Saturday, May 7, 2011

७ मे ला परमपूज्य बापू करणार श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवाच्या विविध स्थानांची स्थापना

हरि ॐ

श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सव अगदी जवळ म्हणजे प्रत्येकाच्या श्वासाशी येऊन ठेपलाय. आणि हा श्वास आहे म्ह्णूनच माझा प्राण आहे. आणि आपला प्राण म्हणजे आपले लाडके बापू. म्हणूनच या श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवाची सुरुवात स्वत: परमपूज्य अनिरुध्द बापू, परमपूज्य नंदाई व परमपूज्य सुचितदादा करणार आहेत.

दिनांक ५ मे २०११ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता श्रीगुरुक्षेत्रम् येथे परमपूज्य बापू श्री महीषासूरमर्दीनीच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहेत. त्यानंतर हे पवित्र तीर्थ श्री जान्हवीस्थानम् येथे वाहीले जाणार आहे.

दिनांक ७ मे २०११ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री हरिगुरुग्राम येथे बापूंचे आगमन होणार आहे. सकळी ११.०० वाजल्यापासून संध्याकाळी साधारणपणे ५.०० वाजेपर्यत श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवाच्या विविध स्थानांची स्थापना बापू करणार आहेत.  त्याची साधारण रुपरेषा पुढील प्रमाणे :

१. मंडपपूजनम : श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवासाठी या संपूर्ण पवित्र करून तो सिध्द केला जाणार आहे.

२. राजोपचारे पूजन : यामध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आदिमातेचे राजोपचारे म्हणजेच अगदी राजेशाही थाटात पूजन बापू स्वतः करणार आहेत.

३. नृसिंह सरस्वती पादुका पूजन : त्यानंतर बापूंच्या घरच्या अतिशय पूरातन व अतिपवित्र नृसिंह सरस्वतीच्या पादुकांवर बापू अभिषेक करणार आहेत.

४. श्री अखिल कामेश्वरी महालक्ष्मी मूर्ती स्थापना : मुख्य स्टेजवर बरोबर मध्यभागी श्री अखिल कामेश्वरी महालक्ष्मी मूर्तीची स्थापना बापू करणार आहेत.

५. श्री आरोग्यभवानी महासरस्वती मूर्ती स्थापना : मुख्य स्टेजवर श्री अखिल कामेश्वरी महालक्ष्मी मूर्तीच्या बरोबर उजव्या बाजूला श्री आरोग्यभवानी महासरस्वती मूर्तीची स्थापना बापू करणार आहेत.

६. श्री कालनियंत्री महाकाली मूर्ती स्थापना : मुख्य स्टेजवर श्री अखिल कामेश्वरी महालक्ष्मी मूर्तीच्या बरोबर डाव्या बाजूला श्री कालनियंत्री महाकाली मूर्तीची स्थापना बापू करणार आहेत.

७. देवीसिंह स्थापना : ह्या आदिमातेचा सर्वात लाडका पुत्र असणारा परमात्याची श्री देवीसिंहच्या रुपात तिच्याच शेजारी स्थापना केली जाणार आहे.

८. अवधूत कुंभ स्थापना : मुख्य स्टेजवर या आदिमातेच्या तीन स्वरुपांभोवती ९ अवधूत कुंभांची स्थापना होईल.

९. श्री कतराज स्थानाची स्थापना : ज्या कतराज आश्रमात या आदिमातेने आपले पहिले पाऊल टाकले. त्या श्री कतराज स्थानाची स्थापना बापू करणार आहेत. याच पवित्र कतराज स्थानावर महापूजन व शत्रुविघ्नेश्वरी पूजन करणारे श्रध्दावान आपले अर्चनद्रव्य येथे अर्पण करतील.

१०. गंगा माता मूर्ती स्थापना : ज्या गंगामातेला बापू ऊदी स्वरूपात अखंड व अक्षय स्थान देणार आहेत त्या पवित्र गंगामातेची स्थापना बापू करणार आहेत.

११. जान्हवी स्थानम स्थापना : ही गंगामातेची मूर्ती ज्या पवित्र स्थानावर ठेवून आपण तिच्यावर देशविदेशातून आणलेल्या शतनद्या व सप्तसमुद्र यांच्या पवित्र जलाने ह्या मूर्तीवर अभिषेक होणार त्या जान्हवी स्थानमची स्थापना बापू करणार आहेत.

१२. गंगा पताका स्थापना : त्याचबरोबर ह्या गंगामातेच्या गंगा पताकांची स्थापना होणार आहे.

१३. श्री महाकाली कुंड स्थापना : यामध्ये आपणा सर्व श्रध्दावान भक्तांना असूर दहन द्रव्य अर्पण करायचे आहे. याची स्थापना बापू करणार आहेत.

१४. श्री महालक्ष्मी दीप स्थापना : यामध्ये आपणा सर्व श्रध्दावान भक्तांना सूर स्नेहन द्रव्य अर्पण करायचे आहे. याची स्थापना बापू करणार आहेत.

