Thursday, December 18, 2014

स्व-आरोग्याकडे पाहण्याचा एक स्वार्थी दृष्टीकोन


Self-Health-Doctor

१३ डिसेंबर हा दिवस दृष्टीकोन पालटणारा ठरला. आरश्यात केवळ आपण कसे दिसतो हेच आज पर्यंत पहात आले पण १४ डीसेंबरला प्रथमच आरश्यात स्वतःचे आरोग्य कसे आहे हे न्याहळायला लागले. तेव्हा जाणवले की चांगले आरोग्य हेच खरे सौंदर्य आणि खरे सौंदर्य चेहर्‍यावर नसून पोटात आहे.....हा हा हा....नक्कीच अजब वाटले असेल. पण हे १०८ टक्के खर आहे. कारण १३ डिसेंबर २०१४ रोजी डॉ. अनिरुद्धसिंह धैर्यधर जोशी (अनिरुद्ध बापू) यांचा सेल्फ हेल्थचा सेमिनार अटेंट केला आणि माझे माझ्या आरोग्याबद्दलचे विचारच बदलले. खरच आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि घ्यायची म्हटली तर नेमके काय करायचे हेच कळत नाही. जोपर्यंत आपण स्वतःच्या आरोग्याविषयी स्वार्थी बनत नाही तोपर्यंत चवीच्या आणि खाण्याच्या मोहातून सुटका होत नाही. बापूंनी या व्याख्यानातून ही जाणिव करुन दिली.व्याख्यानाची सुरुवातच मुळी बापूंनी सकारात्मक करुन दिली.

Everything can be repair. हो आपण सगळ काही सुधारु शकतो. दुरुस्त करु शकतो. आरोग्याच्या बाबतीत बोलताना सेमीनारच्या शेवटापर्यंत ह्या वाक्याची पूरेपूर जाणीव झाली.

बापूंनी डॉ थॉमस यांचे एक वाक्य सांगितले. Health is not value till sickness come. आरोग्याची किंमत आजारपण आल्याशिवाय कळत नाही आणि खरंच आज एकही अशी व्यक्ती नसावी की ती आजारी नाही. प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या व्याधीने पछाडलेलाच आहे. काहींची व्याधी मानसिक तर काहींची शारीरिक. आणि या व्याधींचा वापर आपण अनेकदा सांत्वनासाठी करुन घेतो.

मी देखील अनेक व्यक्ती पाहील्या आहेत की त्यांना झालेल्या (?) आजारांचा वारंवार उच्चार करुन जगाची सिंपथी मिळविण्याचा प्रयत्न करतात व जबाबदार्‍या टाळतात. कधी तरी खरंच व्यक्ती आजारी असते पण अनेकदा हे आजारपण ओढावून घेतलेले असते. आपण वारंवार एकाच गोष्टीचा विचार केला की ती मनात जाऊन मोठी होते किंवा प्रत्यक्षात येते. अनेकदा तसेच काहीतरी होत असावे . मग आजाराचा विचार करण्यापेक्षा आरोग्याचा विचार केला तर ८० ट्क्के आजार दूर पळतील आणि आरोग्याचा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचे हे बापूंनी सांगितले.

मनाला फ्रेश वाटत असेल तर शरिराला ही फ्रेश वाटत असत. मन थकलेले असेल तर शरीरही आपले कार्य नीट करु शकत नाही. म्हणून मनाने उदास असणार्‍या व्यक्ती विशेष कार्यशील ठरु शकत नाही. त्यामुळे मनाचा उदासपणा जाऊन त्यास चैतन्य येणे आवश्यक असते. पण खर तर मन हे अन्नमय आहे. म्हणजे शेवटी आपण काय खातो यावरच आपले सर्वस्व अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. आणि आपण काय खावे व काय खाऊ नये तसेच ते कसे खावे हे बापूंनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले.

हे कनेक्शन सांगताना बापूंनी "दी फरगॉटन ऑर्गन" ची ओळख करुन दिली. ते म्हणजे आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरीया. या चांगल्या बॅक्टेरियांचे महत्त्व विशद करताना बापूंनी अगदी थक्क करणारी माहीती दिली. या चांगल्या बॅक्टेरियांच्या प्रभावामुळे माणूस आस्तीक बनत जातो, धीट बनत जातो आणि हे सिद्ध होण्यासाठी आणखी काही कालावधी जाईल. पण हे १०८ टक्के खर आहे असं बापूंनी सांगितले आहे आणि गुन्हेगारांमध्ये वाईट बॅक्टेरियाचे प्रमाण अधिक असल्याचेही शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

