Thursday, July 29, 2010

TEJASVINI - खुप काही शिकण्यासारखे

कोमल सातोसे या "तेजस्विनी"ची यशोगाथा...

tejasvini_m                                                                   

Tuesday, July 27, 2010

हृदयात कोरली गेलेली गुरुपौर्णिमा २०१०

अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो!!!! याची पूर्ण अनुभूती गुरुपौर्णिमेला आली...२०१० ही गुरुपौर्णिमा कायमची हृदयात कोरली गेली आहे. केवळ बापू आई दादांचे सुरेख दर्शनच नाही. तर अनेक धडे शिकविणारी ही गुरुपौर्णिमा होती. खरं तरं गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुला गुरु दक्षिणा देण्याचा दिवस...पण या दिवशी बापूंनीच इतक भरभरून प्रेम दिले तर त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी आपण पूर्णपणे असमर्थ असल्याचे प्रकर्षाने जाणवले..तो भरभरुन देत असलेले प्रेम स्विकारण्या खेरीज मला तरी दुसरे काही जमले नाही..काय वर्णू देवाचा सोहळा...शब्दच नाही...पण नाही...आज कुठून कुठून शब्द शोधून बापूंचे प्रेम मांडण्याचा प्रयास करणारच आहे..हो पण ते कितपत जमेल ह्याची सुद्धा मला शंका वाटतेय...असो

गुरुपौर्णिमेला मला फोटोग्राफीची सेवा दिली होती. हे ऐकूनच माझी धडधड वाढली होती आणि चिक्कार आनंद ही झाला होता...म्हणतात ना!!! आनंद पोटात माझ्या माईना!! अशी परिस्थिती झाली होती माझी..रात्रीपासून बापू आई दादांचे असे फोटो काढायचे..तसे फोटो काढायचे अश्या बर्याच योजना बनविल्या. या विचारांनी रात्रीची झोप सुद्धा घाबरली असावी...कारण आलीच नाही ती माझ्यापाशी...सकाळी धावपळ करुन तेरापंथला पोहोचले..
कॅमेरा आणि इतर सगळ साहित्य घेऊन मी तयार होते..फक्त बापूंची वाट पाहत होते...पण बापू येण्याची वेळ जस जशी जवळ येत होती..तस तशी धडधड अधिकच वाढत होती..त्यात भिती ही वाटत होती की आता आपला कॅमेरा आपल्याला दगा देणार..या आधी ही त्याने दगा दिलेला आहे...पण आज काय होईल त्याचा अंदाज नाही...त्यात उत्सवाला फोटो काढण्याची पहिलीच वेळ...

आला रे हरी आला रे चा गजर सुरु झाला....आता पर्यंत कधी बापूंचे औक्षण ही नीट न पाहिलेले नव्हते. काय करतात ते सुद्धा माहित नव्हते...आणि आज मात्र थेट फोटो काढायला! जरा गांगरुनच गेले मी...आई मोठ्या गाडीतून उतरली..ती उतरतानाच कॅमेर्याच्या बटनावर बोट ठेवले आणि सुरुवात तीचे एक एक एक्सप्रेशन पकडायला......आहा हा!!! शेवटी एक छान लुक दिला आईने...आणि बरोबर तो लुक कॅमेरात कॅच झाला...तिचीच कृपा..
मग औक्षणाचे फोटो काढले.. धिमी पावले टाकीत येता....असचं मस्त बापू हळू हळू भक्तांना आशीर्वाद देत बापू आई दादा पुढे निघाले. बापू पायर्यांनी वर आले तर आई लिफ्टने वर आली..पहिल्या मजल्यावर हॉलच्या बाहेर बापू आईसाठी थांबले. मग आई आल्यावर ते पुढे चालू लागले. बापू पुढे..आई मागे...त्यामागे दादा..हॉलमध्ये हरी ओम बापूंचा जयघोष आणि दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी...आणि औक्षण..

आत्तापर्यंत भलेभले इव्हेंटस शिताफीने कव्हर केले मी....पण बापूचे फोटो काढताना वाट लागली होती...धडधड थांबायलाच मागत नव्हती..असो..मग बापू स्टेजवर गेले...स्टेजवर चढताना बाप्पाने आईचा हात पकडला...आई ग!! हा क्षण पकडायचा होता मला...आणि कॅमेराच बंद झाला...पोपट झाला माझा...बापू आईकडे हताशपणे पाहण्याखेरीज मी काही करु शकले नाही.