१५. श्री महासरस्वती वापी स्थापना : यामध्ये आपणा सर्व श्रध्दावान भक्तांना मांगल्य द्रव्य अर्पण करायचे आहे. याची स्थापना बापू करणार आहेत.

१६. श्री दुर्गा वरद होम येथील महीषासूरमर्दीनी मूर्तीची स्थापना : या ठिकाणी बापूंनी लिहलेल्या मातृवात्सल्यविंदानम् चे संस्कृत पठण परपूज्य बापूंच्या आवाजात होणार अशा स्थानावर श्री महीषासूरमर्दीनी मूर्तीची स्थापना एका मोठ्या गडावर केली जाणार आहे.

१७. अकरा कंठकूप पाषाणांची स्थापना : या महीषासूरमर्दीनीच्या गडासमोर तिच्याच रुपाची ११ कंठकूप पाषाणांत स्थापना केली जाणार आहे.

१८. जलाशय स्थापना : हे ११ कंठकूप पाषाण ज्या पवित्र जलाशयाभोवती असणार त्या पवित्र जलाशय स्थापना बापू करणार आहेत.

१९. यज्ञकुंड स्थापना : याच जलाशयासमोर यज्ञकुंड असणार आहे ज्यामध्ये सर्व श्रध्दावान भक्तांना ऊद अर्पण करायचा आहे. याची स्थापना बापू करणार आहेत.

२०. श्री पितांबर पीठ क्षेत्र पूजन : सर्वात शेवटी श्री पितांबर पीठ क्षेत्र पूजन होऊन खर्‍या अर्थाने श्री श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवाची सुरुवात होणार आहे. 

काय मग येताय ना ७ तारखेला....................................................... आपल्या मोठ्या आईला आणि तिच्या लाडक्या पुत्राला भेटायला.
हरि ॐ

- SWAPNILSINH DATTOPADHYE

Friday, April 29, 2011

प.पू. सुचितदादांच्या आजोबांनी श्री साईनाथांवर लिहलेली आरती

आज श्री हरिगुरूग्राम येथे प.पू. सुचितदादांच्या आजोबांनी श्री साईनाथांवर लिहलेली आरती झाली. अतिशय सुंदर, नादमधुर आणि भावपूर्ण अशी ही आरती.....

जय जय बोला जय जय बोला साईनाथांचा जय बोला ! 
ओवाळीतो स्तवन आरती दीनदयाळा कृपाळा !!  

तुझिया ठायी तुझिया पायी शरणागत ...मी दीन अति ! 
कृपा करी बा दीनवत्सला उध्दारी मज श्रीमूर्ती ! 
पंचारती ओवाळी तुजला भक्तिभावयुत सुमहारा ! 
गोड करुन घे दासाचे हे स्तवन वाकडे परात्परा !! १ !! 

जय जय बोला जय जय बोला साईनाथांचा जय बोला ! 
ओवाळीतो स्तवन आरती दीनदयाळा कृपाळा !!   

दीनोध्दारा दयावंत तू सखा सोबती भक्तांचा !
धाव घाल झणी करी वर्षावा सदैव तव सत्कृपेचा ! 
तुझिया स्तवनी मनी मानसी मी तू पणाला ठाव नसे !
भक्तिभावे सोsहं सोsहं निनाद उठती दाही दिशे !! २ !!  

जय जय बोला जय जय बोला साईनाथांचा जय बोला ! 
ओवाळीतो स्तवन आरती दीनदयाळा कृपाळा !! 

त्रिविध त्रिगुणे सत्व रज तमी कृपानिधे तू दातार ! 
नामस्मरणे भक्त शिरी धर सदा दयेची पाखर ! 
जगत्पालका भक्तरक्षका पूर्ण परेशा निरंजना ! 
मायामोही एकमेव तू तारक आम्हां भवहरणा !! ३ !!  

जय जय बोला जय जय बोला साईनाथांचा जय बोला ! 
ओवाळीतो स्तवन आरती दीनदयाळा कृपाळा !!   

शिरडी ग्रामी पवित्र धामी निंब द्रुमाच्या छायेत !
पवित्र झाले सकल भूमीतल आत्मरुप आनंदात ! 
माईव्दारका पुनीत झाली धगधगत्या चिर धूनीने ! 
उदी विलेपन भाली भक्ताजन करी सदोदीत भक्तीने !! ४ !!  

जय जय बोला जय जय बोला साईनाथांचा जय बोला ! 
ओवाळीतो स्तवन आरती दीनदयाळा कृपाळा !!   

फडकत माथा शुभ्रदुपेटा साईनाथा मनोहरा ! 
तव रुपाची सदैव मूर्ती वसो अंतरी श्रीकारा ! 
श्रीसाईजी आद्यानंता परमपरेशा गुरुनाथा ! 
मोरेश्वर चिंतामण ठेवी तुझिया चरणी निजमाथा !! ५ !!   