याबाबत मी एक जवळून अनुभव घेतला आहे. माझ्या ओळखीतला एक तरुण मुलगा अतीशय व्यसनी व गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. आस्तीकता नावाला देखील असेल की नाही माहीत नाही. एक दिवस काय झाले माहीत नाही पण व्यसनाचा अतिरेक झाला आणि स्वतःच ठरवले की बस झाले....आता आपण तब्येत सुधरायची.  यासाठी त्या व्यक्तीने व्यायामाचे व्यसन घेतले. बॉडी बनवायची. या ध्यासासाठी त्याने अन्न बदलले....व्यसने सोडली.....व्यायामाचे वेड जरा अतीच होते...पण तरिही त्यामुळे नकळत बदल होत होता....आणि हा बदल आस्तिकतेकडे भक्तीकडे झुकणारा होता...पुढे व्यायामाचे वेड सुटले...पण भक्ती आणि आस्तिकता कायम राहीली.....त्या व्यक्तीने ही हा बापूंचा सेमिनार अटेंड केला. सेमीनारनंतर त्या व्यक्तीनेच मला या गोष्टीची कबूली दिली....की व्यायाम आणि डायट केले नसते तर आज इथे भक्तीमय परिवारात नसतो...भक्तीमय परिवारात नसतो तर आयुष्याला वळण लागले नसते....आयुष्याला वळण लागले नसते तर आता नोकरी आणि अभ्यासात प्रगती केली नसती. आता पुन्हा बापूंच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम व डायटमधील वेड बाजूला सारुन प्रकृतीला उचित असे व्यायाम व डायट करीन.....असा निर्धार केला.

हे ऎकून मला बापूंनी सांगितलेल्या चांगल्या बॅक्टेरियाच्या प्रभावाचे जबरस्त उदाहरण पहायला मिळाले. मग मी स्वतःकडे देखील पाहीले. कारण नुकतच डॉ. सुचित दत्तोपाध्ये अर्थात सुचितदादांच्या मार्गदर्शनानुसार माझे ही डायट सुरु होते. त्यांनी दिलेले हे डायट म्हणजे बापूंनी दिलेल्या मोठ्या सेमीनारचाच एक भाग होता आणि या डायट फॉलो केल्याने शरिरावरच नाही तर मनावरही उत्तम परिणाम झाला. मी घालवून बसत असलेली माझी कार्यशीलता आणि अर्थात चुणचुणीतपणा मला पुन्हा मिळाला. मन शांत झाले, विचार स्पष्ट झाले. निर्णय क्षमता, निरिक्षण क्षमता, कल्पना क्षमता प्रगल्भ झाली आणि त्याचा रिझल्ट माझ्या रोजच्या कामात मला मिळू लागला. मन अन्नमय याचा अनुभव मी स्वतः घेतला.

स्वतःचा पहिला स्वार्थ म्हणजे स्वतःचे आरोग्य. हे समीकरण बापूंनी दिले. कारण आरोग्य म्हणजे केवळ शारिरिक, मानसिक नाही तर त्यापुढे जाऊन खूप व्यापक असल्याचे या व्याख्याना दरम्यान जाणवले. अशा या स्वतःच्या आरोग्य विषयकची माहीती मी वाट पाहत आहे. लवकरच ही माहीती समिरदादांच्या ब्लॉगवर यावी व डॉ. पौरससिंह जोशी यांच्या टीम अंतर्गत बनणारी वेबसाईट लवकरात लवकर यावी ही सदीच्छा व त्यासाठी शुभेच्छा. तसेच उपासना केंद्रावर ह्या व्याख्यानाची सीडी लावल्यास चुकवू नका.....इतके उचित स्वार्थी तर आपण बनूच शकतो.....अबंज्ञ

http://www.healthonics.healthcare/
-  रेश्मावीरा नारखेडे

2 comments:

Unknown said...

रेश्मावीरा, चांगले आरोग्य हेच खरे सौंदर्य आणि खरे सौंदर्य चेहर्‍यावर नसून पोटात आहे...हे आपले वक्तव्य लेखाच्या सुरुवातीला वाचून खरोखरी अजबच वाटले आणि त्यामुळे लेख वाचण्याचे कुतुहल अजूनच चाळवले आणि लेख वाचता वाचता डॉ. अनिरुद्धसिंह धैर्यधर जोशी (अनिरुद्ध बापू) यांचा सेल्फ हेल्थचा सेमिनार हा एक आगळा , वेगळा दृष्टीकोन देणारा असल्याची पुरेपूर जाणीव झाली. डॉ. जोशी ह्यांनी "दी फरगॉटन ऑर्गन" म्हणजे आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरीया अशी करून दिलेली ओळख हा औत्सुक्यपूर्ण विषय असावा असे जाणवते. या चांगल्या बॅक्टेरियांचे महत्त्व विशद करताना आपण सांगितलेला एका परिचीत व्यक्तीचा अनुभव आणि आपल्या स्वत:चा अनुभव हा खूपच बोलका आहे. त्यामुळेच आरोग्य म्हणजे केवळ शारिरिक, मानसिक नाही तर त्यापुढे जाऊन खूप व्यापक असल्याचे वक्तव्यही पटले. आपल्या भाग २ मधून ह्या विषयासंबंधी विस्तृत माहिती जाणून घेता येईल असे वाटते. आपण डॉ. अनिरुद्धसिंह धैर्यधर जोशी ह्यांचे संपूर्ण व्याख्यान उपलब्ध असल्यास पुढील लेखात सूचित करावे ही कळकळीची विनंती....

Unknown said...

Spot on ! Beautifully expressed thoughts ... Bapu have made life simpler for us and now it's up to us how we respond to his Love for us .. It was never going to be easy to cover so many health related issues but Bapu made it look easy and he explained everything in the most effective manner that even a lay man can understand and remember everything throughout his life ... Ambadnya to you Reshmaveera for this amazing post !!!