असो मग पुढचे फोटो काढायला लागले..काय बापूंचे एक्सप्रेशन...मस्त मस्त मस्त...अनिरुद्ध चलिसा सुरु झाली...बापू डोळे बंद करुन शांत बसले होते..तेव्हा त्यांचे एक दोन फोटो काढले..मग दादांचे काढले आणि आईचे पण...फोटो काढून झाल्यावर आईने मस्त पाहिले माझ्याकडे...पाहतच होती...ती माझ्या कडे आणि मी तिच्याकडे...कितीवेळ माहित नाही...जणू तिच्या नजरेने माझी नजर धरुन ठेवली....शेवटी मला तिचे तेज सहन झाले नाही आणि मी मान खाली घातली. यावेळी ती फक्त पाहत होती..चेहर्यावरचे भाव काहीच कळत नव्हते...ती रागावलेली आहे की प्रेमाने पाहतेय...काहीच कळत नव्हते...ती फक्त पाहत होती...त्यानंतर माझ्या काळजातली धडधड थांबली.
त्यानंतर पुन्हा एकदा आईने पाहीले मात्र यावेळी ती गोड हसली माझ्याकडे बघून..जणू जुनी ओळख आहे..मज्जाच वाटली मला.
मग बापूंनी ही माझ्याकडे पाहिल आणि मस्त हसले..
मग माझी धडधड जाऊन धडाधड फोटो काढण्याचे काम सुरु झाले..
भक्तांची रांग सुरु झाली.. अनेक भक्त बापूंच्या तब्येतीची चौकशी करीत होते.. दीड एक महिन्यांनी बापूंना पाहत असल्याने अनेकांना रडू फुटले होते..चिल्ली पिल्ली तर बेंबीच्या टोकापासून ओरडून बापू आई दादांना हाका मारत होते...
अरे!!! बापू या असंख्य भक्तांशी त्या काही सेकंदांमध्ये किती बोलतात...कुणाला थंब्स अप..कुणा्ला थंब्स डाऊन...कोणाला पाहून डोळे मोठे करणे..कुणाला मान हलवून स्पष्ट नाही सांगणे...काय काय संवाद चालू असतात त्यांचे आणि त्यांच्या भक्तांचे हे त्यांनाच ठाऊक...मला तर जाम मज्जा आली...हे सगळ पाहून...आई दादा पण...
एक क्षण असा आला...साईराम जप टीपेला पोहोचला...भक्तांचा गजर टीपेला पोहचला...बापूंना पाहून एकच जयघोष सुरु झाला...बापू आई दादांची मुद्रा ही वेगळीच होती...ते वातावरणच वेगळे झाले होते...आणि त्या क्षणी मी स्वतःचे अश्रु रोखू शकले नाही...बापूंवरील भक्तांचे प्रेम आणि बापूंचे त्यांच्या भक्तांवरील प्रेम पाहण्याचा अलभ्य लाभ मला झाला आणि मी तिथे फोटोग्राफर आहे हे काही क्षणांसाठी विसरुन गेले...मला हे सगळ पाहून काय कराव कळत नव्हत..मी फक्त रडत होत...रडत होते...पण लगेचच स्वतःला सावरुन फोटो काढायला लागले...मात्र पुढचा बराच वेळ माझ रडण काही थांबल नाही...डोळ्यातून अश्रू वाहतच होते...वाहतच होते...
मग दादा जेव्हा राउंडला गेले तेव्हा मी त्यांचे फोटो काढायला गेले...पण दादांनी माझी चांगलीच फजिती केली.. मी कॅमेरा घेऊन समोर आले की दादा माझ्याकडे पाठ करायचे...किती वेळा झाले असे...माझ माकड झालं होतं...सारख इकडून तिकडून उड्या मारायला लावल...मग ठरवल मी फोटो काढणार म्हणजे काढणार...आणि नंतर माझा हट्ट दादांनी ही दिलखुलास पुरवला...बहुतेक दादांना फोटो काढण जास्त आवडत नसाव.