जय जय बोला जय जय बोला साईनाथांचा जय बोला ! 
ओवाळीतो स्तवन आरती दीनदयाळा कृपाळा !

Thursday, April 28, 2011

"आईचा गोंधळ"


नंदा आई तुझ्या कृपेने तू तारीशी भक्ताला
धावत ये लवकरी जीव हा कासावीस झाला
आई कृपा करी आम्हावरी
जागवितो रात सारी (२)
आई गोंधळाला ये...
गोंधळ मांडिला ग नंदे गोंधळाला ये
उदे उदे उदे उदे उदे उदे उदे

बापू तुझे मिलने का....


बापू तुझे मिलने का रामनाम ही बहाना है
दुनियावाले क्या जाने इससे रिश्ता पुराना है

अरे शिर्डी मैं धूंडा तुझे मुंबई मैं पाया है
दाभोलकर के (२) साईनिवास से ओ शुरु मेरे बापू की कहानी है ||1||
... बापू तुझे मिलने का....

अरे राधा को धुंडा मैने, मीरा के प्रभू को पाया है
बापू के (२) हृदय मैं, मेरी नंदाई की मूरत है ||2||
बापू तुझे मिलने का....

अरे लक्ष्मण को समझा मैने, बलराम को पाया है
सुचितदा के (२) स्वरुप मैं प्यारे शेषराज को पाया है ||3||
बापू तुझे मिलने का....

अरे भागवत को पढा मैंने, और गीता को पढा है
आद्यपिपा की (२) पिपासा से ओ मैंने सिर्फ बापू को ही पाया है ||4||
बापू तुझे मिलने का....

अरे गलियो मैं धुंडा तुझे, मंदीरो मैं धूंडा है
मेरे ही (२) हृदय मैं ओ मरे बापू का सिंहासन है ||5||
बापू तुझे मिलने का.....

अरे अंदर पाय तूझे, बाहर भी पाया है
बापू के (२) चरणॊ मैं, इस पगली का ठिकाना है ||6||
बापू तुझे मिलने का.....

- रेश्मावीरा हरचेकर, वर्ष २००३

सुरु झाली ग..


सुरु झाली ग..झाली ग...माझ्या आयुष्याची गाडी
सोबत लाभली रे मला या बापूरायाची गोडी

वेडू वाकुडे पाऊल, या वाटेवर पडू जाय (२)
तरी सांभाळे सांभाळे माझी सावळी गुरुमाय...
...आता हिच्या विना माझ्यात जे उरेल ते काय? ॥१॥
सुरु झाली ग....

माझी प्रित हा बापू, त्याच्या प्रितीची नंदाई (२)
आईची छाया ग, माया ग दिली या नंदेने
झाले रे मी पावन बुडले रे प्रेमाने ॥२॥
सुरु झाली ग...

सुचितमामा माझ्यासाठी धावती उठाउठी
माझं जीवन जीवन या मामाच्याचसाठी
आधार असे हा माझा सावली आईबापूंची ॥३॥
सुरु झाली ग...


आद्यपिपा देवयान पंथी नाम घेऊन उरापोटी
मी चालली ग, चालली ग आद्यपिपांच्याच पंथी
बांधूनी सच्ची घट्ट गाठ त्यांच्या मनगटाशी
सुरु झाली ग...

माझे शेवटचे ठिकाण या बापूचे चरण
बापूच आहे ग आहे ग माझ्या गाडीचा चालक
तोची चालक, मालक, माझा प्रेमळ पालक
तोची चालक, मालक विश्वाचा प्रेमळ पालक
सुरु झाली ग....
- रेश्मावीरा हरचेकर

Thursday, March 17, 2011

Dr. Paurasinh Aniruddh Joshi_Great Achivement_Must Read


Dr. Paurassinh Aniruddh Joshi

Page 1

Page 2

Tuesday, February 1, 2011

MAHARASTRA TIMES- SAGUN NIRGUN

महाराष्ट्र टाईम्समधील "सगुण-निर्गुण - माझे अध्यात्म" या सदरामध्ये २५ जानेवारी २०११ आणि १ फेब्रुवारी २०११ रोजी  डॉ. राजीव कर्णिक यांचे "श्रद्धेतील बळ" व "नास्तिकेकडून आस्तिकाकडे" हे लेख प्रकाशित झाले आहेत. प. पू. सदगुरु श्री अनिरुद्ध बापू...यांच्या मनःसामर्थ्यदायत्वाची साक्ष देणारे हे लेख वाचून भरुन आले. महाराष्ट्र टाईम्सने डॉ. राजीव कर्णिकांचा हा अनुभव आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. टाईम्स ग्रुपकडून नेहमीच सदगुरु अनिरुद्ध बापू यांच्या बद्दल माहिती दिली जाते.  त्यांच्याकडून प. पू. बापूंच्या संस्थेतर्फे सुरु असलेल्या भक्तीमय सेवांची कायम दखल घेतली जाते. याबद्दल टाईम्स ग्रुपचे आभार.....