळाच होता रोज मायेने प्रेमाने लाड करणारी आई आज मला कठोर बनताना दिसली. तीच प्रत्येक वाक्य तिला होणारया वेदनांचा प्रतिनिधित्व करत होत. आई समजाऊ लागली मला... जिथे सृष्टीची निर्मिती करून महिषासुर सारख्या असुरांचा नाश करून आपल्या बाळांच सवरक्षण करणाऱ्या दुर्गा मातेबद्दल माझ्या मोठ्या आईबद्दल हे दुष्ठ दुर्जन जे असत्य बोलून तिचा अपमान करीत आहेत त्यांचा संव्हार करण्यासाठी स्त्री शक्तीला सक्षम व्हायची गरज आहे बाळा. मी माझ्या लेकीपासून सुरवात करते आहे तुही पुढे हाच वारसा चालवायचा आहे...

आईचे शब्द ऐकून कोणीतरी मध्यरात्री साखर झोपेतून दचकून उठवावे तस झाल आणि मनात विचारचक्र सुरु झाल. माझ पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल तरी कधी असुरक्षिततेची जाणीव झाली नव्हती आणि आज अचानक मला सक्षम बनायचं आहे हि जाणीव मनात घर करून गेली.

आज महिला दिनाचे औचित्य साधून मी माझ्या सर्व सख्यांना विनंती करीत आहे कि आता वेळ आली आहे शास्त्र हातात घेऊन युद्धकला शिकण्याची. आताच्या काळातील युद्ध हे तलवारीवर अवलंबून नसून काळ बदल तसा शस्त्र पण बदलली आहेत. आजच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात कॉम्पुटर शिकून whatsapp, facebook, twitter सारक्या social media चा वापर करायला शिकणं हि काळाची गरज बनली आहे. अहिल्याबाई होळकर यांनी जसा पुढाकार घेऊन स्त्रीशिक्षणासाठी घराबाहेर पाऊल टाकले तसेच आपल्यालाही आज आपल्या सख्यांना ज्यांना कॉम्पुटर वापरता येत नाही त्यांना तो शिकवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

जेव्हा JNU च्या विध्यार्थ्यानी माझ्या दुर्गा मातेचा, माझ्या भारत मातेचा अपमान केला व आजही करीत आहेत अश्या दुष्ट दुर्जनांचा नाश करण्यासाठी मला निषेध हा व्यक्त केलाच पाहिजे. आज माझ्या मातेबद्दलच वाईट बोलणं आपण ऐकून गप्प बसलो तर उद्या आपण सुरक्षित असू का ???

आज खरच प्रत्येक स्त्रीस जिजाऊला शिवबाला जन्म देताना जसे डोहाळे लागले होते तस झाल पाहिजे.

वाटे रणांगणी जावे, व्हावे सिंव्हावारी रूढ
करावा दुष्टांचा संव्हार असुरांचा दुर्गेपरी
गड जिंकुनी बैसावे सिंव्हासनी अंबेपरी

मी अबला नसून सबला आहे हे जगाला पटवुन द्यायची वेळ आली आहे. सख्यानो जागे व्हा आणि स्वतःमधील आत्मविश्वास जागवा मी त्या दुर्गा मातेची लेक आहे माझी आई सर्वसमर्थ सर्वार्थ समर्थ आहे.
जय जगदंब जय दुर्गे
- सुचिता कोंडस्कर.

3 comments:

Unknown said...

सुचीताविरा सुपर्ब लेखनशैली ...सहज सुंदर मांडणी ..उज्ज्वल भवितव्य आहे तुमच .waiting to see more .अम्बज्ञ
ambadnya रेश्मावीरा तुमच्या ताटातला हा सुंदर पदार्थ भावला

pranil takale said...

"वाटे रणांगणी जावे...." खूप सुंदर लेख रचना. खरचं खूप कौतुक करावसं वाटतं की काही स्त्रिया अजून Technology चा वापर करण्यास कचरत आहेत.पण त्यांना त्यांच्या कलेने आणि सामंजस्याने शिकवले तर त्या नक्कीच शुकतात.हे माझ्या घरचे माझ्या आईचे उदाहरण मी आज ताठ मानेने सांगू शकतो. सुचिताजी... खूप खूप धन्यवाद सर्व स्त्रियांना ह्या लेखाद्वारे प्रोत्साहन दिल्याबद्दल.
महिलादिनाच्या शुभेच्छा...

Unknown said...

रेश्मावीरा आपल्या ब्लॉगवरचा "वाटे रणांगणी जावे " हा सुचिता कोंडस्कर ह्यांचा लेख अतिशय हृदयस्पर्शी आहे. खरेच आज आई-बाबा, भाऊ आणि आप्त कुटूंबीयांच्या पंखाखाली वावरणार्‍या मुलीला , पुढे होऊ घातलेल्या स्त्रीला कालानुरूप सबल आणि सक्षम करणे ही काळाची नितांत गरज आहे हे सुचिता ह्यांनी अत्यंत प्रभावीरीत्या निदर्शनास आणले आहे.
दुष्टांचा , असुरांचा संहार करण्यासाठी समस्त स्त्रियांना आदिमाता दुर्गेचे "महिषासुरमर्दिनी" रूप हा खूप मोठा आदर्श आणि प्रेरणास्थानच आहे हे निर्विवाद सत्य आहे.
सुचिता आपल्या अप्रतिम लेखाबद्दल मन:पूर्वक कौतुक!