नंदाई राऊंडला केव्हा गेली हे मला कळलच नाही..त्यामुळे तिचे फोटो काढायचे राहिले...मग सगळे इव्हेंट कव्हर केले. बापूंचे फोटो काढायला पुन्हा हॉलमध्ये गेले...पण यावेळेला माझ्या मनात वेगळेच फिलिंग आले...बापूंना फोटोचा त्रास होतोय का? मला जाणवले ते बसल्यापासून मी फोटो काढतेय...त्यांना फ्लॅशचा त्रास होत नसेल का? असा मनात माझ्या विचार आला...आणि होतच असणार...
मग त्यानंतर प्रत्येक क्लिक केल्यानंतर मला त्रास होत होता...सेवा सोडू शकत नाही...पण बापूपण का हकलवत नाही? "बस फोटो" अस का म्हणत नाही अस मला झाले होते...बापूंच्या डोळ्यावर पडणारा प्रत्येक फ्लॅश माझ्या हृदयाला चिरा पाडत होता...कधी ३ वाजत आहेत आणि मी इथून जातेय अस वाटत होत मला...हे फिलिंग येण्याचे प्रमुख कारण म्हणजे बापू नुकताच आजारातून उठले आहे आणि त्यांना त्रास होताना मी सहनच नाही करु शकले...मला माझाच राग आला...धर्मसंकटात सापडल्यासारखे वाटत होते...पण मला काहीच कळत नव्हते...कधी एकदाचे ३ वाजत आहेत अस वाटत होते...आणि बहुतेक ३ वाजताच बापू आत गेले...आणि या धर्मसंकटातून माझी सुटका झाल्यासारखे वाटले..
एकंदरीतच या सेवेचा अनुभव हा खुप काही शिकविणारा होता...यातून काय काय शिकले हे मी तुम्हाला कदाचित सांगू शकणार नाही...पण त्यामुळे माझ्यात नक्कीच बदल झाला.
सेवा करताना अधे मध्ये कुणीही नाही...केवळ मी बापू आई दादा बस्स!!!!!!!
मला तर वाटते प्रत्येकाने फोटोग्राफर व्हावे आणि झूम लेन्समधून बापूंना पहावे..
प्रत्यक्षात हे जरी प्रत्येकाला शक्य नसल तरीही मनाच्या झूम लेन्सने बापूला पहावे आणि तो फोटो कायमचा हृदयात कोरून घ्यावा...हो पण माझ्या नालायकासारखा बापूंना त्रासदायक ठरु शकणारा स्वार्थाचा "फ्लॅश" मात्र वापरु नका..

Monday, July 19, 2010

ONE NIGHT @ गुरुक्षेत्रम

हरी ओम
"ONE NIGHT @ गुरुक्षेत्रम" टायटल वाचून तुम्हाला ONE NIGHT @ CALL CENTER या चेतन भगतच्या पुस्तकाची आठवण झाली असेल. हो पण त्या पुस्तकातील आणि माझी रात्र जरा वेगळी आहे बर का! पण त्या पुस्तकातील पात्रांची ती रात्र आणि माझी रात्र एकाशीच संबंधीत होती..GOD...देवाशी..

त्या पुस्तकातील पात्रांना आयुष्याच्या शेवट ठरु शकणार्या क्षणी देवाचा फोन येतो..
मात्र मी माझ्या नवीन आयुष्याच्या सुरुवात करताना देवाशी संवाद साधायला गेले होते. गुरुक्षेत्रमला!!!
आता नवीन आयुष्य कसे काय? तर त्या दिवशीच आत्मबलचा पहिला क्लास होता आणि नंदाईने सांगितले होते की तुमच्या कष्टमय दुःखी आयुष्याचा हा शेवट आणि उद्यापासून तुम्ही एक नव अनोख आयुष्याची सुरुवात करणार आहात. तर माझ्या एका आयुष्याचा शेवट आणि नविन आयुष्याची सुरुवात साक्षात महिषासुरमर्दीनी, दत्तबाप्पा आणि अनसूया माता यांच्या समोरच झाली. तेही राम रसायनात पूर्णपणे विरघळलेले असताना....किती छान ना! काय सॉलिड योग जुळवून आणला बाप्पा तू!!!

