Tuesday, March 8, 2016

महिला दिन दुर्गेच्या स्मरणाशिवाय नाहीच - हेमा अष्टपुत्रे

 
या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता
नमतस्यै नमतस्यै नमतस्यै नमो: नमः॥
 
अशा या मातृरुपातील मोठ्या आईला नमस्कार. हिची अनेक रुपे आहेत. त्या आदिमातेची श्क्तीही अफाट आहे. श्रद्धावानांसाठी हिचे रुप सुंदर आहे. तर असूरशक्तींसाठी तिचे रुप भयंकर आहे. तिची अनेक रुपे आहेत. पण मूळ रुप महिषासूरमर्दिनी आहे. आजच्या महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री, आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, व त्याही पेक्षा एक पाऊल पुढेच आहे. यशाच्या शिखरावर आहे.

सरस्वतीदेवीच्या वीणेतूनच हे स्वर व व्यंजन बाहेर पडले आणि त्यातूनच शब्द. शब्दांमध्ये देवीच वर्णन करण व तरीही ती शब्दातीत ही सुंदर गोष्ट आहे. 
वन्दे सरस्वती ’देवी’ वीणा पुस्तकधारिणीम। 
पद्‍मासनां शुभ्रवस्त्रां कलाविद्या प्रदायिनीम॥ 
सरस्वती देवीला वन्दन असो, जिच्या एका हातामध्ये वीणा व दुसर्‍या हातामधे पुस्तक आहे. कमलासनावर विराजमान असणारी, शुभ्रवस्त्र परिधान करणारी, चौसष्ट कला व विद्या प्रदान करणारी आहे.
आज तिच्या कृपेने मानव ज्ञानी होऊ शकतो.

सरस्वतीयं विद्यानां देवता ज्ञानदायिनी।
अस्या वरदहस्तेन ज्ञानवान खलु मानवाः॥
 
ही सरस्वती विद्येची देवता आहे. ज्ञानदान करणारी आहे. तिच्या आशीर्वादरुपी हाताने मानव ज्ञानी होतो.
आजची स्त्री ही सहनशील आहेच पण वेळ आली तर कठोर आहे. एक स्त्री माता, भगिनी, कन्या, पत्नी अशा अनेक भूमिका उत्त्मरितीने संभाळते. हे सामर्थ्य तिला आदिमातेकडूनच मिळाले आहे. पण आज स्त्रीभृणहत्येचा स्वरुप वाढत चाललय. एक स्त्री, मुलीला जन्म देते व कळल्यावर ती नाखूष होते. हे कस काय? या महिलादिनाच्या दिवशी सर्वांनी मिळून या स्त्रीभृण हत्येचा प्रकर्षाने निषेध करायला हवा. 

कालच ’हवा येऊ द्या’ कार्यक्रमात मधुरा वेलणकर म्हणतात, जेव्हा एखादी स्त्री ’मुलगीच झाली का?’ ’तिन्ही मुलीच का?’ असे विचारते तेव्हा ते विचारणे स्त्री थांबवेल तेव्हाच खरी सुरुवात होईल. डॉ. निलेश साबळे म्हणाले, ’स्त्री एक पाऊल पुरुषांपेक्षा पुढेच आहे’ हे मान्य कराव लागेल. अभिमान वाटला ऐकून. स्त्रियाच स्त्रियांच खच्चीकरण करत आहेत. ही परिस्थिती बदलायलाच हवी. 

स्त्रियांमध्ये असलेल्या गुणांचा आदर सर्वांनी केला पाहिजे. स्त्रियांनीच स्त्रियांना हिनपणे लेखणे बंद केले पाहिजे. समाज व राष्ट्र यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या ह्या स्त्रिया आदर्श आहेत. आपल्या सर्वांना ताकद ही दुर्गा प्रदान करत आहे. जयन्ती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा, स्वधा अशा विविध रुपांनी नटलेल्या तुला माझा नमस्कार. तुझा महिमा अगाध आहे. तूच आम्हाला सामर्थ्य बहाल करत आहेत. आम्हाला सदैव तुझ्या चरणांशीच रहायचे आहे. 
दुर्गे तुझा जर कोणी अपमान केला ते सहन होणार नाही. त्यासाठी विरोध करणारच. कारण तुझा अपमान हा समस्त स्त्रियांचा अपमान आहे.

- हेमा अष्टपुत्रे

1 comment:

Unknown said...

रेश्मावीरा आपल्या ब्लॉगवरचा हेमा अष्टपुत्रे ह्यांचा "महिला दिन दुर्गेच्या स्मरणाशिवाय नाहीच" का लेख खूप आवडला. हेमा अष्टपुत्रेंनी मांडलेला अभिप्राय- " दुर्गे तुझा जर कोणी अपमान केला ते सहन होणार नाही. त्यासाठी विरोध करणारच. कारण तुझा अपमान हा समस्त स्त्रियांचा अपमान आहे." अगदी मनापासून भावला. आमच्या आईचा, जगज्जननी माता दुर्गेचा अपमान हा अखिल नारी वर्गाचा, महिलांचाच अपमान आहे आणि आमच्या मातेचा अपमान आम्ही तिच्या लेकी कधीच खपवून घेणार नाही.