तर गुरुक्षेत्रमला शनिवारी १७ जुलैला मी आणि माझे सहकारी पठणाला गेलो होतो. गुरुक्षेत्रममध्ये हजेरी लावून पठणाला बसलो. आधी आह्निक केले. मग रामरसायन वाचण्यास सुरुवात केली. साधारण १०.३० ते १ या वेळेत रामरसायनाचे पठण झाले. एका अर्थाने राम रसायन म्हणजे रामाचे चरित्रच पण ते बापूंनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने रचलेले आहे..ते वाचताना काय होत ते मी शब्दात मांडूच शकत नाही. पण खूप भारी वाटत!!!

त्यानंतर मी मातृवात्सल्यविंदानमचा एक अध्याय वाचण्याचे ठरविले. मला १०८ वेळा हनुमान चालिसा म्हणायचे होते म्हणून मातृवात्सल्यविंदानमचा एकच अध्याय वाचण्याचे ठरविले. रॅण्डमली एक अध्याय निवडला आणि नेमका तो "मणिभद्रकंकणा" संदर्भाचा होता. मी म्हटले वा!!!!! आजच्या दिवसाला हाच अध्याय वाचणे उचित आहे...कारण त्यात  प्रभु परशुरामाचे आई प्रेम उफाळून आले होते...आणि त्याच्या प्रेमामुळे रेणूका माता प्रगट झाली. हा अध्याय वाचून माझेही आई प्रेम उंचबळून आले आणि त्या दिवशी तर संपूर्ण आईमय झाले होते...या शिवाय काहीच सुंदर नाही...तेव्हा काय वाटले ते सांगूच शकणार नाही...फक्त आई चण्डीकेला आणि अनसूया मातेल अत्यंत प्रेम पूर्वक पाहिले..तेव्हा वाटल उठून जाऊन आईला  घट्ट मिठी मारावी आणि मनोमन तसे केलेही....:)

त्यानंतर काही स्तोत्रपठण करुन हनुमान चालिसा म्हणावयास सुरुवात केली..साधारण पाच तासात १०८ वेळा व्यवस्थित म्हणून झाली. भिती वाटत होती की झोप येइल. पण बापूकृपे ती झोप काही नावाला पण नाही आली. हनुमान चलिसा पठण ऍक्च्युली कधी पूर्ण होत आले कळलेच नाही. बापूंनी हे पठण करायला सांगितल्यानंतर मला ते पूर्ण करणे पहिल्यांदाच जमले बर का!!! १०८ वेळा कस होणार??? या भितीने पहिल्यावर्षी धाडसच नाही झाले म्हणायचे. त्यानंतर १०८ वेळा झाले नाही. अर्धवटच होत होते...
पण या वर्षी बातच निराळी होती...कारण आईचे शब्द कानात घुमत होते.."तुमच कस पाहीजे माहीत आहे..."एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै अपने आप की भी नही सुनता."  मग आपोआपच जमल...सगळं..कूल ना!
देवाशी त्या एका रात्रीत मी मनोमन संवाद साधला..माझा तरी ठाम विश्वास आहे गुरुक्षेत्रममध्ये आई - दत्तबाप्पा थेट ऐकतो आणि खरं सांगू त्याने ऐकलय त्याची प्रचिती ही लगेच मिळते... तिथे त्यांच्याशी हितगुज केल्यानंतर जे समाधान आणि रिलॅक्सेशन मिळते ना हीच खरी प्रचिती नाही का? माझ्यासाठी तरी आहे बुवा!!!


गुरुक्षेत्रम बद्द्ल वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Sunday, July 18, 2010

आई...

हरी ओम
आई...हा शब्द मी कधीच त्या एका उत्कट भावनेने कधीच उच्चारला नाही. आमच्या घरी मम्मी म्हणण्याची सवय आहे ना म्हणून.
आई अशी उत्कट हाक मी पहिल्यांदा नंदाईलाच मारली..अगदी आतुन...खोल खोल अंतराच्या मुळापासून..तिची माया आणि तिचे आईपण नेहमीच अनुभवत आले..अप्रत्यक्षपणे...किंवा सूक्ष्म पातळीवर म्हणा हव तर...पण अनुभवले..मात्र आज ही आई..तीचे आईपण प्रत्यक्ष अनुभवले..बाळासाठी असलेला तीचा कळवळा..तीची धडपड...तीची शिस्त...तीचा धाक सर्व काही...आई अनुभवली..

आईने काळजाला हात घातला..तिचे बोलणे हे हृदयाचे पाणी पाणी करणारे होते...आई प्रेमाचा उन्माळा येऊन एखादा डोंगर, पाषाण ही फुटुन रडू लागेल असं!!!

काय बोलू? काय सांगू? शब्दांची देखील तारांबळ उडाली आहे...आईचे हितगुज वर्णन करण्यासाठी..त्यामुळे ते सांगणे या क्षणी तरी शक्य नाही मला.

आज अस वाटल!!!!
तिला कवटाळून ओक्साबोक्सी रडून घ्याव. असलेली-नसलेली, असली-नकली, मोठी-छोटी सगळी दुःखं तिच्या ओटीत टाकावी. केवळ आणि केवळ तिच्या डोळ्यातून वाहणार्या लाभेविण प्रेमामध्ये, अकारण कारुण्यामध्ये न्हाहून निघावे. मन रितं करावे....संपूर्णपणे...तिच्या पायाशी...आणि भरभरून घ्यावं तिचं प्रेम...

अगदी पहिल्याच दिवशी आपल्या पदराचा एक एक तुकडा आपल्या प्रत्येक लेकीला देऊन प्रत्येकीची जन्माची काळजी मिटवून टाकली तिने..

अरे तुम्हाला हे सांगितलेच नाही ना!!! हे कुठे....अस नंदाईचे भरभरुन प्रेम अजून कुठ मिळणार? आत्मबल विकास केंद्रात...
आत्मबल - जेथे स्त्री शक्तीची जाणिव होते. जेथे स्त्रियांचा विकास साधला जातो.

Monday, April 26, 2010

A Mega CHARKHA Camp (Shibir)


A Mega CHARKHA Camp (Shibir) will be held at Shree Harigurugram from 2nd May 2010 to 15th May 2010 by Sadguru Shri Aniruddha Upasana Trust.

In this Shibir 250 Charkha's would be put up for use.

Please inform your friends, Bhaktas on your center and other colleagues to attend this Shibir with high numbers.

As this Shibir is arranged centrally by our Sanstha as a part of 13 point Programme.

Shibir Timing:

Monday to Saturday : 04.00 pm to 10.00 pm.

Sundays : 11.00 am to 10.00 pm

Shibir Address :

Shri Harigurugram,
New English High School,
Bandra (East), Mumbai 400 051.

चरखा......धागा धागा अखंड विणुया

एका आदर्श समाजाची परिकल्पना काय? याचा विचार करायचा म्हटले तर आपल्या अभ्यासाला, संशोधनाला सुरुवात तर होइल. मात्र, याचा निकाल आपल्या हातात कधी येइल याबाबत काही सांगू शकत नाही. कारण समाजातील विविध समस्या खुप वाढल्या आहेत आणि त्यावर वर वर चे उपाय योजून चालणार नाही. या समस्या पूर्ण नष्ट केल्या पाहिजेत. तेव्हाच आपल्या समाजाला धैर्य आणि गतवैभव पुन्हा प्राप्त होइल. यासाठी डॉक्टर श्री अनिरुद्ध जोशी यांनी १३ कलमी योजना जाहिर केल्या आहेत. या योजनावरच त्यांच्या संस्थेचे कार्य अवलंबून आहे. या १३ कलामंमधील पहिले कलम म्हणजे वस्त्र योजना अर्थात चरखा योजना

वस्त्र योजना अर्थात चरखा योजना

गरिबीमुले अंगभर नीट वस्त्रही घालता येत नाही अशी अवस्था प्रगतिशील भारतात आजही आहे. खेडेगावात राहणार्या सुमारे ४ कोटिहुन जास्त विद्याथार्नकड़े एकच गणवेश असतो. पुरेसे आणि टिकाऊ कपडे उपलब्ध नसल्याने शिक्षण पासून ती मुले वंचीत राहतात. गरजू विद्याथार्नकड़े आणि त्यांच्या परिवाराला आवश्यक कपडे पुरविण्यासाठी चरखा योजना जाहिर झाली.

अनिरुद्ध आदेश पथकाचे कार्यकर्ते स्वखर्चाने अम्बर चरखा विकत घेतात. त्यावर सूत कातातात. संस्था या सुतापासुन कापड तयार करते. या कपड्यापासून शालेचे गणवेश तयार केले जातात आणि त्यांचे विनामूल्य वाटप करण्यात येते.

Saturday, April 3, 2010

रक्तदान शिबिर

यद्न्येन, दानेन, तपसा....

रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मात्र, भीतीपोटी म्हणा अथवा कोणत्यातरी गैर समजुतीमुळे म्हणा. आपण रक्तदानासाठी जात नाही.
सुदृढ आरोग्यासाठी रक्तदान करणे फायदेशीर आहे.
आपल्या शरिरात ४.५ - ५ लिटर रक्त असते. यापैकी केवळ ३०० मिली रक्त घेतले जाते. रक्तदानानंतर २ ते ३ तासात शरिरात नविन रक्तपेशी तयार होतात. म्हणजेच काय रक्तदानामुळे नवीन रक्तपेशी तयार होण्यास वाव मिळतो आणि त्यामुळे आपले आरोग्य सुदृढ राहते.

आपले मौल्यवान रक्त एखाद्यास जीवनदान देणारे ठरते. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रॆष्ठ दान आहे.

सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे रविवार, दिनांक ११ एप्रिल २०१० रोजी, भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ६
स्थळ : श्री हरिगुरुग्राम

न्यू इंग्लिश स्कूल

खेरवाडी पोलिस ठाण्याजवळ

वांद्रे (पूर्व)


रक्तादानास येण्यापूर्वी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी


Tuesday, September 1, 2009

Biggest eco-friendly Ganpanti adorns Goregaon


Besides the flat 50% on going sales, it’s the biggest eco-friendly Ganpanti idol at Oberoi Mall, Goregaon that is contributing in drawing people towards it in crowds

By Kunal Chonkar
Posted On Wednesday, August 26, 2009 at 04:31:10 PM


He is seven and half feet tall. His stature commands respect. One look at him and he is sure to make you fall heads over heels for him. That’s the customary scenario at the Oberoi Malls, Goregaon. Devotees are thronging the mall from all nook and crannies of the city to see the deity of the season; the most celebrated and sorted elephant-headed lord, Ganesha.

For the first time, the mall has a Ganesha figurine placed in its lobby. The idol was unveiled on 23rd August, the opening day of the festival in front of hundreds of curious onlookers. This figurine is made from paper pulp and natural gum and is a customised model. Moulded on special request by Sadguru Shri Aniruddha Upasana Trust (SSAUT) for the city based art designer Nitin Desai.

As the city bustles with glamour and glitter over their large Plaster Of Paris (POP) idols, the management at the mall are content with the eco-friendly lord. “We are very fortunate to have the city’s largest eco-friendly Ganesha sitting with us. Over the years many mandals have strutted about their colossal idols but the fact remains that it is these models that pollute the sea,” says the manager, Oberoi Malls.

The genesis of the concept dates back to 2002, when the volunteers of SSAUT, used to re-immerse the litter of the half broken and defaced idols on the 12th day of the festival. Over a period of time, reducing the pollution level in the sea became a core importance for the group. “After contemplating on how to reduce the pollution level in the city waters. We decided to make special idols that were made of paper pulp and packed by natural binding gum. Even the colours are pidlite certified non-toxic colours,” informs Maheshsinh Zante, CEO of SSAUT.

The models took time to get familiar in the city. From selling about 300 idols in their first year, the group has now managed to sell 6000 figurines in the state. Many of which now are part of celebrity’s celebration as well. From the prominent Marathi stage actor Mohan Wagh to the legendary set designer of ‘Devdas’ Nitin Desai’s Ganpati are now going natural.

“This year we have designed a figurine for Nitin Desai. The rationale was of spreading awareness and making everyone realise the importance of ecological consciousness. Looking at this model people might change their approach and take small steps in saving our planet,” hopes Haresh Mahajan, project in-charge.

The trend of taking POP Ganesha idols seems to have undergone a sea change and the group might see an increase in demand by next year. The Chitale family is one such family who has taken a vow to go green-way for the next year Ganesh Chaturthi festival. “This year we have a POP idol as we could not differentiate between POP and the eco friendly one. In 2010, he will certainly go for eco friendly Ganpanti idol.” assures Manmohan Chitale.